agriculture story in marathi, papaya processing | Agrowon

मार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपई
शारदा पाटेकर
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

पपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या मार्केटमध्‍ये माल पाठविताना फार काळ टिकत नाही. त्‍यामुळे पपईवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. हे प्रक्रियायुक्‍त पदार्थ वर्षभर टिकून राहतात. पपईपासून जॅम, जेली, मार्मालेड, टुटीफ्रुटी, पेपेन असे पदार्थ बनवून ये निर्यातदेखील करता येतात.

पपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या मार्केटमध्‍ये माल पाठविताना फार काळ टिकत नाही. त्‍यामुळे पपईवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. हे प्रक्रियायुक्‍त पदार्थ वर्षभर टिकून राहतात. पपईपासून जॅम, जेली, मार्मालेड, टुटीफ्रुटी, पेपेन असे पदार्थ बनवून ये निर्यातदेखील करता येतात.

 • चवीला गोड शरीराला पोषक आणी त्‍वचेचे आरोग्‍य सुधारणारे फळ म्‍हणजे पपई. पपई शरीराला गरम असल्‍याने वातावरणात गारवा असताना खाणे हितकारी आहे.
 • पपईमध्‍ये जीवनसत्त्व सी आणि तंतुमय पदार्थांचे प्रमाण अधिक असल्‍याने रक्‍तवाहिन्‍यांमध्‍ये कोलेस्‍टेरॉल साचून राहत नाही व प्रमाण कमी होते.
 • एका मध्‍यम आकाराच्‍या पपईमध्‍ये १२० कॅलरीज असतात. पपईतील डायटरी फायबर मुळे वेळी अवेळी लागणा-या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होते.
 • पचनक्रिया चांगली राहते आणि पचनशक्‍ती वाढवण्‍यास मदत होते. शरीरातील प्रथिनांच्‍या पचनासाठी पपईतील पेप्‍सीन हा घटक मदत करतो.
 • जीवनसत्त्व ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्‍य चांगले राहते.
 • अॅन्‍टी ऑक्‍सिडन्‍ट शरीरातील फ्री रॅडीकल्‍स आणि आतड्यांच्‍या कर्करोगांपासून दूर ठेवते.
 • अॅन्‍टी ऑक्‍सिडन्‍ट, बीटा कॅरोटीन आणि जीवनसत्त्व इ व सी मुळे चेह-यावर चमक येते; तसेच सुरकुत्‍या कमी होतात. त्‍यामुळे पपईचा उपयोग सौंदर्य प्रसाधनांमध्‍ये केला जातो.

  मार्मालेड

 • जाम प्रमाणेच पपईचे मार्मालेड ही बनविले जाते. फरक एवढाच की, मार्मालेडमध्‍ये संत्र्यांच्‍या सालीचे २ ते ३ से.मी. लांबीचे पातळ तुकडे टाकतात.
 • संत्र्याच्‍या सालीचे तुकडे प्रथम एका भांड्यात २ ते ३ वेळा पाणी बदलून उकळून घ्‍यावे, त्‍यामुळे सालीतील कडवटपणा कमी होतो व साली मऊ बनतात.
 • पपईचा गर, साखर व सायट्रीक अॅसिड एकत्रित करून हे मिश्रण मंद अग्‍नीवर ठेवलेले असताना त्‍यात समप्रमाणात संत्र्याच्‍या सालीचे तुकडे घालावेत.
 • थंड झाल्‍यावर मार्मालेड निर्जंतुक केलेल्‍या बाटलीत भरावे.
 • संत्र्याच्‍या सालीतील पोषक घटक मार्मालेड या पदार्थामध्‍ये येतात, त्‍यामुळे मार्मालेड या पदार्थास परदेशात भरपूर मागणी आहे.

टुटीफ्रुटी

 • १ किलो कच्या पपईच्‍या गराचे चौकोणी टुकडे कापून घ्‍यावेत.
 • अर्धा लिटर पाण्‍यामध्‍ये ४ टी स्‍पून चुना मिसळून त्‍यामध्‍ये पपईचे तुकडे अर्धा तास ठेवावे.
 • तुकडे दुस-या पाण्‍यात २ ते ३ वेळा धुवून पांढ-या मलमलच्‍या कापडात बांधून ३ ते ५ मिनिटे वाफवून घ्‍यावे. त्यानंतर थोडावेळ थंड पाण्‍यात ठेवावे.
 • एक किलो साखरेचा एकतारी पाक करून गाळून घ्‍यावा व त्‍यामध्‍ये हे तुकडे पूर्ण एक दिवस ठेवावे.
 • तुकडे वेगळे करून पाक दोनतारी होईपर्यंत उकळावा व उकळताना त्‍यामध्‍ये सायट्रिक अॅसिड मिसळावे.
 • पाक गाळून घेऊन थोडा थंड झाल्‍यावर त्‍यामध्‍ये तुकडे व आवडीनुसार रंग घालुन मिसळावे व हे मिश्रण २ ते ३ दिवस ठेवावे.
 • तुकड्यांमध्‍ये पाक चांगला शिरल्‍यावर ते तुकडे बाहेर काढून वाळवावेत. तयार झालेली टुटीफ्रुटी बरणीत भरुन ठेवावी.

जॅम

 • पिकलेली पपई पाण्‍याने स्‍वच्‍छ धुऊन कापून घेऊन बी वेगळे करावे.
 • फळाची साल बाजूला काढून गर व्‍यवस्‍थित मिक्‍सरमध्‍ये एकजिव करावा.
 • साधारण एक किलो गरामध्‍ये ७५० ग्रॅम साखर व ९ ग्रॅम सायट्रीक अॅसिड मिसळून मंद गॅसवर १०३ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम करावे. त्‍यातील प्रवाही पाण्‍याचा अंश संपला की जाम तयार झाला असे ओळखावे.
 • जाम थंड झाल्‍यावर निर्जंतुक केलेल्‍या काचेच्‍या बरण्‍यामध्‍ये भरावा.

संपर्क ः शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८
(शिवरामजी पवार अन्‍नतंत्र महाविद्यालय, नेहरूनगर, कंधार, जि. नांदेड)

इतर कृषी प्रक्रिया
मोहापासून प्रक्रियायुक्त पदार्थमोहाची फुले झाडावर काही मर्यादित काळच उपलब्ध...
अनेक प्रक्रिया पदार्थांमध्ये सीताफळ गर...सीताफळ हे नाशवंत फळ असल्यामुळे त्यावर प्रक्रिया...
कच्च्या पपईपासून पेपेन निर्मितीपपई हे जवळजवळ वर्षभर उत्पादन देणारं पीक असून,...
मार्मालेड, टुटीफ्रुटी निर्मितीसाठी पपईपपई झाडांपासून वर्षभर फळे मिळतात; परंतु दूरच्‍या...
आरोग्यवर्धक फळांची भुकटीप्रक्रिया उद्योगामध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार अणि...
कवठ प्रक्रियेला आहे संधीकवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे...
पेरूची टॉफी, स्क्वॅश, गरपेरूमध्ये जीवनसत्त्व सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह,...
पेरू प्रक्रियेतून वाढवा फायदापेरू नाशवंत असल्यामुळे प्रक्रियेद्वारा पेरूचे...
बहुगुणी आवळ्याचे मूल्यवर्धनआवळा या फळाला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे....
शेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...
सीताफळापासून नेक्टर, स्कॅश, अारटीएससीताफळ हे अनेक अावश्‍यक पोषक घटकांचा स्राेत अाहे...
आरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...
सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची ‘साधना’लातूर जिल्ह्यातील मुरूड येथे राहणाऱ्या साधना...
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
प्रोबायोटिक कुल्फीकुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार...
टोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदाबाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे...
दर्जेदार उत्पादनासाठी फ्रिज ड्रायिंगरूढ झालेल्या यांत्रिक ड्रायर्सच्या तुलनेत फ्रिज...
विविध हंगामी फळांपासून बनवा जॅमहंगामानुसार विविध प्रकारची फळे उपलब्ध होतात....
प्रक्रिया उद्योगात नारळाला मागणीनारळाचा प्रत्येक भागाचा उपयोग प्रक्रिया...
मावा मलई निर्मितीतून मिळविले आर्थिक...जळगाव शहरामधील पिंप्राळा परिसरातील देवकाबाई...