जनावरांतील गर्भाशय दाह, उलटणाऱ्या माजावर उपचारपद्धती

जनावरांतील गर्भाशय दाहावर प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध अाहेत.
जनावरांतील गर्भाशय दाहावर प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध अाहेत.

सतत उलटणारा माज अाणि गर्भाशय दाह यामुळे जनावराच्या वेतचक्रामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे गर्भधारणा ते प्रसूती या काळात अशा जनावरांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. त्यासाठी दिलेल्या उपचार पद्धतीचा वापर पशुतज्ञांच्या सल्ल्याने केल्यास गर्भाशय दाह कमी होण्यास मदत होते.   आयोडिनचा वापर (अॅन्टिसेप्टीक औषधे)     

  • बाजारात उपलब्ध पोव्हीडीन आयोडीनचे सौम्य द्रावण वापरून योनी मार्गातील जंतुप्रभाव कमी करणे, माजाच्या काळात बारा तास अंतराने दोनदा ३० ते ५० मि.लि. औषधी वापरून स्वच्छता करणे उपयुक्त ठरते. हे औषध गर्भाशयात सोडता येते.
  • ल्यूगॉल्स आयोडिन ३ ते ४ टक्के द्रावण (१ः३० ते १ः२५) उपलब्ध साठा बाटलीतून डिस्टिल्ड पाण्यात ३० ते ४० मि.लि. मात्रा माजाच्या काळात गर्भाशयात सोडणे, पुढे २-३ दिवस असाच उपचार अवलंबणे.
  • हायड्रोजन परॉक्साईड ३ टक्के तीव्रतेनेचे ३० ते ५० मि.लि. द्रावण गर्भाशयात सोडून रोगसंसर्ग थांबवता येतो.  
  • वनस्पतिजन्य औषधांचा वापर (हर्बल औषधे)   

  • गर्भाशय क्षमता वर्धक पावडर, औषधी, गोळ्या तोंडावाटे दिल्यास गर्भाशयातील पूजन्य बळस कमी होतो. मात्र असा उपचार सलग १५-२० दिवस अपेक्षित असतो. प्रतिजैविकांच्या वापरानंतर असा उपचार करता येतो.
  • लसूण अर्क किंवा लिंबोळी बियांचा अर्क किंवा तेल २० मिली ३० ते ४० मिली पाण्यामधून गर्भाशयात सोडता येणे शक्य असते. असा उपचार २ ते ४ दिवस सलग करता येतो.
  • तुळस अर्क २० टक्के प्रमाणात किंवा अश्‍वगंधा ३० टक्के प्रमाणात गर्भाशयात सोडल्यास गर्भदाह कमी होऊ शकतो. बाजारात उपलब्ध अनेक वनस्पतिजन्य गोळ्यांनी गर्भाशय दाह कमी करता येतो.
  • प्रतिजैविकांचा वापर (अॅन्टिबायोटिक औषधे)  

  • गर्भाशयातील बळस प्रयोगशाळेत तपासणी करून प्रभावी प्रतिजैविकांच्या मात्रा ३ ते ५ दिवस स्नायूत टोचता येतात.
  • दीर्घ काळ प्रभावी प्रतिजैविक उपलब्ध असल्याने माज व पुढे ३-४ दिवसास इंजेक्शने दिल्यास आठवडाभर जंतुप्रभाव रोखता येतो.
  • दोन पूरक प्रतिजैविके एकत्रितपणे दिल्यास अधिक जंतू प्रमाण रोखता येते. मिश्र जिवाणू प्रादुर्भावासाठी असा उपचार प्रभावी दिसून येतो. अशी प्रतिजैविके इंजेक्शनद्वारे स्नायूत अथवा गर्भाशयात दिली जातात किंवा एक स्नायूत किंवा शिरेत आणि दुसरे गर्भाशयात सोडता येते.
  • प्रतिजैविकांच्या सुधारित प्रत उपलब्ध होत असल्या तरी जिवाणूंची दाहक्षमता वाढत असल्याने प्रतिजैवकांसह जीवनसत्त्व आणि इतर औषधी एकत्रित स्वरूपात बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर करून गर्भाशय दाह कमी करता येतो.
  • ओजसरसाचा वापर (हार्मोन्स औषधी)    

  • माज चक्र निम्म्या काळास (१० ते १२ व्या दिवशी) तोडून गर्भाशयात पूजन्य बळस वाढण्यास प्रतिबंध करणे, गर्भाशयमुख उघडे करून दूषित बळस बाहेर काढणे, स्नायूत प्रोस्ट्राग्लांडीन इंजेक्शन देऊन गर्भाशय स्वच्छ करणे शक्य आहे.
  • सौम्य व मध्यम गर्भाशय दाहास असा उपचार अत्यंत उपयुक्त ठरतो.
  • गर्भाशयाची रोगप्रतिकारक्षमता वाढविणारा उपचार (इम्युनिटी नियमक औषधी)    

    गर्भाशयाचा दाह प्रतिबंध करण्यास रक्त पेशी, सुरक्षा पेशी संख्या वाढविणारा व जंतूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवणारा उपचार करता येतो. त्याच जनावरांचे रक्तजल संकलित करून ३० मि.लि. गर्भाशयात सोडणे हा प्रभावी उपाय ठरतो.

    मिश्र उपचार (दोन उपचारपद्धतींचा वापर)

  • गर्भाशय दाह कमी करण्यासाठी विविध उपचार एकाच वेळी करता येतात. यात गर्भाशयात एक तर स्नायूत दुसरा औषधी वापर होतो.
  • पोटातून दिली जाणारी वनस्पतिजन्य औषधे गर्भाशयातील स्राव बाहेर फेकण्यास उपयोगी ठरत असल्याने तोही पर्याय सहज वापरता येतो. मिश्र उपचारपद्धतीचे फायदे अधिक आढळतात.
  • आधुनिक उपचार पद्धती (प्राणवायू वापर)  

  • प्राणवायूचा वापर (ओझोन) करून जिवाणूंचा संपूर्ण सहज, अल्पखर्चिक नायनाट करण्याची पद्धती उपलब्ध आहे.
  • यात जिवाणूंमध्ये प्रतिजैविकांविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होऊ शकत नसल्याने अधिक प्राधान्य मिळते. मात्र ओझोन उपलब्ध करणारे यंत्र खरेदी करावे लागते व त्याचा खर्च अत्यल्प असतो.
  • प्रतिबंधात्मक उपचार प्रसूतिपश्चात पूर्वतयारी    

  • प्रसूतीनंतरच्या गर्भाशय पूर्वस्थितीत येण्याच्या टप्प्यात वरीलपैकी अनेक पद्धती प्रतिबंध म्हणून वापरल्यास सतत उलटण्याचा गर्भाशय दाह धोका संपविता येतो.
  • असा प्रतिबंधात्मक उपचार फायद्याचा ठरतो आणि माज चक्र सुरू झाल्यास गर्भाशय दाह शक्यता नसते. जनावराची वेतसंख्या या उपचाराने वाढविता येते.
  • रोगप्रतिकार क्षमतेस चेतना (इम्युनिटीला उत्तेजना देणारी औषधे) किंवा चेतक

  • गर्भाशय दाह कमी करण्यासाठी औषधींचा वापर यशस्वी ठरावा यासाठी शरीराची रोगप्रतिकार क्षमता अधिक सक्षम करणारा, चेतना देणारा उपचार शक्य आहे.
  • लेव्हामीसॉल, आणि इतर रोग प्रतिकार क्षमतेला चेतना देणारी / चेतक औषधे प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवत ताण कमी करतात.
  • टीप ः वरील सर्व उपचार पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत.

    संपर्क ः डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com