Agriculture story in Marathi, problems of farmpond fishfarming | Agrowon

योग्य नियोजनातून सोडवा मत्स्यशेतीतील समस्या
डॉ. अजय कुलकर्णी, विजय सुतार
बुधवार, 20 डिसेंबर 2017

मत्स्यशेती करताना हवामानातील बदलामुळे व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे विविध समस्या उद्‌भवतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना केल्यास समस्यांवर मात करता येते. चांगल्या व्यवस्थापनातून मत्स्य उत्पादनात वाढ होऊन आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते.
 

मत्स्यशेती करताना हवामानातील बदलामुळे व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे विविध समस्या उद्‌भवतात. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपाययोजना केल्यास समस्यांवर मात करता येते. चांगल्या व्यवस्थापनातून मत्स्य उत्पादनात वाढ होऊन आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होते.
 
मत्स्यशेतीचे यश हे व्यवस्थापनावर अवलंबून असते. मत्स्यसंवर्धनामध्ये पूर्वतयारी, मत्स्यबीज संचयन व त्यानंतरचे व्यवस्थापन हे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. मत्स्यशेती करत असताना काही समस्या उद्‌भवतात, त्याचा परिणाम माशांच्या वाढीवर होऊन उत्पादनात घट होते व त्यामुळे आर्थिक तोटा होतो. त्यामुळे अशा समस्यांवर त्वरित उपाययोजना करणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी मत्स्यसंवर्धनामध्ये येणाऱ्या प्रमुख समस्यांची व त्यावरील उपाययोजनांची माहिती घेणे आवश्‍यक आहे.

१. तलावातील पाण्यात जास्त शेवाळ तयार होणे

 • मत्स्य तलावामध्ये खतांचे प्रमाण जास्त झाल्यावर पाणी गडद हिरव्या रंगाचे होते व पाण्यावर खूप शेवाळ तयार होते. त्यामुळे तलावातील प्राणवायूचे प्रमाण विशेषतः रात्री व पहाटे खूप कमी होऊन मासे पृष्ठभागावर येतात.
 • काही वेळेस पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण अतिशय कमी झाल्यामुळे माशांची मरतूक होते. अशावेळेस पाण्यावरील शेवाळ जाळीने काढून तळ्यामध्ये प्रती एकर ५० ते १०० किलो चुना टाकावा.

२. माशांची वाढ न होणे

 • मत्स्यसंवर्धन काळामध्ये माशांची वाढ झपाट्याने होणे अपेक्षित असते. परंतु काही कारणांमुळे माशांची वाढ होताना दिसून येत नाही. माशांना खाद्य कमी प्रमाणात देणे हे एक कारण असू शकते.
 • माशांना चांगल्या प्रतीचे पूरक खाद्य नियमितपणे दिले पाहिजे. या उलट हिवाळ्यामध्ये पाण्याचे तापमान कमी झाल्यामुळे माशांचे खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.
 • अशा वेळेस पूरक खाद्याचे प्रमाण कमी करावे. कारण माशांनी न खालेले खाद्य तलावाच्या तळाशी जमा होते व त्यामुळे पाण्याचा दर्जा खालावतो व त्याचा परिणाम माशांच्या वाढीवर होतो.

३. मासे पृष्ठभागावर येणे

 • पहाटेच्या वेळी असंख्य मासे तलावातील पाण्याच्या पृष्ठभागावर येतात व तोंडाची उघडझाप करतात. याचा अर्थ पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झालेले आहे असे समजावे.
 • ही समस्या मुख्यत्वे उन्हाळ्यामध्ये दिसून येते. अशावेळेस पंपाद्वारे तलावामध्ये पाणी उंचावरून टाकणे. त्यामुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण वाढते.
 • आधुनिक किंवा सधन मत्स्यसंवर्धन पद्धतीत एरेटर्सचा वापर करतात. या शिवाय स्प्रिंकलर्सद्वारेही पाणी तलावामध्ये टाकल्यास प्राणवायूचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

४. माशांची मरतुक होणे

 • माशांमध्ये रोगाचे प्रमाण वाढल्यास मरतुक होते. ही समस्या हिवाळ्यामध्ये उद्‌भवते. यामध्ये फिनरॉट, टेलरॉट यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
 • अशावेळेस चुना, पोटॅशियम परॅमगनेट, मिठाचे द्रावण इ. चा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने रोग नियंत्रणासाठी करावा.
 • रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या माशांची तपासणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करून उपाययोजना कराव्यात.
 • काही वेळेस माशांच्या अंगावर किंवा कल्ल्याच्या अथवा पराच्या मागे अर्ग्युलस नावाचे परजीवी आढळून येतात. हे अर्ग्युलस माशांचे रक्त पितात व मासे अशक्त होतात.
 • माशांवर या परजीवींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास शरीरावर जखमा होऊन जिवाणूंचा प्रादुर्भाव होतो व माशांची मरतूक होते. यासाठी चुना, पोटॅशिअम परमॅंगनेट, मीठाचा वापर करावा.

संपर्क ः डॉ. अजय कुलकर्णी,
(मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

 

इतर कृषिपूरक
म्हशींना खाद्यासोबत द्या खनिज मिश्रणेम्हशीच्या चयापचय क्रियेसाठी, शारीरिक वाढीसाठी,...
लसीकरण, जागरूकतेतून टाळा रेबीज रोगाचा...जागितक आरोग्य संघटनेनुसार आपल्या देशातील 70 टक्के...
दुग्ध व्यवसायातून गटाने मिळविली बाजारपेठबोपी (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) गावातील...
हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित...हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
समतोल आहारातून वाढेल दुग्धोत्पादन म्हैस पालन फायदेशीर होण्याकरिता...
शेतावरच करा गांडूळ खताची निर्मितीगांडूळ खत जमीन सुधारण्याच्या व पिकाच्या वाढीच्या...
तंत्र सायप्रिनस माशांच्या बीजोत्पादनाचेप्रजनन योग्य नर आणि मादीची निवड ...
खनिज पुरवठ्यामुळे वाढते प्रजननक्षमतासूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये विविध...
अोळख कोकण कन्याळ शेळीची... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
म्हशींच्या चांगल्या अारोग्यासाठी...हवामान, उपलब्ध असणारे मनुष्यबळ, चारा व पाण्याची...
अाहारातून जनावरांना करा खनिजांचा पुरवठा सूक्ष्म खनिजे शरीराला अतिशय कमी...
वाढवा दुधातील फॅटचे प्रमाणशासनाच्या नियमावलीनुसार गाईच्या आणि म्हशीच्या...
पशुसल्लासाधारणतः गायीचा गर्भधारणेचा कालावधी हा २८२...
अळिंबी प्रथिनांतून पदार्थाच्या पोषकतेत...आहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः...
अत्याधुनिक पशुपालनात इस्राईलचा ठसाइस्राईलमधील पशुपालनाची त्रिसूत्री म्हणजे गाईंचा...
अोळखा थंडीमुळे येणारा जनावरांतील ताणसध्या तापमानात घट होत अाहे व थंडीचे प्रमाण वाढत...
अंडी, मांस उत्पादनासाठी श्रीनिधी...कुक्कुट संशोधन संचालनालय, हैदराबाद या संस्थेने...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींची...बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हैसपालन हा मुख्य व्यवसाय...
जनावरांतील गर्भधारणेसाठी योग्य...वांझ जनावरांची जोपासना हे आर्थिकदृष्ट्या...