पाण्याची काळजी घेतली पाहिजे...

पाणी
पाणी

मोठ्या खळाळणाऱ्या नद्यांपासून ते बाटलीबंद पाण्यापर्यंत जसा पाण्याचा प्रवास झाला आहे, तसा आरोग्याचाही झाला आहे. म्हणूनच जीवनदायी पाण्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०२५ सालापर्यंत जगाची अर्धी लोकसंख्या पाण्याच्या कमतरतेचा सामना करेल. जसे पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्याप्त आहे तसा आपल्या शरीराचा ६० टक्के भाग हे पाणी आहे. म्हणूनच आपल्या अवयवांप्रमाणे पाण्याची काळजी घेतली पाहिजे. पाण्याच्या दूषित संसर्गाने, कमतरतेमुळे, क्षारांच्या प्रमाणामुळे, त्यामध्ये विरघळणाऱ्या वायूंमुळे, त्याच्या साठवण्याच्या पद्धतीमुळे किंवा वितरणाच्या पद्धतीमुळे अनेक आजार संभवतात. उदा. सूक्ष्मजीवांमुळे होणारे आजार. पोलिओ, जुलाब उलट्या, कावीळ, जंत, नारू, टायफोइड, कॉलरा. पैकी नारू व पोलिओ जवळपास निर्मूलित झाले आहेत.

पाणी दूषित होण्याची कारणे

  • पिण्याचे पाणी दूषित होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रक्रिया न केलेले सांडपाणी. पाण्याचा स्रोत (विहीर, तळे) दूषित होण्याची इतरही करणे आहेत. ती म्हणजे प्राणी खाद्य, गोठे, खत व कीटकनाशक साठवणे/फवारणे, उघड्यावरील मलमूत्र विसर्जन.
  • पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे व अतिरिक्त क्षारांच्या प्रमाणामुळे होणारे मुतखड्यांसारखे आजार, पाण्यात विरघळलेल्या फ्लूरायीड व अर्सेनिकसारख्या खनिजांमुळे हाडे व दात ठिसूळ होणे असे आजार होतात. अनेक ठिकाणी प्लॅस्टिक फायबरसुद्धा पाण्यात सापडले आहे. हे रोग टाळण्यासाठी सुरक्षित व पुरेसे पाणी सर्वांना मिळणे आवश्यक आहे.
  • डब्लूएचअोनुसार माणशी दररोज १५० लिटर पाणी आवश्यक आहे. तेसुद्धा आपण राहत असलेल्या ठिकाणापासून अर्ध्या तासाच्या अंतरात. पण ते शक्य नसल्यामुळे माणशी किमान ४० लिटर तरी पाणी दररोज मिळावे असे लक्ष्य आहे.
  • पाण्याची साठवण

  • पाणी शुद्ध केल्यानंतर व्यवस्थित साठवणेसुद्धा आवश्यक आहे. अन्यथा त्यात परत जंतुसंसर्ग होऊ शकतो. पाणी पिण्याआधी हात धुणे. पाण्यात हात न बुडवणे.
  • पाणी झाकून व बंदिस्त ठेवणे, जेणेकरून माशा, डास त्यावर बसणार नाही अशी काळजी घ्यावी लागते.
  • रोज निश्चित स्वरूपाचा स्वच्छ पाणीपुरवठा नसेल तेव्हा ऐनवेळच्या वापरासाठी पाणी स्वच्छ करून उकळून गार करून बाटलीबंद करून साठवले पाहिजे.
  • पाणी कधीच शिळे होत नाही. खूप दिवस न हलवता स्थिर ठेवल्यास विरघळलेले वायू निघून गेल्यामुळे त्याची चव बदलते. परंतु ते शिळे किंवा पिण्यास अयोग्य होत नाही. असे पाणी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात काही वेळा ओतल्यास (areation) गेलेले वायू परत मिसळून पुन्हा चव येते.
  • सूर्यप्रकाशात न येणारे स्वच्छ, स्थिर पाणी व जिवाणूंचा संसर्ग नसलेले वाहते पाणी कायमस्वरूपी शुद्ध असते. त्याला एक्सपायरी डेट नसते!
  • लेखिका दाैड, जि. पुणे येथे अाय. सी. यु तज्ज्ञ अाहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com