तब्बल २८ देशांत निर्यात होतोय खालकरांचा ‘केमिकल फ्री’ गूळ

गुळापासून चिक्की गुळाचे मूल्यवर्धन साधत जोड व्यवसाय म्हणून चिक्की बनविण्याभर खालकर यांनी मागील वर्षांपासून भर दिला आहे. आत्तापर्यत सुमारे वीस टन चिक्की बनविली आहे. यामध्ये स्पेशल इलायची क्रश, खोबरा चिक्की, शेंगदाणा पाकळी अशा तीन प्रकारांची निर्मिती केली आहे. मुंबई, महाखादी, पुणे येथे विक्री केली जाते.
गुळाचा गौरी ब्रॅंड व चिक्की प्रकल्प
गुळाचा गौरी ब्रॅंड व चिक्की प्रकल्प

पुणे जिल्ह्यातील जवळे येथील युवा खालकर बंधूंनी रेसिड्यू फ्री गुळाची निर्मिती व मूल्यवर्धन करीत टप्प्याटप्प्याने त्यास तब्बल २८ देशांची बाजारपेठ काबीज केली आहे. विविध देशांची मागणी लक्षात घेऊन विविध पॅकिंगमधून गूळ सादर केला. त्यांचा हा व्यवसाय समस्त शेतकऱ्यांसाठी पथदर्शक असाच आहे. पुणे जिल्ह्यात जवळे (ता. आंबेगाव) येथे अनिकेत आणि अमित हे खालकर बंधू राहतात. अनिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याच क्षेत्रात ‘करिअर’ न करता शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठेचा व शेतीचा एकूण कल अभ्यासून गूळनिर्मिती व्यवसायात ते उतरले. आज सहा वर्षांचा संघर्ष, अपयश या सर्व अनुभवातून स्वतःला सिद्ध करीत त्यांनी जागतिक बाजारपेठेत आपल्या व्यवसायाला उतरवले आहे. खालकर यांचा गूळ निर्यात व्यवसाय

  • सुरवातीला कमी जागेत सुरू केलेल्या व्यवसायाचा आज विस्तार
  • गूळ प्रक्रियेचे सहा प्लँटस. सुमारे वीस हजार टन उसाचे गाळप
  • त्यातून सुमारे अडीच हजार टन गूळ उत्पादन. उसाचे ब्रिक्स मोजून गूळनिर्मिती
  • तीनशे शेतकऱ्यांचे नेटवर्क गूळ तयार करण्यासाठी लागणारा ऊस परिसरातील शेतकऱ्यांकडून घेतला जातो. साखर कारखाने सुमारे २४५० रुपये प्रति टन दर शेतकऱ्यांना देतात. त्यापुढे जाऊन खालकर यांनी यंदा तीन हजार रुपये दर या शेतकऱ्यांना दिला आहे. परिसरातील सुमारे ३०० ऊस उत्पादकांचे नेटवर्क त्यांनी त्यातून उभारले आहे. अधिक दराचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाला आहे. खालकर यांनी आत्मसात केलेले गुण, कौशल्य

  • केवळ देशांतर्गत नव्हे तर विविध देशांच्या बाजारपेठांचा नेमका अभ्यास
  • त्यानुसार उत्पादन व पॅकिंग
  • जोखीम घेण्याची तयारी, स्वतः निर्यातीचा प्रयत्न
  • संयम, चिकाटी, हुशारी
  • व्यवसायात झोकून द्यायची वृत्ती
  • व्यापाऱ्यांची कार्यपद्धती हेरली, त्यांच्यासोबत नेटवर्क
  • स्वतःचा ‘गौरी’ नावाचा ब्रँड तयार केला.
  • अधिकृत प्रयोगशाळेतून उत्पादनासंबंधी आरोग्य प्रमाणपत्र तसेच निर्यातीसाठीची सर्व आवश्यक प्रमाणपत्रे
  • सुमारे २८ देशांत विक्री खालकर यांनी उत्पादित केलेल्या गुळाचा दर्जा उत्तम व रेसिड्यू फ्री असल्याने परदेशातून त्यास मागणी आहे. सध्या ते व्यापारी, निर्यातदार कंपन्या, सुपरमार्केटस व थेट अशा विविध मार्गांनी आपला गूळ तब्बल २८ देशांना पाठवतात. यात अमेरिका, आॅस्ट्रेलिया, माॅरिशस, दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, इंग्लंड, दुबई, कतार, मस्कत, कुवेत, कॅनडा, जपान, चीन यांचा मुख्य समावेश आहे. आधुनिक पॅकिंग सुरुवातीला प्लॅस्टिक पिशवीत पॅकिंग करून विक्री व्हायची. आता विविध देशांची मागणी लक्षात घेऊन ज्यूट बॅग, सफेद वस्त्र, हवाबंद लॅमिनेटेड, प्लॅस्टिक कंटेनर अशा विविध प्रकारांमध्ये पॅकिंग केले जाते. त्यामुळे गूळ खराब न होता तो अधिक काळ टिकण्यास मदत झाली आहे. विक्री, उलाढाल

  • टप्प्याटप्प्याने वाढ करीत आजमितीस सुमारे ८ ते १० कोटी
  • सरासरी दर- चाळीस रुपये प्रति किलो. तो याहून अधिकचाही मिळतो.
  • चालू वर्षी सुमारे अडीच हजार टन विक्री
  • पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता खालकर यांनी आपल्या कंपनीचे विस्तारीकरण केले आहे. त्यातून आयरीश असे कंपनीचे नामकरण व डेलाज या ब्रॅंडने पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर निर्मिती मागील महिन्यापासून सुरू केली आहे. त्यामध्ये विक्रांत लांडे, सुधीर मुंगसे यांचाही भागीदार म्हणून समावेश आहे. त्याचबरोबर गौरी आॅटोमोबाईल्स या नावाने वाहनांचे शोरूमही मागील वर्षापासून सुरू केले आहे. संघर्षमय अनुभव

  • उत्पादन विक्रीत सुरवातीला खरेदीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी संघर्ष करावा लागला.
  • बँकेने कर्ज देण्यास टाळाटाळ केली.
  • गुळाची विक्री करताना काही व्यापाऱ्यांनी अडवणूक केली.
  • त्यामुळेच मग पुढे स्वतःचा ब्रँड तयार करून बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न केला.
  • सुरुवातीला गुळाची प्रत एकसारखी येत नसल्याने त्रास झाला.
  • एका सुपरमार्केटने काही वेळा माल रिजेक्टही केला. मात्र अनिकेत यांनी चिकाटी न सोडता सर्वोत्तम उत्पादन घेऊन दाखवले. आज हेच सुपरमार्केट कायमचे ग्राहक झाले आहे.
  • व्यापाऱ्यांकडून आलेल्या अनुभवामुळे अनेक वेळा आर्थिक नियोजन कोलमडले.
  • वाहतुकीच्या अनेक अडचणी आल्या.
  • सुरुवातीच्या काळात ना नफा, ना तोटा पद्धतीने काम केले.
  • निर्यात करताना परदेशातील काही व्यापाऱ्यांनी पेमेंट अडकवले. ते वसूल करण्यात संघर्ष करावा लागला.
  • संपर्क- अनिकेत खालकर, ९७६७३४३४३४, ८८०५३४३४३४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com