कुल्फी हा गोठवलेला थंड आइस्क्रीमचा प्रकार प्रसिद्ध अाहे. साधारणपणे कुल्फी दूध अाटवून त्यामध्ये साखर मिसळून तयार केली जाते. स्वादासोबतच अाहाराच्या दृष्टीने कुल्फी अारोग्यदायी अाहे. कुल्फीमध्ये प्रोबायोटीक जिवाणूंचा वापर करून त्याची पाैष्टीकता वाढवता येते. कुल्फीमध्ये लॅक्टोबॅसिलस केजी, लॅक्टोबॅसिलस एसिडोफिलस इत्यादी प्रोबायोटिक जिवाणूचा वापर करता येतो. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यास मदत करतात.
कुल्फीसाठी आवश्यक घटक पदार्थ गाय किंवा म्हैशीचे दूध, मलई, साखर, फळांचा रस, चॉकलेट, प्रोबायोटिक जिवाणू आणि रंग इत्यादी घटक कुल्फी बनवण्यासाठी आवश्यक असतात.
पाैष्टीक घटक घटक ः प्रमाण एकूण घन पदार्थ ः ३६ टक्के फॅट ः २.५ ते १० टक्के प्रथिने ः ३.५० टक्के साखर ः १३ टक्के लॅक्टीक ॲसिड ः ०.२० टक्के प्रक्रिया गायीचे किंवा म्हशीचे दधू ९० अंश सेल्सिअस तापमानाला १० मिनिटे गरम करावे.
संपर्क ः समीर भागवत, ९८९०३८३२६५ (राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरयाणा)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.