agriculture story in marathi, onion and garlic advisary | Agrowon

कांदा पिकासाठी अवस्थानुरूप सल्ला
डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. राजीव काळे, डॉ. व्ही. करुपय्या
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

सध्या रब्बी कांद्याची रोपे रोपवाटिकेत आहेत, तर रांगडा कांद्याचे पीक शेतात उभे आहे. त्याचप्रमाणे बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याची रोपेही काही शेतकऱ्यांकडे दिसून येत आहेत. या विविध अवस्थांमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

कांदा रोपवाटिकेत घ्यावयाची काळजी ः

सध्या रब्बी कांद्याची रोपे रोपवाटिकेत आहेत, तर रांगडा कांद्याचे पीक शेतात उभे आहे. त्याचप्रमाणे बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याची रोपेही काही शेतकऱ्यांकडे दिसून येत आहेत. या विविध अवस्थांमध्ये करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेऊ.

कांदा रोपवाटिकेत घ्यावयाची काळजी ः

 • पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी.
 • खुरपणीनंतर ५ गुंठे क्षेत्रासाठी २ किलो या प्रमाणात नत्र द्यावे.
 • ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
 • रासायनिक नियंत्रण, फवारणी प्रमाण प्रतिलिटर
 • काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
 • जांभळा आणि तपकिरी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, ट्रायसायक्लॅझोल किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम
 • फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आढळल्यास, फिप्रोनील १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि.

रांगडा कांद्याच्या उभ्या पिकाकरिता

 • पावसामुळे शेतामध्ये जास्त पाणी साचलेले असल्यास ते बाहेर काढावे.
 • नत्र खताचा पहिला हप्ता ३५ किलो प्रतिहेक्टर या प्रमाणात ३० दिवसांनी, तर दुसरा हप्ता ३५ किलो प्रतिहेक्टरप्रमाणे लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
 • लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात द्यावीत.
 • सलग तीन दिवस पाऊस पडलेल्या किंवा ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता आणि ढगाळ वातावरण असलेल्या ठिकाणी काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायसाक्लॅझोल किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे पानांवर फवारणी करावी.
 • पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे करावी. म्हणजे पानावरील करपा रोग आणि फुलकिडे नियंत्रणात राहतील.

कांदा बीजोत्पादन रोपांसाठी

 • लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी.
 • लागवडीनंतर ३० दिवसांनी नत्र खताचा पहिला हप्ता ३० किलो प्रतिहेक्टर आणि ४५ दिवसांनी दुसरा हप्ता ३० किलो प्रतिहेक्टर या परमाणे द्यावा.
 • करपा आणि फुलकिडे यांच्या प्रतिबंधासाठी, ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रतिलिटरप्रमाणे फवारणी करावी.
 • पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक फिप्रोनील १ मि.लि. प्रतिलिटर याप्रमाणे करावी.
 • वरील दोन फवारणीनंतरही फुलकिडे आणि करपा रोगाचे नियंत्रण न झाल्यास, कार्बोसल्फान १ मि.लि. अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे पानावर फवारणी करावी.

लसणाच्या उभ्या पिकाची काळजी

 • लागवडीनंतर ३० दिवसांनी नत्र खताचा पहिला हप्ता २५ किलो प्रतिहेक्टर, ४५ दिवसांनी दुसरा हप्ता २५ किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे द्यावा.
 • लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी.
 • लागवडीनंतर ३०, ४५, ६० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी करावी.
 • करपा आणि फुलकिडे नियंत्रणासाठी, फवारणी प्रतिलिटर
 • पहिली फवारणी - कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम
 • दुसरी फवारणी - पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनंतर, फिप्रोनील १ मि.लि अधिक मॅन्कोझेब १ ग्रॅम
 • तिसरी फवारणी - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनंतर, प्रोफेनोफॉस १ मि.लि. अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम.

संपर्क ः ०२१३५ - २२२०२६
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...