agriculture story in marathi,, modern water management technology, kavathe, satara | Agrowon

डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन यंत्रणा 
विकास जाधव
सोमवार, 22 एप्रिल 2019

सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी सुमारे २२ एकरांत ‘नेटबीट’ या कृत्रीम बुद्धिमतेचा वापर केलेली सिंचन प्रणाली सुमारे चार महिन्यांपूर्वीच आपल्या २२ एकरांत बसवली आहे. उसासह आले, हळदीची शेती या यंत्रणेच्या कक्षेत त्यांनी आणली आहे. या यंत्रणेमुळे पाणी, वेळ, श्रम, पैसे या घटकांमध्ये बचत करणे त्यांना भविष्यात शक्य होणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी सुमारे २२ एकरांत ‘नेटबीट’ या कृत्रीम बुद्धिमतेचा वापर केलेली सिंचन प्रणाली सुमारे चार महिन्यांपूर्वीच आपल्या २२ एकरांत बसवली आहे. उसासह आले, हळदीची शेती या यंत्रणेच्या कक्षेत त्यांनी आणली आहे. या यंत्रणेमुळे पाणी, वेळ, श्रम, पैसे या घटकांमध्ये बचत करणे त्यांना भविष्यात शक्य होणार आहे. 

अलीकडील काळात शेतीत मजूरबळ, पाणी या मुख्य समस्या तयार झाल्या आहेत. अनेक वेळा पाण्याचा अतिरिक्त वापरही केला जात आहे. परिणामी जमिनीची प्रत कमी होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्‍यातील कवठे येथील राहुल आणि अतुल या डेरे या बंधूंनी पाणी व्यवस्थापनावर अधिक भर देत शेती सुकर केली आहे. 

स्वयंचलित व सबसरफेस ठिबक यंत्रणा 
अतुल यांनी २००८ पासून वडिलांसोबत शेती सुरू केली. राहुल हे जिल्हा बँकेत नोकरी सांभाळत तर अतुल पूर्ण वेळ शेती करतात. कुटुंबाची २५ एकर शेती असली तरी वहिवाटीत अवघी ८ ते १० एकर जमीन आहे. या जमिनीचा त्यांनी पूर्णपणे विकास साधला आहे. पंधरा एकर ऊस, तीन एकर हळद व एक एकर आले असे नियोजन आहे. को ८६०३२ वाणाची जोड ओळ पद्धतीने लागवड आहे. आठ फुटांचा पट्टा असून ड्रीप ॲटोमेशन व सबसरफेस पद्धतीची यंत्रणा आहे. त्याद्वारे पाणी नियोजन व एकूण व्यवस्थापनातून सुरू उसाच्या उत्पादनात एकरी १५ ते २० टनांनी वाढ झाली आहे. एकरी ७० ते७५ टन उत्पादन मिळते. 

नव्या तंत्रज्ञानाचा वापर 
डेरे बंधूंना २०१८ मध्ये इस्त्राइल येथे ॲग्रिटके प्रदर्शनाला भेट देण्याची संधी मिळाली. तेथे नेटबीट ही कृत्रीम बुद्धीचा वापर करणारी अत्याधुनिक सिंचन प्रणाली पाहण्यात आली. त्याची सखोल माहिती घेऊन ती शेतात बसविण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली कार्यरत केली. ही यंत्रणा फायदेशीर ठरत असल्याचे अतुल सांगतात. या यंत्रणेतील 
‘रिअल टाइम डेट’ आणि क्लाऊ स्रोतांमधून माहिती विश्लेषित करता येते. त्यादृष्टीने सिंचन सक्रिय करणारी ही देखरेख प्रणाली आहे. 

या यंत्रणेचे भविष्यात मिळणारे फायदे 

  • शेतात सेन्सर बसवल्यानंतर माती, पिके व पाण्याच्या परिस्थितीबद्दल ‘डेटा’ उलब्ध होऊन तो संकलित केला जातो. 
  • तापमान, पाऊस या संदर्भातील सर्व माहितीही उपलब्ध होते. 
  • मनुष्यबळ कमी होण्याबरोबरच खते व पाणी व्यवस्थापन करता येते 
  • सर्व यंत्रणा मोबाईलद्वारे वापरता येत असल्याने आपण कोठेही असलो तरी वापर शक्य होतो. 
  • या यंत्रणेद्वारे हवामानाचे अंदाज आधीच मिळत असल्याने पिकांना पाणी केव्हा द्यावे याचा निर्णय घेता येतो. आर्द्रता, तापमान यांचीही माहिती अशीच मिळते. किडी व रोगाचे अंदाज आल्याने वेळेत फवारणी करता येते. यातून किडी- रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. 
  • जमिनीला पाणी आवश्यक आहे का नाही याचेही मेसेज मिळतात. त्यामुळे जमिनीचा पोत खराब न होण्याबरोबरच पाण्याची बचत होते. 
  • पाण्याचा अनावश्यक वापर कमी झाल्याने ऊस, आले, हळदीच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. 

नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यावर भर 
सध्या डेरे बंधू प्रचलित सूक्ष्म सिंचनाद्वारे आले पिकाचे एकरी ३० गाड्या (५०० किलो प्रतिगाडी) तर हळदीचे एकरी ३० ते ३५ क्विंटल (सुकवलेले) उत्पादन घेतात. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यावर त्यांचा भर असतो. नेटबीट यंत्रणेसाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च केला आहे. इस्त्रायल येथील प्रदर्शनात ११० देशांतील प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. आई हिरबाई व वडील मधुकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते. 
 
संपर्क- राहुल डेरे- ९९७०५४१९४७ 
अतुल डेरे- ९९७५८०१९४६ 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...
कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-...टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर...
वर्धा : रोजगारासाठी स्थलांतरामुळे गावं...वर्धा : शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून...
गावाेगावी पाण्याच्या टॅंकरकडं नजरानगरः तलाव, धरणं कोरडी पडली. कधीच आटल्या नाहीत,...
दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची माहिती...मुंबई : दुष्काळासंदर्भात उत्तर देण्यासाठी...
सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
पतआराखड्याची वाट न बघता खरिपासाठी कर्जपुणे : खरीप पीक कर्जवाटप नियोजनात मुख्य भूमिका...
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
जरंडीत ‘एक गाव, एक वाण’ योजना फसलीनागपूर ः कापसाचे एक गाव एक वाण लावण्याचा आदर्श...
उन्हाचा चटका कायम राहणार पुणे : विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी...
आया मौसम बदली कामार्च ते मे हे तीन महिने शासकीय अधिकारी-...