agriculture story in marathi, Prevention and Control of Foot Problems in Cows and buffaloes | Agrowon

दुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे व्यवस्थापन
डॉ. अतुल वाळुंज, डॉ. शिवकुमार यंकम
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची उत्पादकता वाढते व परिणामी दुग्ध व्यवसायातील आर्थिक ताळेबंद राखण्यास मदत होते. परंतु खुरांचे आरोग्य व आजार याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते कारण या आजारांचा पशूंच्या आरोग्यावर आणि एकूणच उत्पन्नावर होणारे परिणाम लक्षात येत नाहीत.

दुधाळ जनावरांमध्ये खुर हे गुंतागुंतीची रचना असणारे शरीराचा एक अविभाज्य भाग असून जनावरांचे सर्वांगीण आरोग्य व उत्पादन क्षमतेमध्ये महतत्त्वाची भूमिका बजावतात.
खुरांचे आजार होण्याची प्रमुख कारणे

खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची उत्पादकता वाढते व परिणामी दुग्ध व्यवसायातील आर्थिक ताळेबंद राखण्यास मदत होते. परंतु खुरांचे आरोग्य व आजार याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते कारण या आजारांचा पशूंच्या आरोग्यावर आणि एकूणच उत्पन्नावर होणारे परिणाम लक्षात येत नाहीत.

दुधाळ जनावरांमध्ये खुर हे गुंतागुंतीची रचना असणारे शरीराचा एक अविभाज्य भाग असून जनावरांचे सर्वांगीण आरोग्य व उत्पादन क्षमतेमध्ये महतत्त्वाची भूमिका बजावतात.
खुरांचे आजार होण्याची प्रमुख कारणे

 • उष्माघात, संक्रमण काळातील तणाव, उच्च दूध उत्पादनाचा ताण तसेच गोठ्यातील निकृष्ट व्यवस्था इ. गोष्टी खुरांचे विकार होण्यास कारणीभूत ठरतात.
 • पावसाळ्यात खुरांमधील उतीमध्ये सूज येऊन त्यांची झीज झाल्याने दुधाळ जनावरे विशेषतः संकरित गायी या विकारांना अधिक संवेदनशील बनतात.
 • खुरांचे आजार सामान्यतः विदेशी आणि संकरित गायीमध्ये प्रामुख्याने आढळून येतात, विशेषतः जनुकीय/अनुवांशिक मूळ असणारे हे विकार चांगल्या दैनंदिन व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब न केल्यामुळे बळावतात.
 • खुरांच्या विकार अथवा अतिवाढीने त्यात घाण साचून डिजिटल डर्माटाईटीस या सांसर्गिक रोगास जनावरे संवेदनशील बनतात.
 • दुधाळ जनावरांमध्ये लेमीनाईटीस हा खुरांचा असंसर्गिक रोग प्रामुख्याने आढळतो, ज्याच्या प्रदुर्भावामुळे चालण्यास वेदना व अस्वस्थता जाणवते व खुरांचा विकार (ओबडधोबड वाढ) होते.

लक्षणे

 • जनावर चालताना लंगडते व जास्त वेळ उभे राहू शकत नाही.
 • प्रभावित जनावर कळपापासून वेगळे राहते.
 • शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात.

आरोग्यावर होणारे परिणाम

 • दुग्ध उत्पादनात मोठी घट होते.
 • प्रजनन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो व लंगडनारी जनावरे काही उशिराने माजावर येतात.
 • खुरांच्या आजारामुळे अस्वस्थ असणाऱ्या जनावरांची हालचाल व भूक मंदावते, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन आहाराच्या पूर्ततेअभावी दूध उत्पादनात लक्षणीय घट होते.
 • रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता बळावते.
 • तीव्र वेदनेमुळे जनावर इतरांपेक्षा वेगळे राहते व चारा कमी खाते.
 • वेळीच लक्ष न दिल्यास खुरांच्या गळूचे रूपांतर न भरणाऱ्या जखमेत होऊन त्यात अळ्या पडण्याची शक्यता असते.
 • पशूंच्या एकूणच आरोग्य व उत्पन्नावर परिणाम होऊन जीवनमान कमी होते.

उपाय

 • लक्षणे दिसणाऱ्या जनावरांना वेगळे बांधावे.
 • जखम कोरडी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
 • शेण व गोमूत्राचा जखमेशी संपर्क टाळण्याचा प्रयत्न करावा.
 • जनावरांच्या लंगडण्याचे कोणतेही लक्षण दिसताच जवळील पशुवैद्यकांना तात्काळ संपर्क साधून उपचार करून घ्यावेत.
 • जनावरांच्या पायात काटा अथवा खडा रुतला असता, तात्काळ खुर स्वच्‍छ करून पायातील काटा काढल्यास पुढील होणाऱ्या संभाव्य जखमेपासून जनावरांचा बचाव करता येईल.

काळजी

 • खुरांची नियमित ट्रीमिंग/ छाटणी करावी.
 • गोठ्यात नियमित स्वच्‍छता राखावी व गोठ्यातील जागा समांतर असावी.
 • सहा महिन्‍यातून किमान एकदा जनावराच्या पायाची स्वच्छता करावी.
 • मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावावी.
 • जंतुनाशक द्रव्याची नियमित फवारणी करावी.
 • आठवड्यातून किमान एकदा १ लिटर पाण्यात ५० ग्रॅम पोटाशियम परमॅंगनेटचे द्रावण बनवून जनावरांचे पाय किमान ३० मिनीटे त्यात बुडवावेत.

आहार व खुरांचे आरोग्य
दुधाळ जनावरांची उत्पादकता व खुरांचे आरोग्य व्यवस्थापन यामध्ये पशु आहाराचा महत्त्वाचा वाटा आहे.

 • खाद्य व विशेषतः खुराक यामध्ये अचानक बदल करणे टाळावे कारण असे बदल पशूंच्या पोटात आम्लाची मात्रा वाढवतात व जनावरे ल्यामीनाईटीस (Laminitis) नावाच्या खुरांच्या आजारास बळी पडतात .
 • पशु आहारात खुराक/ पशुखाद्याचा अति वापर झाल्यास रोमंतीकेमध्ये आम्लाची मात्रा वाढते व परिणामी पशूंच्या शरीरात जीवनसत्व बायोटीनचे नैसर्गिक संश्लेषण कमी प्रमाणात होते.
 • जीवनसत्व बायोटीन हे खुरांची योग्य वाढ व खुरांच्या जखमा भरून येण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात, म्हणूनच पशुना संतुलित आहार व रुमेण बफर मिश्रणाचा योग्य पुरवठा करावा जेणेकरून जीवनसत्व बायोटीन हे पशूंच्या शरीरात नैसर्गिकपणे संश्लेषित/ तयार होईल.
 • सूक्ष्म घटक / खनिजे उदा. झिंक, मॅंगेनीज, कॉपर, कोबाल्ट ई. खुरांचे आरोग्य तसेच जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती, प्रजनन क्षमता, हाडांच्या वाढीमध्ये मोलाची भूमिका बजावतात त्यामुळे त्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच सूक्ष्म खनिजांचा पशू आहारात योग्य समावेश करून ल्यामीनाईटीस (Laminitis) आजारावर आळा घालता येतो.

निरोगी खुरांसाठी फुटबाथ (खुर धुणे) चा वापर :

 • गोठ्याची दैनंदिन स्वच्छता व मलमूत्राच्या योग्य विल्हेवाटीबरोबरच जनावरांच्या पायाची व खुरांची स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरण करून आजारापासून बचाव करणे व दुग्ध उत्पादनात सातत्य ठेवण्यासाठी जनावरांना फुट बाथ देणे आवश्यक असते.
 • गोठ्यामध्ये किवा गोठ्याच्या प्रवेशद्वारापाशी फुटबाथसाठी निर्धारित जागा असावी.
 • फुट बाथ द्रावण तयार करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची व्यावसायिक मिश्रणे उपलब्ध आहेत ती तज्‍ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने खरेदी करावीत.

फुटबाथची रचना व आकारमान

 • जनावरांना फूट बाथ द्रावणात सहजपणे उभे राहता यावे अशा रचनेचे फूट बाथ बांधावे.
 • साधारणतः फूट बाथ हे ५ मीटर लांब × १.८ मीटर रुंद ×१५ मीटर खोल अशा रचनेचे असावे.
 • खुर पूर्णपणे द्रावणात बुडतील याप्रमाणे फुटबाथ मध्ये द्रावण (१०-१२) सेेंमी खोल असावे.

फुटबाथ कालावधी व दरम्यान घ्यावयाची काळजी

 • खुरांचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ३०-४० मिनिटांचा कालावधी लागतो.
 • फूट बाथ दरम्यान गायी, म्हशी व वासरे हे द्रावण पिणार नाहीत याची काळजी घ्यावी.
 • फूट बाथ द्रावण वापरानंतर शेतजमीन किवा कुरण यांमध्ये सोडण्याऐवजी योग्य प्रक्रिया करूनच सांडपाण्यात सोडावे.
 • स्थानिक तज्‍ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने फुटबाथ द्रावण तयार करावे व द्रावण हे सौम्य मात्रे मध्येच असेल याची दक्षता घ्यावी.

संपर्क ः डॉ. अतुल वाळुंज, ८२९५६३५१९९
(पशुशरीर क्रिया शास्त्र विभाग, राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरयाणा)

इतर कृषिपूरक
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...