Agriculture story in Marathi, New series on selection of buffalo | Agrowon

निवड जातिवंत दुधाळ म्हशींची...
डॉ. एम. व्ही. इंगवले
बुधवार, 3 जानेवारी 2018

बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हैसपालन हा मुख्य व्यवसाय अाहे. परंतु यशस्वी म्हैसपालनासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. कष्ट अाणि योग्य व्यवस्थापनाबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली तरच या व्यवसायामध्ये चांगले यश मिळू शकते. म्हशीच्या व्यवस्थापनातील सूत्रे सांगणारी मालिका अाजपासून दर बुधवारी देत अाहोत.

बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हैसपालन हा मुख्य व्यवसाय अाहे. परंतु यशस्वी म्हैसपालनासाठी शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. कष्ट अाणि योग्य व्यवस्थापनाबरोबर शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड मिळाली तरच या व्यवसायामध्ये चांगले यश मिळू शकते. म्हशीच्या व्यवस्थापनातील सूत्रे सांगणारी मालिका अाजपासून दर बुधवारी देत अाहोत.

दुग्धोत्पादनाकरिता म्हैसपालन करताना उत्तम दूध देणारी म्हशीची प्रजातीची निवड ही एक प्रमुख बाब आहे. भारतामध्ये विविध राज्यांतील हवामान, चारा व दुधासाठीची मागणी यावरून म्हशीच्या प्रजाती विकसित झाल्या आहेत. व्यवसाय करताना प्रामुख्याने जास्त उत्पादन क्षमता असणारी तसेच उत्तम प्रजननक्षमता असणारी म्हशीची जात फायदेशीर ठरते. मुऱ्हा, म्हैसाना, जाफराबादी व पंढरपुरी या म्हशीच्या प्रामुख्याने महत्त्वाच्या प्रजाती असून बहुतांश म्हैसपालक व्यवसायाकरिता वरीलपैकी प्रजातीची निवड करतात.

म्हशीच्या विविध प्रजाती व वैशिष्ट्ये
१) मुऱ्हा
मुऱ्हा ही प्रजाती जगामध्ये दूध उत्पादनवाढीसाठी सर्वात उत्तम जात म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या शाश्‍वत दूध उत्पादनासाठी उच्च आनुवंशिक क्षमता असणाऱ्या मुऱ्हा म्हशीला देशात व विदेशात सर्वात जास्त मागणी आहे.
मूळ वास्तव्य ः
हरियाना राज्यातील मुख्यत्वे रोहतक व दिल्ली तसेच उत्तर प्रदेशमधील मीरत येथे प्रामुख्याने आढळते.
शरीर रचना ः
म्हशीचा रंग गडद काळा असून मान लांब व शिंगे आतून गोल वाकलेली असतात. माथा गोल आणि उभारलेला, कान लांब असतात. शेपटी लांब असून गोंडा काळा असतो आणि ठळक दूध नलिका शरीराला चिकटून असणारी कास ही म्हशीची गुणवैशिष्ट्ये आहेत.
दूध उत्पादन ः
एका वेतात सरासरी दूध उत्पादन २००० लिटर इतके असून ३००० ते ४००० लिटर इतके दूध उत्पादन मिळते. वजन ५०० ते ५५० किलो असून उत्तम प्रजननक्षम म्हशीमध्ये दोन वेतातील अंतर साधारणपणे १४ ते १५ महिने आहे. स्निग्धाचे प्रमाण ६ ते ७ टक्के इतके असून भाकड काळ हा ९० ते १२० दिवस इतका आहे. उत्तम वाढवलेल्या म्हशीमध्ये प्रथम विण्याचे वय ३ ते ३.५ वर्षे इतके आहे. मुऱ्हा जातीच्या रेड्याचा वापर कमी दूध देणाऱ्या व गावठी म्हशीच्या सुधार कार्यक्रमासाठी केला जातो.

२) जाफराबादी
मूळ वास्तव्य ः
गुजरात राज्यातील काठीयवाड, सौराष्ट्र व कच्छच्या भागात प्रामुख्याने आढळते.
शरीर रचना ः
जाफराबादी म्हैस वजनाला भारी असून वजन ५०० ते ६०० किलो असते. माथा मोठा, फुगीर असून शिंगे गोल रुंद असतात व खाली वळून नंतर गोल झालेली असतात. कान लांब, पाय भारी व शेपटी लांब असते.
दूध उत्पादन ः
सरासरी एका वेतातील दूध उत्पादन १८५० ते २२०० लिटर इतके असते व उच्च वंशावळीच्या म्हशी ३००० लिटरपेक्षा जास्त उत्पादन देतात. दुधामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण ६ ते ७ टक्के इतके असते. उत्कृष्ट संगोपन असलेल्या म्हशीमध्ये प्रथम वेताचे वय ३.५ ते ४ वर्षे इतके असून दोन वेतातील अंतर १४ ते १५ महिने असते. भाकड काळ १०० दिवस व त्याहून अधिक असतो.

३) म्हैसाना ः
मूळ वास्तव्य ः
गुजरात राज्यातील म्हैसाना जिल्ह्यात ही म्हैस प्रामुख्याने आढळते. काठेवाड, जुनागढ या भागात म्हशीच्या उत्तम संकरापासून मुऱ्हा आणि सुरती या म्हशीच्या प्रजाती तयार झाल्या आहे व दोन्ही प्रजातीतील उत्तम गुणांचा आविष्कार असलेली ही प्रजाती आहे.
शरीर रचना ः
शरीर मध्यम आकाराचे असून आटोपशीर असते. म्हशीचा रंग काळा असून पायापाशी किंचित पांढरा असतो. शेपूट गोंडा काळा किंवा पांढरा असतो. शिंगे कान मध्यम आकाराची असते. खाली वळून नंतर बाहेर जाऊन वर वळतात.
दूध उत्पादन ः
सरासरी दूध उत्पादन १८०० ते २००० लिटर इतके आहे. प्रथम वेताचे वेय ३ ते ४ वर्षे असून दोन वेतातील अंतर १५ ते १८ महिन्यांपर्यंत असते. म्हशीचा भाकड काळ हा १०० ते १५० दिवस असतो.

४) पंढरपुरी ः
मूळ वास्तव्य ः
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी तालुक्‍यामध्ये या म्हशी प्रामुख्याने दिसतात. कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यात या म्हशी आढळून येतात.
शरीर रचना ः
आकारमानाने मध्यम, बांधेसूद मांसलपणा कमी असणारी आहे. म्हशीची शिंगे तलवारीसारखी लांबलचक व डाैलदार असतात. चेहरा निमूळता, माथा मध्यम, डोळे पाणीदार, लांब कान व टोकदार असतात. म्हशीची कास आटोपशीर असून कास मोठी असते. शेपटी लांब गोंडा काळा किंवा पांढरा असतो. वजन सुमारे ४०० ते ४५० किलोग्रॅम असते.
दूध उत्पादन ः
एका वेतात सरासरी १२०० लिटर इतके दूध उत्पादन मिळते, परंतु उच्च वंशावळीच्या म्हशी १६०० लिटर दूध देतात.

म्हशीची निवड ः
बहुतांश पशुपालक म्हशीची निवड जवळच्या बाजारातून करतात. जे पशुपालक मोठ्या प्रमाणावर म्हैसपालन करण्याकरिता दलालाकडून किंवा स्वतः ज्या भागात म्हशीचे मूळ वास्तव आहे येथून म्हशी करतात. ज्या पशुपालकांना दोन किंवा तीन म्हशी खरेदी करावयाच्या असतात ते बाजारातून विण्याच्या अगोदरच्या म्हशी किंवा गाभण म्हशी खरेदी करतात. खरेदी करताना म्हशीची किंमत ही म्हशीची प्रजात, वय, वेताची संख्या व दूध देण्याची क्षमता यावर अवलंबून असते. बऱ्याच वेळा म्हशीच्या दुग्धोत्पादनाची खोटी माहिती दिली जाते. अशा पद्धतीने म्हशीची निवड केल्यास व्यवसायात मोठे अार्थिक नुकसान होऊ शकते.

१) पूर्वी म्हशीला कास दाह अाजार असल्यास एक किंवा अनेक सड बंद असण्याची शक्‍यता असू शकते.
२) विताना म्हशीला वासरू अडकणे, झार न पडणे, इ. आजार होऊ शकतात.
३) विल्यानंतर रेडकांचे मरतुकीचे प्रमाण म्हशीमध्ये जास्त असते.

जे पशुपालक दलालामार्फत किंवा स्वतः म्हशीची खरेदी करतात अशावेळेससुद्धा गाभण किंवा विलेल्या म्हशीची खरेदी करतात. दलालामार्फत म्हशी मागविण्यात येतात. अशा वेळेस ९-१० म्हशीमध्ये २ ते ३ म्हशी या कमी प्रतीच्या असतात. सद्यःस्थितीत मुऱ्हा, म्हैसाना किंवा जाफराबादी म्हशीची किंमत ६०,००० ते १,००,००० पर्यंत आहे. त्यामुळे म्हैस खरेदी ही बिनचूक व योग्य होणे हे गरजेचे आहे.

म्हैस खरेदी करताना घ्यावयाची काळजी

 • शक्‍यतो नुकतीच विलेली म्हैस वासरासह विकत घ्यावी व सकाळी व संध्याकाळी स्वतः दूध उत्पादन पाहून खात्री करून घ्यावी. हिस्सार, जिंद, रोहतक इत्यादी ठिकाणी एजंट अशा म्हशी दाखवून खरेदी करून देतात.
 • म्हशीचे दूध राखून कास मोठी दाखवून बाजारात विक्री करतात. त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.
 • ज्या गोठ्यामध्ये किंवा मालकाकडे म्हशीच्या प्रजनन, दूध उत्पादन इ. निगडित रेकॉर्ड आहे अशाकडून म्हैस खरेदी करणे उत्तम असते.
 • म्हशीची खरेदीपूर्वी शक्य असल्यास रक्त नमुन्याद्वारे सांसर्गिक गर्भपात इ. रोग निदानाची चाचणी करून घ्यावी.
 • म्हशीची खरेदी ज्या प्रदेशातून किंवा मालकाकडून करणार आहात तेथून म्हशीचे खाद्य, चारा व संगोपन याबद्दल माहिती जाणून घ्यावी. जेणेकरून तसे संगोपन करणे शक्‍य होईल जेणेकरून म्हशीच्या दुग्धोत्पादनावर परिणाम जाणवणार नाही.

म्हैस खरेदी करण्यापूर्वी तपासा बाह्य लक्षणे

 • म्हैस शक्‍यतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेतातील असावी जेणेकरून जास्तीत जास्त वेते पुन्हा मिळू शकतात.
 • म्हशीची त्वचा मऊ चमकदार तसेच डोळे सतेज व पाणीदार असावेत. नाकपुडीवरील भाग ओलसर असावा.
 • पाठीचा कणा सरळ असावा तर मान लांब व सडपातळ असावी.
 • पुठ्ठे लांब, रुंद व विस्तृत असावेत, यामुळे गर्भ पोषण चांगले होते, तसेच वासरू अडकण्याचे प्रमाण कमी राहते.
 • म्हशीची कास आकाराने मोठी व सड लांब समान व फुगीर असावेत.
 • पोटाकडून कासेकडे येणारी रक्तवाहिनी टवटवीत, फुगलेली व मोठी असावी. कासेजवळ अनेक फाटे असावेत. पुढील दोन पायातील अंतर जास्त असावे. यामुळे छाती विस्तारण्यास वाव असतो.
 • कमरेवरील हाडे अधिक दूर असावीत, यामुळे पोटाच्या विस्तारास अधिक वाव मिळतो. शेपटीजवळील हाडे व कास यामधील अंतर अधिक असावे.

संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२
(स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला
)

फोटो गॅलरी

इतर कृषिपूरक
भारतीय मागूर माशांचे बिजोत्पादन...कमी संवर्धन कालावधी (सहा ते सात महिने), कमी...
पहिला अधिकृत जागतिक मधमाशी दिन आज होणार...संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी...
राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे...राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष...
प्रयत्न, सातत्यामुळेच मिळाला...प्रयत्न व त्यात सातत्य हाच खरा तर यशाचा मंत्र आहे...
प्रतिबंधात्मक उपचारांनी टाळा जनावरांतील... जास्त तापमानामुळे जनावरांना उष्माघात...
देश-परदेशासह पर्यटकांचे आकर्षण ठरलेले ‘...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भंडारदऱ्याच्या...
स्वच्छता, योग्य व्यवस्थापनातून टाळा...शेडमधील अस्वच्छता अाणि अनियोजित व्यवस्थापनामुळे...
पूर्वतयारीनेच करा मत्स्यबीजाचे संवर्धनमत्स्यसंवर्धनामध्ये अधिक उत्पन्न घ्यायचे असल्यास...
कृत्रिम बुद्धिमत्ता करते गाईंच्या...परदेशातील पशुपालकांकडे पीक लागवड क्षेत्राच्या...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
पशुपालन सल्ला शेळीपालन व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी दोन वर्षाला...
जनावरांमध्ये वजन मापनाचे महत्त्वजनावरांना दैनंदिन व्यवस्थापनात त्यांच्या शरीर...
अोळखा जनावरांतील शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
उत्तम आर्थिक नियोजनातून व्यावसायिक...आंतरवाली (ता. नेवासा, जि. नगर) येथील अंकुश कानडे...
पशुपालन सल्लावाढत्‍या उष्‍णतेमुळे जनावरांच्या आहारावर विपरीत...
जिरायती भागात आठ वर्षे यशस्वी पोल्ट्री...चिंचनेर वंदन (ता. जि. सातारा) या सैनिकी परंपरा...
शस्त्रक्रियेने बरा होतो जनावरांतील...मूतखडा हा रोग प्रमुख्याने खच्चीकरण केलेला बैल,...
जनावरांतील गर्भाशय संसर्ग ः लक्षणे अन् ...प्रसूतीनंतर उद्‌भवणारा गर्भाशय संसर्ग हा त्या...
कुक्कुटपालन सल्लाकुक्कुटपालन व्यवसायात ६५ टक्के फायदा...
गाभण गाईंचे योग्य व्यवस्थापन ठेवा...गाभण गाईची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. गर्भाची...