Agriculture story in marathi, nutritional value dryfruits | Agrowon

पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजू
कीर्ती देशमुख
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि काजूचे महत्त्व अाहे म्हणून अक्रोड, खजूर, काजू अाणि खारकेचा अाहारात समावेश करावा.  

खजूर

पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि काजूचे महत्त्व अाहे म्हणून अक्रोड, खजूर, काजू अाणि खारकेचा अाहारात समावेश करावा.  

खजूर

 • खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानातील पीक अाहे.  
 • पचायला सुलभ, उष्ण, वात अाणि पित्तशामक अाहे.
 • खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह असून वजनवाढीसाठी उपयुक्त अाहे.
 • खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.
 • मेंदू, हृदय, कंबर, वृक्क या अवयवांना बल देण्यासाठी खजूर उपयुक्त अाहे.  

अक्रोड

 • अक्रोडची रचना व मानवी मेंदूची रचना यात बराच सारखेपणा आहे. अक्रोडच्या टरफलात मेंदूच्या स्वास्थ्याकरिता अावश्यक अशा मगज बनविला आहे.
 • ज्यांना बौद्धिक थकवा आहे, मेंदूचे काम जास्त आहे त्यांनी अक्रोड नियमितपणे दोन-तीन खावे.
 • ज्यांना झोप येत नाही त्यांनी डोक्याला अक्रोडच्या तेलाचा मसाज झोपताना करावा. उत्तम झोप लागते.
 • अक्रोडचे बरेचसे गुण बदामासारखे आहेत. अक्रोड कफपित्तवर्धक, वीर्यवर्धक, बल्य आहे.  
 • अक्रोड जास्त प्रमाणात घेतले तर शरीराचा दाह होतो.  
 • वजन वाढविण्याकरिता अक्रोड उपयुक्त अाहे. धातू क्षयामुळे उद्भवलेल्या वातविकारात, आमवातात अक्रोड पथ्यकर आहे. प्रोटिन व स्निग्ध पदार्थ जास्त आहेत.
 • अक्रोडच्या तेलाचे एरंडेलाच्या गुणाशी साम्य आहे.

काजू

 • काजू उष्ण गुणधर्माचे अाहेत.  
 • काजूचे फळ उत्तम पाचक आहे. त्याच्या रसाने भूक सुधारते. वारंवार होणारे जुलाब थांबतात.  
 • स्मृतिनाश व मेंदू क्षीणतेवर काजू उपयुक्त आहेत. ताकद व वजन वाढणे याकरिता भरपूर व्यायाम व नियमितपणे काजू खवे. काजूत भरपूर प्रथिने अाणि जीवनसत्त्व बी अाहे.   

खारीक
बाजारात सामान्यपणे दोन प्रकारची खारीक मिळते. साखरी खारीक व कोरी खारीक. साखरी खारीक चावायला मऊ व थोडी तुलनेने अधिक गोड असते. कोरी खारीक खूप कडक व कमी गोड चवीची असते.

संपर्क : कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३
(विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

इतर अॅग्रो विशेष
फिलिपिन्सच्या शाश्वत शेतीचे गमकफिलिपिन्स हा शेतीप्रधान देश आहे. येथील शेतकरी...
सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना मानवी आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने...
आंबा पालवीवरील किडींचे एकात्मिक...सर्वसाधारणपणे आंबा पिकामधे नोव्हेंबर महिन्याच्या...
राज्यात ग्रामीण घरकुल योजनेला मिळणार गतीमुंबई : राज्यात ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत...
करडई पीक सल्लागेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा अनेक ठिकाणी...
थंडीची तीव्रता वाढेल, हवामान कोरडे राहीलमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१२...
रोग-किडींमुळे कापूस उत्पादकांना १५ हजार...शेतकरी मेटाकुटीस, नुकसानीचा पंचनामा आणि मदतीची...
जैवइंधनातून नवीन अर्थनीती निर्माण होणारपुणे : इथेनॉलचा वापर आणि जैवइंधनाच्या...
साखरेच्या किमती सहा महिन्यांत २००...कोल्हापूर : साखरेच्या दरात गेल्या सहा महिन्यांत...
नाशिक ११.४ अंश; गारठा वाढलापुणे : अंदमान निकाेबार समुद्रालगत तयार...
राज्यात पेरू प्रतिक्विंटल ८०० ते ७०००...नागपुरात प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये नागपूर...
दुष्काळाचे निकष हवेत व्यावहारिक दुष्काळ जाहीर केला, की कृषिपंपांच्या वीजबिलात...
आता पर्याय हवाचरसशोषक किडींबरोबर गुलाबी बोंड अळीकरिताही...
कांद्यावर ८५० डॉलर किमान निर्यातमूल्यनवी दिल्ली/नाशिक : देशांतर्गत दरावर नियंत्रण...
सौर कृषिपंप योजना गुंडाळली?केंद्र सरकारकडून अनुदान देण्यास हात वर मुंबई :...
बीटी कंपन्यांविरोधात तक्रारीस पोलिसांची...वर्धा : कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचे कारण...
धोरणात्मक बदल न केल्यास दूध संघांचा संप...विस्कटलेल्या दूध धंद्याचे भरकटलेले धोरण : भाग ५...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे भिजत घोंगडेमुंबई : राज्यातील सूक्ष्म सिंचन योजनेच्या...
हवामान कोरडे, थंडी परतलीपुणे : राज्यावरील ढगांची रेलचेल कमी होताच,...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...