agriculture story in marathi, management of yellow mosaic in soyabean | Agrowon

सोयाबीनवरील पिवळा मोझॅकचे नियंत्रण
डॉ. प्रमोद मगर डॉ. सुरेश नेमाडे
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या फुलोरा अवस्थेत झाल्यास उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत झाल्यास  नुकसानीत वाढ होते.
 
 रोगाची कारणे

सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव पिकाच्या फुलोरा अवस्थेत झाल्यास उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत झाल्यास  नुकसानीत वाढ होते.
 
 रोगाची कारणे

 • हा रोग मूगबीन यलो मोझॅक विषाणू आणि मूगबीन यलो मोझॅक इंडिया या विषाणूच्या प्रजातीमुळे होतो.
 • या विषाणूजन्य रोगाचा प्रसार व वहन पांढरी माशी या किडीमुळे होते.
 • अनुकूल वातावरण, उबदार तापमान, दाट पेरणी, नत्रयुक्त खताचा अतिवापर.

 लक्षणे

 • मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडाची पानांचा काही भाग हिरवा, तर काही भाग पिवळसर होतो. पानामधील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे अन्ननिर्मिती प्रक्रियेमध्ये बाधा येते.
 • शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकार लहान होतो.
 • रोगग्रस्त झाडाला दाणे भरत नाहीत.
 • अर्धे हिरवी पिवळी पाने असलेले झाड दुरून ओळखता येते.

 व्यवस्थापन

 • रोगप्रतिकारक आणि सहनशील जातींची (जेएस-२०-२९, जेएस-२०-३४, जेएस-२०-६९, जेएस-९५६०) लागवड करावी.
 • रोगग्रस्त झाडे सुरवातीलाच काढून टाकावीत. रोगाचा प्रसार वाढणार नाही याची दक्षता घ्यावी.
 • पांढरी माशी व अन्य रसशोषक किडींच्या देखरेखीकरता २५ बाय १५ सें.मी. आकाराचे पिवळे चिकट सापळे एकरी ३० ते ४० लावावेत.
 • सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क या वनस्पतीजन्य कीटकनाशकाची फवारणी करावी.
  पांढऱ्या माशीचे नियंत्रण ः क्विनॉलफॉस (२५ टक्के इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी (तामिळनाडू कृषी विद्यापिठाची शिफारस)
 • शिफारशीनुसार संतुलित खताची मात्रा द्यावी. नत्रयुक्त खतांचा वापर अधिक केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांच्याद्वारे या रोगाचा प्रसारही वाढतो.
 • शेती परिसरातील तणे व अन्य पूरक वनस्पतींचा नाश करावा. विषाणूजन्य रोगाचे वाहक किडीच्या आयुष्यक्रमात अडथळा निर्माण होतो.  
 • रसशोषक किडीच्या नियंत्रणाकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.

टीप : अन्नद्रव्यांची कमतरता व रोगाची लक्षणे यातील फरक ओळखून त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
 
संपकर् : डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५
(कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ )

इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...