मसाल्याचे आहारातील महत्त्व

समतोल अाहार
समतोल अाहार

स्वयंपाकात चव, रंग आणि साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाला स्वतःचा विशेष 'गुण' आहे.  दैनंदिन वापरातील मसाल्याच्या काही पदार्थांचे गुणधर्म जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याचा वापर करावा.

प्रत्येक पदार्थामध्ये ज्याप्रमाणे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे हे महत्त्वाचे आणि आवश्यक अन्नघटक असतात तसेच मसाल्यांतही महत्त्वाची खनिजे आणि विशेष गुणधर्म असणारे अन्नघटक आहेत. हळद खोकला, अपचन, संधिवातात उपयुक्त, हृदयाचे आरोग्य राखण्यात उपयोगी, प्रतिओक्सिडीकारक असून, काळ्या मिरीसोबत खाल्यास अधिक फायदेशीर तिखट अ, ब (ब-१, ब-२, ब-३, ई) जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत. शरीरातील उष्णता वाढविल्यामुळे, वजन घटवण्यास मदत, रक्तातील साखरेची पातळी सुयोग्य राखते.    हिंग   खनिजांचा उत्तम स्रोत. पचनसंस्थेच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका. अपचन, गॅसेस, पोटदुखी, हर्निया, जंत यांवर उपयुक्त. श्वसनसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक. अस्थमा, खोकला बरा करण्यासाठी उपायकारक.   जिरे   लोह व सोडियमचा चांगला स्रोत - पोटदुखी, अतिसार, गॅसेसवर उपयुक्त. पित्तशामक, डाययुरेटिक हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी  महत्त्वाचा. धणे तंतुमय पदार्थ आणि ब जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत. उत्तम पचनासाठी व पोटाच्या आरोग्यासाठी हितकारक. रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी भूक कमी होणे, मळमळणे व पोटाच्या इतर आजारांवर उपयुक्त. मिरी अ जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत. निरोगी व तकतकीत त्वचेसाठी, भूक वाढविण्यासाठी, उष्णता वाढविण्यासाठी, सर्दीवर उपयुक्त.   मोहरी अ, ब व ई जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत. चयापचयाचा वेग वाढविण्यासाठी, कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त. उचकी, कफ, दमा, खोकला यावर गुणकारी.   मेथ्या प्रथिने आणि ब जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत - रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण योग्य राखण्यासाठी तसेच रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाह सुरळीत करण्यात महत्त्वाचा सहभाग. इन्शुलिनचे आवश्यक प्रमाण ठेवणे हे महत्त्वाचे कार्य करते.   तमालपत्र अ, ब व क जीवनसत्त्वांचा व फॉलिक ॲसिडचा चांगला स्रोत. नियमित चयापचयात मदत, प्रदूषणाचे, शारीरिक आणि बौद्धिक ताणाचे दुष्परिणाम कमी करणारे. वेलदोडा कोलिन आणि अ, ब, क, ई आणि के जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत. पचनात मदत करते. जळजळणे, भूक कमी होणे इत्यादी पोटाच्या तक्रारींवर उपायकारक. सर्दी व खोकल्यावर गुणकारी.

संपर्क ः  कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ (विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) कृषी विज्ञान केंद्र, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com