यशस्वी गर्भधारणेसाठी रेतनातील चुका टाळा

गाय
गाय

जनावरातील सतत उलटणारा माज आणि नेहमी होणाऱ्या चुका टाळण्यासाठी वेळेवर रेतन, जंतुससर्गाला अटकाव, वेळेवर उपचार करणे गरजेचे अाहे. जनावरातील सतत उलटणारा माज आणि नेहमी होणाऱ्या चुका याबाबतची माहिती.

योग्य माजानंतरच रेतन

सगळे माज रेतनास योग्य नसतात. नियमित माज, स्वच्छ बळस, कालवडीमध्ये पहिले दोन तर गायी, म्हशीमध्ये एक माज वगळून पुढील २१ दिवसांनी येणाऱ्या माजावर जनावरे भरवावीत.

स्रावाकडे दुर्लक्ष

पहिल्या टप्प्यापासून माजाच्या शेवटच्या टप्प्यात माज स्राव स्वच्छ, पारदर्शक, रंगहीन, गंधहीन अपेक्षित असतो.

माजातील अंतर

सलग येणारा माज २१ दिवस अंतराचा (२ दिवस कमी जास्त होऊ शकते) असेल तरच तो रेतनास पात्र असतो. कमी अधिक अंतराचे माज टाळावेत.

उपचार - रेतन

उपचार केलेल्या गर्भाशयदाह असणाऱ्या प्रकारातील सर्व माज रेतनासाठी टाळल्यास जंतुसंसर्गामुळे गर्भाशयावर अालेली सूज कमी होण्यास वेळ मिळतो व पुढील माजास जनावरे गाभण राहण्याची शक्‍यता वाढते.

पुन्हा-पुन्हा रेतन

प्रत्येक माजास होणारे रेतन गर्भधारणा होण्यास अपात्र दिसून आल्यास एक-दोन माज रेतनासाठी टाळणे म्हणजे वाढलेल्या रक्तप्रवाहातून प्रजनन संस्था सक्षण करणे.

माजानंतर रक्तस्राव

माजानंतर दोन दिवसांत दिसून अाल्यास दुर्लक्ष करावे. त्याचा गर्भधारणेशी काही संबंध नसतो. अंधश्रद्धा ठेऊन कुठलेही उपचार करू नयेत.

रेतनानंतर नैसर्गिक संयोग

कृत्रिम रेतनानंतर वळूद्वारे नैसर्गिक रेतनाने जनावरे भरवू नयेत. रेतनाचा एकच पर्याय अवलंबावा.

आहार कमी करणे

चांगल्या वजनाचे जनावर मेदवृद्धीमुळे उलटते हा गैरसमज आहे. आहार कमी करून शरीर वजनात घट झाल्यास गर्भधारणेची शक्‍यता कमी होते.

जंतुसंसर्ग

गोठ्यात जर पाणी साठत असेल, तर रोगजंतूंची संख्या वाढते. पाण्यापेक्षा सूर्यप्रकाश-ऊन यातून होणारी स्वच्छता निर्जंतुकीकरणास मदतीची ठरते. प्रसूतीवेळी अस्वच्छता टाळावी. त्यासाठी गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.

संपर्क ः डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१      (पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com