agriculture story in marathi, onion and garlic management advisary | Agrowon

कांदा - लसूण पीक सल्ला
डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. थंगासामी, डॉ. मेजर सिंह
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची पुनर्लागवड होऊन पीक सुमारे १५ ते ४५ दिवसांचे झाले आहे. या महिन्यामध्ये रांगडा कांद्याची रोपवाटिका करणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांनी आधीच रोपवाटिका केली होती, त्यांची रोपे पुनर्लागवडीसाठी तयार आहेत.

खरीप कांद्याच्या उभ्या पिकाकरिता
सध्या पावसाळी वातावरण दिसत आहे. सलग तीन दिवस पाऊस, ८५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता आणि ढगाळ वातावरण राहिल्यास कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करून घ्यावा.

बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची पुनर्लागवड होऊन पीक सुमारे १५ ते ४५ दिवसांचे झाले आहे. या महिन्यामध्ये रांगडा कांद्याची रोपवाटिका करणे आवश्यक आहे. काही शेतकऱ्यांनी आधीच रोपवाटिका केली होती, त्यांची रोपे पुनर्लागवडीसाठी तयार आहेत.

खरीप कांद्याच्या उभ्या पिकाकरिता
सध्या पावसाळी वातावरण दिसत आहे. सलग तीन दिवस पाऊस, ८५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता आणि ढगाळ वातावरण राहिल्यास कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तो टाळण्यासाठी शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करून घ्यावा.

 • रोग, कीड नियंत्रण ः  फवारणी प्रतिलिटर पाणी
 • करपा ः प्रोपिकोनॅझोल १.५ मिलि.
 • १५ दिवसांच्या अंतराने करपा व फुलकिडे नियंत्रण ­ः मॅन्कोझेब २.५ ग्रॅम अधिक मिथोमिल ०.८ ग्रॅम.
 • वरील दोन फवारणीनंतरही नियंत्रण न मिळाल्यास, १५ दिवसांनी ः प्रोफेनोफॉस १ मिलि अधिक हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम (टॅंक मिक्स)
 • पुनर्लागवडीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्र खताचा पहिला हप्ता आणि ४५ दिवस झाल्यानंतर नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा. (प्रमाण ः हेक्टरी २५ किलो). काही ठिकाणी नत्र खताची कमतरता दिसत असल्यास, युरिया १० ग्रॅम प्रतिलिटरप्रमाणे फवारणी घेऊन नत्राचा पुरवठा करावा.  
 • पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. ४५, ६० आणि ७५ दिवसांनंतर
 • फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये (प्रमाण ः सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण ५ मिलिप्रतिलिटर)

रांगडा कांदा रोपवाटिका
एक हेक्टर क्षेत्रासाठी पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी असते. त्यासाठी अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून १ मीटर रुंद व १० ते १५ सेंमी उंच गादीवाफे तयार करावेत. तण नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी
पेंडीमिथेलिन २ मिलि प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
बीजप्रक्रिया ः कार्बेन्डाझीम १ ते २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे.
मर रोग नियंत्रण ः ट्रायकोडर्मा व्हिरिडी १२५० प्रति हेक्टरी वापरावे.

 • प्रति ५ गुंठे रोपवाटिकेसाठी पेरणीपूर्वी नत्र, स्फुरद, पालाश ४ः१ः१ किलोप्रमाणे वापर करावा.
 • दोन ओळींमध्ये ५० मिमी किंवा ७५ मिमी अंतर ठेवून बियाण्याची लागवड करावी. त्यावर चांगले कुजलेले शेणखत पसरून बियाणे झाकावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे.

रांगडा कांद्याच्या पुनर्लागवडीसाठी तयारी

 • नांगरणी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
 • हेक्टरी १५ टन शेणखत किंवा ७.५ टन कोंबडी खत किंवा ७.५ टन गांडूळ खत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.
 • १२० सेंमी रुंद, १५ सेंमी उंच गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सेंमी इतके अंतर ठेवावे.
 • पुनर्लागवडीसाठी हेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश खतांची शिफारस आहे. माती परीक्षणानंतर गंधकाचे प्रमाण जाणून घ्यावे. गंधकाचे प्रमाण हेक्टरी २५ किलोपेक्षा जास्त असल्यास हेक्टरी १५ किलो गंधक द्यावे, ते २५ किलोपेक्षा कमी असल्यास हेक्टरी ३० किलो गंधक देणे अपेक्षित आहे. त्याचे नियोजन करावे.
 • पुनर्लागवडीसाठी हेक्टरी ११० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, ४० किलो पालाश खतांची शिफारस आहे. माती परीक्षणानंतर गंधकाचे प्रमाण जाणून घ्यावे. गंधकाचे प्रमाण हेक्टरी २५ किलोपेक्षा जास्त असल्यास हेक्टरी १५ किलो गंधक द्यावे, ते २५ किलोपेक्षा कमी असल्यास हेक्टरी ३० किलो गंधक देणे अपेक्षित आहे. त्याचे नियोजन करावे.
 • नत्र ४० किलो, संपूर्ण स्फुरद, संपूर्ण पालाश याप्रमाणे पुनर्लागवडीवेळी मात्रा द्याव्यात. उर्वरित नत्र खते दोन हप्त्यांत विभागून पुढे ३० आणि ४५ दिवसांनी द्यावीत.
 • ॲझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी ५ किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे देण्याची शिफारस आहे.

डॉ. शैलेंद्र गाडगे, ०९९२२४९०४८३ (राष्ट्रीय कांदा, लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे)
गादीवाफ्यावरील  कांदा रोपवाटिका.

 

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...
काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...
आचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...