Agriculture story in marathi, medicinal use of hot water | Agrowon

गरम पाणी ः एक उत्तम औषध
डॉ. विनिता कुलकर्णी
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

अाजाराच्या लक्षणांना प्रारंभ झाल्यावर त्याक्षणी गरम पाण्याने बरे वाटतेच; पण वारंवार लक्षणे दिसत असतील तर योग्य चिकित्सा जरूर करून घ्यावी. जेवण, नाश्‍ता याद्वारे पुरेपूर काळजी घेताना नेमका कोणता आहार द्यावा, पथ्य काय सांभाळावे याचा विचार प्रथम करावा. या दृष्टीने गरम पाण्याचा उपयोग जरूर लक्षात ठेवावा आणि उत्तम आरोग्य ठेवावे.

शरीराच्या विविध तक्रारींसाठी गरम पाणी उत्तम औषध म्हणून काम करते. विशिष्ट लक्षणांसाठी काही औषधी द्रव्ये घालून पाणी उकलले जाते आणि औषध म्हणून घेतले जाते. हे लक्षात ठेवून उपयोग केला तर लहानसहान तक्रारी कमी होण्यास मदतच होईल.

अाजाराच्या लक्षणांना प्रारंभ झाल्यावर त्याक्षणी गरम पाण्याने बरे वाटतेच; पण वारंवार लक्षणे दिसत असतील तर योग्य चिकित्सा जरूर करून घ्यावी. जेवण, नाश्‍ता याद्वारे पुरेपूर काळजी घेताना नेमका कोणता आहार द्यावा, पथ्य काय सांभाळावे याचा विचार प्रथम करावा. या दृष्टीने गरम पाण्याचा उपयोग जरूर लक्षात ठेवावा आणि उत्तम आरोग्य ठेवावे.

शरीराच्या विविध तक्रारींसाठी गरम पाणी उत्तम औषध म्हणून काम करते. विशिष्ट लक्षणांसाठी काही औषधी द्रव्ये घालून पाणी उकलले जाते आणि औषध म्हणून घेतले जाते. हे लक्षात ठेवून उपयोग केला तर लहानसहान तक्रारी कमी होण्यास मदतच होईल.

थंडी, गार वारे अशा वातावरणात खोकला, सर्दी, घसा दुखणे अशा लक्षणांनी किंवा पोटदुखी, पोट बिघडणे, ताप येणे अशा लक्षणांनी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले अधिक प्रमाणात त्रस्त होतात. कारण, वय वाढले म्हणून आणि लहान मुलांचे वय, वाढ कमी म्हणून प्रतिकारशक्ती त्यामानाने कमी असते.
गरम पाण्याचे फायदे

 • घसा दुखत असेल, तर त्वरित गरम पाणी प्यावे. सर्दी, खोकला असेल तर तुळस, गवतीचहा, मिरे ज्येष्ठ मध घालून पाणी उकळावे व हे पाणी गरम स्वरूपात प्यावे. चांगला उपयोग होतो.
 • सर्दी असली की अंगात थोडी कणकण असते. बारीक ताप, अंगदुखी असते. अशावेळी फक्त गरम पाणी उपयोगी पडतेच; पण पाण्यात पारिजातकाची पाने घालून उकळलेले पाणी दिले तर कणकण कमी होते.
 • बऱ्याचदा फ्लूची साथ असते. त्यात सर्दी-खोकला-ताप असतो. डोकेदुखी असते. नागरमोथा, सुंठ, वाळा, चंदन, पित्तपापडा समभाग एकत्र करून अर्धा चमचा पावडर पाण्यात उकळावी आणि हे पाणी पिण्यास द्यावे. त्यामुळे तापात लागणारी तहान जळजळ कमी होते.
 • थंडीच्या दिवसात गरम वडा भाजी खाण्याची इच्छा होणे गैर नाही; पण क्वचित हे सेवन केल्यानंतर त्रास झाला तर पोटदुखी, पित्ताचा त्रास होतो. अशावेळी फक्त गरम पाण्याने चांगला फायदा होतो. जेवताना मधून-मधून गरम पाणी प्यायल्याने पचन सुलभ होते. गॅसेस होत नाहीत.
 • साध्या पाण्यात १ चमचा बडीशेप घालून पाणी उकळावे. हे पाणी गरम स्वरूपात दिल्यास पोटदुखी निश्‍चित कमी होते. जुलाब, मुरडा येणे या तक्रारी जोडीला असतील, तर बडीशेप आणि सुंठ (पाव चमचा) एकत्र करून पाणी उकळावे व सेवन करावे. सुंठेमुळे अपचन दूर होते.
 • पोटदुखी कमी होते; पण प्रवासात किंवा कुठेही बाहेर असताना पोटदुखी झाल्यास गरम पाणी ओवा खाऊन बरे वाटते.
 • बऱ्याच जणांना भूक उत्तम लागते; पण थोडे खाल्ले की पोट जड होते. अशावेळी जेवणातले पदार्थ पचायला हलके देऊन जेवताना गरम पाणी रोज द्यावे. त्याने पोटाचा जडपणा नक्की कमी होतो.
 • थंडीमध्ये तशी तहान कमी लागते. त्यामुळे पाणी कमी प्यायले जाते. परिणामी लघवीला जळजळ, युरिन इन्फेक्शन, लघवीच्या ठिकाणी खाज येणे, कोरडेपणा जाणवणे, लघवी करताना प्रमाण कमी होणे अशा तक्रारी दिसतात. विशेषतः ज्येष्ठ महिलांमध्ये अधिक दिसतात. अशावेळी धने पाण्यात उकळून पाणी गार करावे. गाळून घेऊन कोमट करून आवश्‍यक तेव्हा सेवन करावे.
 • पाण्यात त्रिफळा चूर्ण १ चमचा घालून उकळावे व कोमट झाल्यावर या पाण्याने लघवीची जागा २-३ वेळा धुवावी. त्याने खाज कमी होते. त्रिफळा उत्तम जंतूघ्न आहे (antibiotic) त्यामुळे जंतुसंसर्ग कमी करण्यास मदत करते.
 • काही घरगुती कार्यक्रम, मंगलकार्ये यात वेळी-अवेळी जेवण होते आणि तोंडाची चव जाते. भूक लागत नाही, अशावेळीसुद्धा गरम पाण्यात लिंबू पिळून मीठ घालून लिंबूपाणी प्यावे किंवा फक्त गरम पाणी प्यावे. चांगला फायदा होतो.
 • अनेक जण वजन कमी व्हावे, म्हणून गरम पाणी घेतात; पण त्याच्या जोडीला आहार (डाएट) सांभाळणे गरजेचे असते. त्यामुळे याबाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही उत्तम! गरम पाणी आणि त्याचे उपयोग आपण पाहिले तरी काही बाबतींत काळजी घेणे आवश्‍यक ठरते.

(लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...