Agriculture story in marathi, nutritional spread of gram | Agrowon

काबुली चण्याचे पौष्टिक स्प्रेड
अस्मिता थोरात
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

ब्रेड किंवा पोळीवर पसरवून स्प्रेडचे सेवन केले जाते. शहरी भागातील मार्केटमध्ये स्प्रेडला चांगली मागणी अाहे. स्प्रेड अधिक पाैष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये काबुली चण्याचा वापर करता येतो. या स्प्रेडमध्ये काबुली चना हा मुख्य घटक असून त्यामध्ये पिठीसाखर, तेल, चॉकलेट, व्हॅनिला इसेन्स आहे.

ब्रेड किंवा पोळीवर पसरवून स्प्रेडचे सेवन केले जाते. शहरी भागातील मार्केटमध्ये स्प्रेडला चांगली मागणी अाहे. स्प्रेड अधिक पाैष्टिक बनवण्यासाठी त्यामध्ये काबुली चण्याचा वापर करता येतो. या स्प्रेडमध्ये काबुली चना हा मुख्य घटक असून त्यामध्ये पिठीसाखर, तेल, चॉकलेट, व्हॅनिला इसेन्स आहे.

स्प्रेडमध्ये डार्क चॉकलेट असल्यामुळे खाण्यास चविष्ट लागतो. काबुली चना हे एक प्रकारचे कडधान्य असून यामध्ये २० टक्के प्रथिने, तसेच डाईटरी फायबर, फोलेट आणि खनिजे असतात.
पोषक गुण : ऊर्जा ६८६ किलो ज्यूल, कार्बोदके २७.४२ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ २.५ ग्रॅम
खनिजे : लोह २.८ मिलीग्रॅम, कॅल्शिअम ४९ मिलिग्रॅम, फॉस्फरस १६८ मिलिग्रॅम
साहित्य : काबुली चने १०० ग्रॅम, पिठी साखर ६० ग्रॅम, तेल ३० ग्रॅम, डार्क चॉकलेट ७० ग्रॅम, व्हॅनिला इसेन्स २ ते ३ थेंब

  • रात्रभर पाण्यामध्ये चणे भिजत ठेवावेत. भिजलेले चणे शिजेपर्यंत पाण्यामध्ये उकळून घ्यावेत. शिजलेले चणे मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावेत.
  • दुसऱ्या भांड्यामध्ये डार्क चॉकलेट वितळून घ्यावे.
  • मिक्‍सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेले काबुली चणे, पिठीसाखर, तेल, वितळलेले डार्क चॉकलेट, वॅनिला इसेन्स एकत्रित करून घ्यावे.
  • बारीक मिश्रण तयार होईपर्यंत सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे.
  • हे मिश्रण प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवावे.

आरोग्यासाठी फायदेशीर

  • काबुली चण्यामध्ये विरघळणारे व न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे तंतुमय घटक असल्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
  • लोह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्तक्षय, अशक्तपणा, डोकेदुखी यांसारखे आजार कमी होण्यास मदत होते.
  • तंतुमय घटक आणि प्रथिने असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
  • चण्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्यामुळे शरीरातील इलेक्‍ट्रोलाइटचे प्रमाण समतोल राखण्यास मदत होते.  
  • रक्तदाब कमी होण्यास फायदेशीर ठरते.

संपर्क : अस्मिता थोरात, ८०८७१४१३८५
(के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

इतर कृषी प्रक्रिया
पायाभूत सुधारणेतून मिळेल अन्न...काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि कोल्ड चेनमधील पायाभूत...
जपानी तंत्राच्या ‘राइस मिल’द्वारे...तंत्रज्ञानाचा आविष्कार घडविणे तेव्हाच शक्य होते,...
घरगुती प्रक्रियेद्वारे बोरांचे...बोर हे अत्यंत पोषक, तरिही दुर्लक्षित फळ आहे....
सोलर टनेल ड्रायरचा वापर ठरतो फायदेशीरसोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे...
तृणधान्यापासून बनवा खाद्यपदार्थतृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा...
लिंबू प्रक्रियेतून मिळतील रोजगाराच्या...औषधी गुणधर्म असलेले लिंबू आरोग्यासाठी अतिशय...
तृणधान्यापासून बनवा खाद्यपदार्थ तृणधान्यापासून तयार केलेल्या पारंपरिक ...
स्वादिष्ट, पौष्टिक, आकर्षक तेजपूर लिचीलिची हे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारे सदाहरित फळ...
सीताफळ गरापासून श्रीखंड, सरबत, रबडीसीताफळ हे पाैष्टिक फळ असून, त्याच्या गरापासून...
सीताफळ प्रक्रियेतून वाढवा फायदासीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेय, सिरप,...
प्रक्रिया उद्योगातून साधली आर्थिक...परभणी शहराच्या हडको भागातील सौ. वंदना सांवत यांनी...
मूल्यवर्धीत टोमॅटो पदार्थांना अाहे मागणीपिकलेल्या टोमॅटोची साठवण क्षमता कमी असते. संपूर्ण...
केळीखोडापासून धागानिर्मिती ठरेल...केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून...
काबुली चण्याचे पौष्टिक स्प्रेडब्रेड किंवा पोळीवर पसरवून स्प्रेडचे सेवन केले...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
सुधारित यंत्रामुळे वाढेल उत्पादनांची...वर्षभर वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादन आपल्या...
औषधी, चवदार कार्बी अँगलोंग आले जगामध्ये भारत आल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे....
महिला बचत गटाने सुरू केली शेतकरी कंपनीबचत गटाच्या माध्यमातून शिक्रापूर (जि. पुणे)...
निरोगी आरोग्यासाठी ताज्या फळांचा रसभारतातल्या अग्रगण्य शीतपेयांच्या रासायनिक घटकांचा...
गुलाबापासून गुलकंद, गुलाबपाणी, सिरप अन्...पुणे शहरातील जयश्री यादव यांनी अत्यंत संघर्ष व...