पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने उत्तम डुकरे (औरंगपूर, जि. पुणे) यांनी पोल्ट्री व्यवसायाला वाहून घेतले. सुमारे १२ वर्षांच्या प्रवासात त्यांनी सोळा हजार पक्षी संगोपनाची क्षमता तयार करीत पोल्ट्री वातानुकूलित, स्वयंचलित केली आहे. पत्नीच्या समर्थ साथीतून पोल्ट्रीच्या करार शेतीत मजबूत पाय रोवले आहेत. पुणे जिल्ह्यातील औरंगपूर (ता. जुन्नर) येथील उत्तम डुकरे पाचवीत शिकत असताना पायाला लाकूड लागण्याचे निमित्त झाले. जखम वाढत गेली. संपूर्ण पाय काढावा लागला. पण, प्रचंड मनोबल ठेवत महाविद्यालयीन शिक्षण व ‘आयटीआय’ (इलेक्ट्रॉनिक्स) चा अभ्यासक्रम पूर्ण केला. टीव्ही व तत्सम उपकरणे दुरुस्तीचे केंद्र सुरू केले. गुण कामी आले एका पायाच्या आधारे दैनंदिन कामे व व्यवसाय करणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण, इच्छाशक्ती, जिद्द भक्कम होती. उत्पन्नाचा स्त्रोत वाढावा म्हणून उत्तम यांनी पत्नी सौ. संगीता यांच्या मदतीने २००७ मध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. गेल्या बारा वर्षांच्या प्रवासात चिकाटीने झोकून देऊन काम केले. त्यामुळेच व्यवसायात भक्कम पाय रोवणे शक्य झाले. उत्तम डुकरे यांच्या पोल्ट्रीचा व्हीडिअो (video) पोल्ट्री व्यवसाय दृष्टिक्षेपात
व्यवसाय वाढ
गुंतवणूक एसी व ॲटोमेशनसाठी (जनरेटरसह) तीस लाख रुपये. शेड घरचेच असल्याने जागेचा खर्च नाही. दोन्ही शेडस बांधणी व व्यवसाय विस्तारासाठी कर्ज. प्रत्येक बॅचमधील थोडे थोडे पैसे शिल्लक ठेवत ते फेडले. ‘एसी’ तंत्र
ॲटोमेशन तंत्र
तंत्रज्ञान वैशिष्ट्ये
पक्षी संगोपनातील ठळक बाबी
एसी शेडचे झालेले फायदे
उग्र वास नाहीसा झाला एसी पोल्ट्रीमुळे उग्रवासाच्या त्रासापासून परिसरात सर्वांना सुटका मिळाली आहे. स्वयंचलित यंत्रणेमुळे पाणी सांडत नसल्याने शेड कोरडे राहते. त्यामुळे माशाही येत नाहीत. मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठी खड्डा घेतला आहे. अपंगत्व आल्यानंतरही उभारी अपघातात पाय काढावा लागल्याने पायी शाळेत जाणेही शक्य होत नव्हते. मित्रासोबत सायकलवर मागे बसून शाळेत जाण्यास सुरवात केली. एक दिवस मित्राने सायकलवर बसवून उतारावर सोडून दिली. मग अपघाताने का होईना सायकल चालवता येऊ लागली. त्यातून जीवनाला गती मिळाली. औरंगपूर ते आळंदी असा ६० किलोमीटर प्रवास सायकलवरून केला. सायकल, एसटी असा जमेल तसा प्रवास करून कला शाखेच्या पदवीचे पहिल्या वर्षापर्यंत शिक्षण घेतले. जुनी टू व्हीलर घेतली. त्यात आवश्यक बदल केले. सहा वर्षे पिठाची गिरणी चालविली. पत्नीच्या सांगण्यावरूनच आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला. डुकरे चारचाकीही उत्तम चालवतात. संपूर्ण वाटचालीत पत्नीची साथ अत्यंत मोलाची राहिल्याने उभारी घेता आल्याचे त्यांनी सांगितले. संपर्क- उत्तम डुकरे - ७०२०२५०१९८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.