Agriculture story in marathi, poultry management in winter season | Agrowon

थंड वातावरणात जपा कोंबड्यांना
विपुल वसावे
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

थंडीच्या काळातच कोंबड्यांची वजनवाढ जलदगतीने होत असते. हिवाळ्यात कोंबड्यांचे अारोग्य चांगले ठेवण्यासाठी खाद्याची निवड, शेडचे योग्य व्यवस्थापन ठेवण्यावर भर द्यावा.

थंडीच्या काळातच कोंबड्यांची वजनवाढ जलदगतीने होत असते. हिवाळ्यात कोंबड्यांचे अारोग्य चांगले ठेवण्यासाठी खाद्याची निवड, शेडचे योग्य व्यवस्थापन ठेवण्यावर भर द्यावा.

ब्रॉयलर, लेअर कुक्कुटपालन करताना चांगल्या उत्पादनासाठी ऋतुमानानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावेत. व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्यास किंवा महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष न दिल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते.
खाद्य व्यवस्थापन
मांसल कोंबड्यांना संतुलित आहार देणे हे त्यांच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. कारण एकूण उत्पादन खर्चाच्या ७० ते ७५ टक्के खर्च हा खाद्यासाठी लागतो, त्यामुळे खाद्याची निवड करताना खाद्याचे दर, प्रकार व संतुलित खाद्य या सर्व बाबींचा विचार करावा. कोंबड्यांना तीन प्रकारचे खाद्य दिले जाते यामध्ये...
प्री स्टार्टर खाद्य : ३०० ते ५०० ग्रॅम प्रती पक्षी
स्टार्टर खाद्य : ७०० ते १००० ग्रॅम प्रती पक्षी
फिनिशर खाद्य : ३००० ग्रॅम किंवा त्यापेक्षा जास्त प्रती पक्षी

 • हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी झाल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोंबड्या जास्त खाद्य खातात, त्यामुळे खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण वाढेल या प्रकारचे खाद्य द्यावे.
 • खाद्यामध्ये अधिक ऊर्जा पुरवठा करणाऱ्या घटकांचा म्हणजे तेल व स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढवावे. जास्त ऊर्जा शरीरात उष्णता निर्माण करते. कोंबड्यांना थंडीपासून होणाऱ्या त्रासापासून वाचवते.
 • कोंबड्यांच्या शेडमध्ये ४० ते ५० कोंबड्यांना एक खाद्याचे भांडे या प्रमाणात भांडी ठेवावीत.

पाणी व्यवस्थापन

 • स्वच्छ, ताजे व जंतुविरहित पाणी दिल्याने कोंबड्यांचे आरोग्य व स्वास्थ्य टिकून राहते. शेडमध्ये एक पाण्याचे भांडे हे ६० ते ७० कोंबड्यांसाठी ठेवावे.
 • थंडीमुळे कोंबड्यांमध्ये पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे औषधे किंवा लस देण्यापूर्वी चार तास पाण्याची भांडी काढून ठेवावीत.
 • शुद्ध व जंतुविरहित पाण्याचा पुरवठा करावा.
 • वेळोवेळी तज्ज्ञाच्या सल्ल्याने औषधोपचार व लसीकरण करून घ्यावे.आठवड्यातून किमान एकदा तरी गुळाचे पाणी पाजावे.

शेडचे व्यवस्थापन

 • थंड वाऱ्यापासून संरक्षण मिळण्यासाठी शेडचे छत उघडे किंवा फुटलेले असल्यास त्याची डागडुजी करून घ्यावी.
 • चांगल्या पडद्यांचा वापर करावा. वातावरणातील तापमानानुसार पडदे उघड - बंद करावेत.
 • कोंबड्यांसाठी शेडमध्ये कृत्रिम ऊर्जेचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे. वीजपुरवठा खंडित झाल्यास कृत्रिम ऊर्जेसाठी (ब्रुडिंगची) पर्यायी व्यवस्था करावी.
 • शेडमधील कोंबड्यांची विष्ठा, सांडलेले खाद्य नियमित स्वच्छ करावे. शेडमध्ये भरपूर सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी.
 • लेअर कोंबड्यांना हिवाळ्यात प्रकाशाची आवश्यकता असते त्यादृष्टीने १२ तासापर्यंत प्रकाशाची व्यवस्था करावी.
 • जागेनुसार शेडमधील कोंबड्यांच्या संख्येत वाढ करावी.गादीच्या थराची जाडी तीन ते चार इंच वाढवून घ्यावी जेणेकरून कोंबड्यांना ऊब मिळेल. गादी वेळच्या वेळी खाली-वर करावी.
 • पडदे बंद असताना एक्झाॅस्ट पंख्याची व्यवस्था करावी. लहान पिलांना पिण्याचे पाणी कोमट करून द्यावे.

संपर्क ः विपुल वसावे, ९४२११८६३१८
(विषय विशेषज्ञ (पशू विज्ञान व दुग्ध शास्त्र), कृषी विज्ञान केंद्र, धुळे)

इतर कृषिपूरक
पशूसल्ला    थंड वातावरणामुळे जनावरांच्या...
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...
पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...
मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...
गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...
जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...
रेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...
प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...
दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...
दुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...
मुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...
कोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...
पशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...
जनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...
वासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...
जनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
कासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...
कोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...