agriculture story in marathi, Mira masale brand, vambori, rahuri, nagar | Agrowon

संघर्ष, अभ्यासातून नावाजला ‘मीरा मसाले’ ब्रॅंड
अनिल देशपांडे
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

भविष्यकालीन योजना
येत्या काळात ‘व्हेज व नाॅनव्हेज’ प्रकारातील आठ ते दहा मसाले बाजारात आणण्याचे मोरे यांचे उद्दीष्ट आहे. इन्स्टंट प्रकारात गुलाबजामून, खमंग ढोकळा, चकली भाजणी, इडली तसेच कैरी व लिंबू लोणचे बाजारात येत आहेत.

अनेक अडचणी व संघर्षांचा सामना करून राहुरी (जि. नगर) येथील अनिरुद्ध मोरे यांनी मसाले उद्योगात आपले पाय यशस्वीपणे रोवले आहेत. सुमारे दोन कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करणाऱ्या मोरे यांच्या उद्योगाने सुमारे साडेचारशेपर्यंत वितरकांचे जाळे तयार केले आहे. वैशिष्ट्यपूर्ण व विभाग निहाय मागणी अोळखून ‘मीरा मसाले’ ब्रॅंडने त्यांनी विविध उत्पादनांची विस्तृत श्रेणीच तयार केली आहे.
 

वांबोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील अनिरुद्ध मोरे यांनी मसाले उद्योगात आपले पाय यशस्वीपणे रोवले आहेत. सुमारे आठ वर्षांचा त्यांचा उद्योग उभारणी, विकास व यश असा प्रवास सांगता येईल. त्यांचे वडील डॉ. हरी गेणुजी मोरे राहुरी येथील डॉ. महात्मा फुले कृषी विद्यापीठात अन्न प्रक्रिया विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ आहेत. सहयोगी अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला.
पीएचडीसाठी ते लंडनला गेले असताना त्या चार वर्षांच्या काळात त्यांच्या पत्नी सौ. मीरा यांनाही तेथील अन्न प्रक्रिया कंपनीत कामाचा अनुभव घेता आला. तेथे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. आई-वडीलांचाच वारसा आज अनिरुद्ध त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे चालवत आहेत

मसाले उद्योगाची सुरवात
अनिरुद्ध यांचे शिक्षण बीसीएस(संगणकीय) व एमबीए पर्यंत झाले आहे. पुणे येथील दोन कंपन्यांत त्यांनी अनुभवही घेतला. मात्र नोकरी करण्यापेक्षा आपण उद्योजक व्हावे ही त्यांची मनिषा होती.
एका अन्नप्रक्रिया कंपनीत त्यांनी कामाचा अनुभवही घेतला. घरच्यांच्या मार्गदर्शनातून मसाले उद्योगाचा पर्याय पुढे आला. त्यातून सुरू झाला प्रकल्प उभारणीचा अभ्यास व संशोधन.

मागणी काय अोळखली?

 • प्रक्रियायुक्त पदार्थ असल्याने टिकाऊ क्षमता होती. ते खराब होण्याचा धोका कमी होता.
 • मसाल्यांना सातत्याने मागणी आहे. ही बाजारपेठ दिवसेंदिवस विस्तारत आहे.
 • थेट बाजारातून मसाले खरेदी करण्याकडे कल

सुरवातीचा संघर्ष
काही उद्योगांना भेटी देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘बिझनेस सिक्रेट’ या नावाखाली
कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते. हा अनुभव निराशेचाच होता. मात्र मोरे यांनी वाट सुरूच ठेवली. या वाटचालीत उद्योजक संदीप डेरे, सुनील गाडे, राहुरी येथील कृषी विद्यापीठातील अन्न तंत्रज्ञान विभागातील तज्ज्ञ डॉ. विक्रम कड, डॉ. भानुदास मोरे यांची मोठी मदत झाली.

उद्योगासाठी जागेचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे होते. राहुरी लघू औद्योगिक वसाहतीतील १८ गुंठे जागा घेण्याचे ठरले. यात एक ते सव्वा वर्ष गेले. त्यासाठी संघर्ष करावाच लागला. सरकारी यंत्रणांचा जवळून अनुभव आला.

केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र सातत्याने सरकार दरबारी न्याय मागूनही अद्याप प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यासाठी न्यायालयीन लढाई सुरूच आहे. तीस ते चाळीस लाख रुपयांचे अनुदान एव्हाना मिळाले असते तर प्रारंभीच्या वाटचालीचा वेग अधिक गतीमान झाला असता. सुरवातीच्या अस्तित्वाच्या लढाईतच खूप ताकद खर्ची पडली. त्यातून प्रकल्प वाचू शकेल की नाही अशीच स्थिती होती.

सुमारे ८० लाख रुपयांचे मुदत कर्ज व १६ लाख रुपयांची ‘सीसी’ असे भांडवलासाठीचे स्वरूप होते. एका खासगी बॅंकेने २०१३ मध्ये कर्जसाह्य केले. त्या आधी एकाही राष्ट्रीयकृत बॅंकेने त्यासाठी तयारी दाखविली नाही. त्यानंतर २०१६ मध्ये आणखी एका सहकारी बॅंकेने ६० लाखांचे मुदतकर्ज व चाळीस लाखांची सीसी या स्वरूपात प्रकल्पास कर्ज मंजूर केले. जादा व्याजदाराने बऱ्याच आर्थिक मर्यादा आल्या. उधारीचे पैसे लवकर मिळत नव्हते. गुंतून पडलेले भांडवल वसूल करण्यातच प्रयत्न झाले. अखेर संघर्ष, प्रयत्न, अभ्यास यातून आज प्रकल्पाची वाटचाल सुकर झाली आहे.

आजचा उद्योग दृष्टीक्षेपात

 • वार्षिक उलाढाल- सुमारे दोन ते सव्वा दोन कोटी रुपये
 • महिन्याला उत्पादन- सुमारे २२ ते २५ टन
 • मसाला उत्पादने रेंज- सुमारे नऊ प्रकार
 • वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने- हळद, मिरची, धना पावडर
 • यंत्रसामग्री- अत्याधुनिक व स्वयंचलित यंत्रणा- क्षमता यंत्रनिहाय सुमारे २५० किलो ते पाचशे किलोपर्यंत प्रतितास
 • यंत्रसामुग्रीत स्थानिक गरजेनुसार डॉ. विक्रम कड व डॉ. हरी मोरे यांनी काही तांत्रिक बदल केले.
 • मीरा मसाले हा ब्रॅंड

बाजारपेठेसाठी प्रयत्न
अन्य कंपन्यांच्या ‘ब्रॅन्डेड मसालें’नी आपले स्थान भक्कम केले होते. त्यात वेगळेपण ग्राहकांच्या पसंतीस उतरवणे महत्त्वाचे होते. सुरवातीला घाऊक विक्रेत्यांनी जवळदेखील फिरकू दिले नाही. मग गावोगावच्या लहान व्यापारी वर्गावर लक्ष केंद्रित केले. थेट विक्री केली. दरही थोडे कमी ठेवले. प्रारंभीची काही वर्षे नफा हा उद्देशच नव्हता. त्या त्या स्थानिक निहाय ग्राहकांना आपला ब्रॅंड रुचकर वाटेल अशा पद्धतीने मसाला रेसीपी बनवल्या. ग्राहकांच्या ‘फीडबॅक’ नुसार रंग, तिखटपणा, स्वाद यासाठीच्या प्रमाणात बदल केले.

 सध्याचे विक्री नेटवर्क

 •  डीलर, स्टॉकीस्ट, होलसेल, रिलेटर आदी मिळून एकूण संख्या- सुमारे ४०० ते ४५०. यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. विदर्भ यासहित गुजरात, दमण, दीव, सिल्व्हासा आदींपर्यंत विस्तार
 • संतीष गागरे, अर्जून गांगर्डे यांच्याकडून सहकार्य
 • पाच रुपयांच्या पाऊच पॅकिंगापासून ते शंभर ग्रॅम, पाचशे ग्रॅम एक किलो, पाच किलो असे पॅकिंग
 • काही कंपन्यांकडून घाऊक मागणी. त्यांना बल्क पुरवठा -
 • सुरवातीच्या काळात महाविद्यालये, वसतिगृहे यांच्या कॅंटीनलाही प्रायोगिक तत्वावर मसाले पुरवठा
 • खवैय्यांच्या आवडीनुसार त्यात बदल
 • मध्यप्रदेशातील बाजारपेठांचा अभ्यास
 • स्थानिक बाजारपेठेतूनच कच्चा माल खरेदी होतो.
 • स्थानिक पातळीवर नेवासा, श्रीरामपूर येथून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी
 • शेतकरी गटांकडे ‘आत्मा’च्या माध्यमातून संपर्क
 • नोटीबंदीत दमण दीवकडील एका मोठ्या कंपनीची मागणी हातात होती. ही संधी घेतली.
 • कंपनीसोबत करार करून त्यांच्या मागणीनुसार कच्चा माल खरेदी केला. त्यानुसार त्यांना उत्पादनांचा पुरवठा केला. तीन टनांपासून सुरू झालेला हा पुरवठा पुढे पंधरा टनांपर्यंत वाढला. मात्र जीएसटी लागू झाला. त्यात तांत्रिक अडचणी आल्याने हा व्यवहार अडचणीत सापडला.
 • त्यानंतर नगर जिल्ह्यातीलच कंपन्यांची कामे मिळाली. त्यांना मागणीनुसार पंधरा ते वीस टन माल पुरवला जातो.

संपर्कः अनिरुध्द मोरे- ९८२२६६८२२८

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
तुझे आहे तुजपाशी जगाच्या सरासरीच्या दीडपट पाऊस भारतात पडतो तरी...
सूक्ष्म सिंचनात अडचणी मोठ्या राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
ठिबकचा तिढा सुटला, नोंदणीला होणार सुरवातनागपूर  ः ठिबक संदर्भातील नोंदणीवर वितरकांनी...
महिला बचत गटाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...
शेती अन् ग्रामविकासासाठी आलो एकत्रअकोला शहरात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी...
थेट शेतीमाल विक्री ठरली नावापुरतीचपुणे  ः फळे भाजीपाला नियमनमुक्तीनंतर शेतकरी...
‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रासाठी...जळगाव  ः खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीसंबंधी...
गटशेतीला प्रोत्साहनासाठी निकषांत बदलपुणे : राज्याच्या गटशेती धोरणाला आलेली मरगळ...
जळगावला ‘हीट’चा चटका ः पारा ३८ अंशांवरपुणे : राज्यात ऑक्टोबर हीटच्या चटक्यात जळगाव...
संकटातील सूतगिरण्यांना वीज दरवाढीचा...कोल्हापूर : महावितरणने वीज दरवाढीचा बडगा...
उसाच्या जनुकीय संरचनेतून उलगडली अनेक...गेल्या अनेक शतकांपासून ऊस हे पीक साखरेसोबतच...
दुर्गम सातपुड्यात नवतंत्रज्ञानाचा...नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील दुर्गम धनाजे...
‘ब्रॉयलर’ संगोपनासोबत भक्कम विक्री...नांदेड जिल्ह्यातील झरी (ता. लोहा) येथील मारुतीराव...
चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्यास सुरवातपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले तितली...
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणारसांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी...