agriculture story in marathi, multicropping system, shirpur jain, malegaon, vashim | Agrowon

कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात आघाडीवर यादवराव ढवळे
गोपाल हागे
मंगळवार, 26 मार्च 2019

वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील यादवराव केशवराव ढवळे यांनी शेतीत विविध प्रकारची प्रयोगशीलता जपली आहे. नवीन तंत्रज्ञानाची कास धरून उत्पादन व उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बहुविध किंवा मिश्र पीकपद्धतीचा वापर हेदेखील त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 
 

वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील यादवराव केशवराव ढवळे यांनी शेतीत विविध प्रकारची प्रयोगशीलता जपली आहे. नवीन तंत्रज्ञानाची कास धरून उत्पादन व उत्पन्नवाढीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बहुविध किंवा मिश्र पीकपद्धतीचा वापर हेदेखील त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 
 
वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील यादवराव ढवळे यांची २४ एकर शेती आहे. कायम प्रयोगशीलता जपत हंगामी पिकांना फळबाग पिकांची जोड त्यांनी दिली आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दरवर्षी होणाऱ्या शिवार फेरीत ढवळे १९९० पासून सलगपणे हजेरी लावतात. स्वतःबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही घेऊन जातात. तेथे विद्यापीठाचे नवे संशोधन, तंत्रज्ञान पाहतात. तेथील नवे वाण आणून त्याचे प्रयोग करतात. आपण केलेल्या प्रयोगांची माहिती अन्य शेतकऱ्यांना व्हावी, त्यातील तंत्र शेतकऱ्यांना कळावे, यासाठी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांत ते संवाद घडवून आणण्याचे काम करतात. 

नव्या वाणांच्या लागवडीचा छंद 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हरभऱ्याच्या हिरवा चाफा, गुलक १, काक-२, काक-४ हे वाण सर्वांत आधी ढवळे यांनी आपल्या शेतात लावले. त्यापासून बियाणे तयार करून त्याची स्वतः विक्रीही केली. शेतीतील प्रयोगांसाठी वडील (कै.) केशवराव ढवळे यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली आहे. गुलक वाणाचे एकरी ८ ते १० क्विंटल तर काक-२ (काबुली हरभरा) वाणाचे एकरी ६ ते १३ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. तुषार पद्धतीने पाणी देतात. 

उन्हाळी तिळाचा प्रयोग 
अकोला येथीलच कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण असलेल्या एकेटी १०१ तिळाचे १५ ग्रॅम बियाणे २००९ मध्ये मिळवले. त्यापासून पुढे एक किलो बियाणे तयार केले. केळी पिकात ५०० ग्रॅम लागवड करून दीड क्विंटल बियाणे तयार केले. तेव्हापासून सलगपणे उन्हाळी तीळ ते घेतात. एकरी चार ते सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. तिळाला ७००० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो. यंदा हा दर १५ हजार रुपये होता. काही वेळा २० हजार रुपये दरानेही तिळाची विक्री त्यांनी साधली आहे. 

साग व सीताफळ शेती 
हलक्या जमिनीत वनशेती व फळशेतीचा प्रयोग केला. यात १० बाय १० फूट अंतरावर सागाची लागवड केली. त्यात सीताफळ लावले. पंधरा वर्षे वयाच्या सागाची यावर्षी तोडणी केली. सीताफळाची झाडे उभी आहेत. सागाची विक्री नगावर केली. गोलाई व घनफूट निकषांनुसार मोठा नग २००० रुपये तर त्याहून लहान नगाची विक्री १५०० ते ६०० रुपयांपर्यंत दराने केली. त्यातून ८० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे. 

हरभरा व करडई 
पट्टा पद्धतीने सहा ओळी हरभरा व तीन ओळी करडई अशी लागवड केली. यामध्ये अंदाजे चार एकर हरभरा तर दोन एकर करडई होती. एकरी सहा क्विंटल हरभरा मिळाला. तर सहा एकरांत करडईचे २६ क्विंटल उत्पादन मिळाले. 

हळद लागवडीत सातत्य 
वाशीम जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र शिरपूर भागात अधिक आहे. ढवळे २००० पासून हळदीचे पीक घेत आहेत. सेलम वाणाच्या वाळलेल्या हळदीचे एकरी २० ते २५ क्विंटलपर्यंत तर एकदा ३५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पीक घेताना फेरपालट हा मुद्दा त्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटतो. एका बियाणे क्षेत्रातील कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी सखाराम वाळले यांचे मार्गदर्शन त्यांना लागवडीसाठी मिळाले. भाडेतत्त्वावर यंत्र घेऊन उकळणी आणि पॉलिशिंग करून विक्री होते. 

संत्र्याची फळबाग 
नागपूर येथील लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रातून २०१५ मध्ये संत्र्याची २५० कलमे आणून लागवड केली. यावर्षी मोठ्या प्रमाणात फळे लगडली आहेत. दोन वर्षांपूर्वी नव्याने ४०० झाडांची लागवड केली आहे. ढवळे यांना वृक्ष लागवडीचाही छंद आहे. त्यातून रामफळ, चिकू, आंबा अशा विविध फळझाडांची बांधावर तसेच शेतात लागवड केली आहे. ते गुलाबापासून आंब्यापर्यंत सर्व कलमे तयार करतात. 

गव्हाच्या विविध वाणांची लागवड 
गव्हाची पेरणी एक फूट अंतरावर करतात. यामुळे फुटवे जास्त येतात व दाण्याची संख्या जास्त मिळते. परिणामी, उत्पादन वाढीत मोठा हातभार लागत आहे. मध्य प्रदेशातील चंदोशी, शरबती या वाणांचा वापर त्यांनी केला आहे. बीजोत्पादनही घेतले आहे. गव्हाची स्वच्छता करून विक्री होत असल्याने बाजारभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

सामूहिक शेततळे 
पावसाळा कमी होत असल्याने सिंचनासाठी पाणी कमी पडते आहे. यावर तोडगा म्हणून ३४ बाय ३४ मीटर व वीस फूट खोलीचे शेततळे तयार केले. सोबतच गावाजवळील शेतामधून नाला वाहतो. त्यावर कृषी विभागामार्फत सिमेंट बंधारा बांधून घेतला. यामुळे विहिरींची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. 

संपर्क- यादवराव ढवळे- ९८२३३७६८११ 
 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
हमीभाव वाढीचा बागुलबुवा आणि वास्तवलोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या...
‘कॅप्सूल’ सुधारणार मातीचे आरोग्यमहाराष्ट्र राज्यासाठी या वर्षी रासायनिक खतांची...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...