काबुली चण्याचे पौष्टिक स्प्रेड

काबुली चण्याचे पौष्टिक स्प्रेड
काबुली चण्याचे पौष्टिक स्प्रेड

ब्रेड किंवा पोळीवर पसरवून स्प्रेडचे सेवन केले जाते. शहरी भागातील मार्केटमध्ये स्प्रेडला चांगली मागणी अाहे. स्प्रेड अधिक पाैष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये काबुली चण्याचा वापर करता येतो. या स्प्रेडमध्ये काबुली चना हा मुख्य घटक असून त्यामध्ये पिठीसाखर, तेल, चॉकलेट, व्हॅनिला इसेन्स आहे.

स्प्रेडमध्ये डार्क चॉकलेट असल्यामुळे खाण्यास चविष्ट लागतो. काबुली चना हे एक प्रकारचे कडधान्य असून यामध्ये २० टक्के प्रथिने, तसेच डाईटरी फायबर, फोलेट आणि खनिजे असतात. पोषक गुण : ऊर्जा ६८६ किलो ज्यूल, कार्बोदके २७.४२ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ २.५ ग्रॅम खनिजे : लोह २.८ मिलीग्रॅम, कॅल्शिअम ४९ मिलिग्रॅम, फॉस्फरस १६८ मिलिग्रॅम साहित्य : काबुली चने १०० ग्रॅम, पिठी साखर ६० ग्रॅम, तेल ३० ग्रॅम, डार्क चॉकलेट ७० ग्रॅम, व्हॅनिला इसेन्स २ ते ३ थेंब

  • रात्रभर पाण्यामध्ये चणे भिजत ठेवावेत. भिजलेले चणे शिजेपर्यंत पाण्यामध्ये उकळून घ्यावेत. शिजलेले चणे मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत.
  • दुसऱ्या भांड्यामध्ये डार्क चॉकलेट वितळून घ्यावे.
  • मिक्‍सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेले काबुली चणे, पिठीसाखर, तेल, वितळलेले डार्क चॉकलेट, वॅनिला इसेन्स एकत्रित करून घ्यावे.
  • बारीक मिश्रण तयार होईपर्यंत सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
  • हे मिश्रण प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.
  • आरोग्यासाठी फायदेशीर

  • काबुली चण्यामध्ये विरघळणारे व न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे तंतुमय घटक असल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
  • लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तक्षय, अशक्तपणा, डोकेदुखी यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते.
  • तंतुमय घटक आणि प्रथिने असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
  • चण्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्यामुळे शरीरातील इलेक्‍ट्रोलाइटचे प्रमाण समतोल राखण्यास मदत होते.  
  • रक्तदाब कमी होण्यास फायदेशीर ठरते.
  • संपर्क : अस्मिता थोरात, ८०८७१४१३८५ (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com