सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थ

सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थ
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थ

सोयाबीन हे ४० टक्के प्रथिने आणि २० टक्क्यांपेक्षा जास्त तेल असलेले महत्त्वाचे पीक आहे. सोयाबीनपासून प्रामुख्याने दूध, टोफू या पदार्थांसोबतच स्नॅक्स, लाडू, कुकीज असे पदार्थही बनवता येतात. मिसो, टेम्पे, सोया सॉस असे असे नाविन्यपूर्ण पदार्थ बनवता येतात. उच्च प्रथिनेयुक्त घटक, जीवनसत्त्व, खनिजे आणि विरघळणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे सोयाबीनचा अाहारात समावेश असणे अावश्‍यक अाहे. सोयायुक्त आहारात असलेल्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका नसतो. सोया प्रथिनांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

प्रक्रिया करूनच वापरा सोयाबीन

  • सोयाबीनपासून पारंपरिक पद्धतीने घरगुती पदार्थही बनवता येतात. हे पदार्थ बनवत असताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. जसे, कच्चे सोयाबीन आहारात वापरू नये.
  • सोयाबीनवर प्रक्रिया करूनच वापरावे. त्यातील विरोधी पोषण मूल्यांचे प्रमाण कमी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सोयाबीन दाण्यांवरील साल काढणे, आंबवणे, डाळ बनवून भाजून वापरणे अशा विविध प्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे सोयाबीनधील पोषणमूल्याचे प्रमाण वाढते.
  • सोयाबीनचे विविध पदार्थ १) सोया स्नॅक्‍स

  • ५०० ग्रॅम सोयाबीन निवडून स्वच्छ पाण्यात १२ ते १६ तास भिजत ठेवावे.
  • भिजवलेले सोयाबीन कपड्यात बांधून उकळक्‍या पाण्यात ५-१० मिनिटे धरावे.
  • सोयाबीन दाण्यांवरील साल काढून टाकावी.
  • सोललेल्या सोयाबीनला सुकवून, सुकलेल्या सोयाबीन दाण्यांना जेवढे चिटकेल तेवढेच २५० ग्रॅम डाळीचे पीठ लावावे.
  • चवीनुसार तिखट, मीठ, मसाले, लसूण पेस्ट टाकावी.
  • दाणे सुटे सुटे तळून घ्यावेत. तळलेल्या सोया स्नॅकवर चवीनुसार चॅट मसाला लावावा.
  • २) सोया लाडू

  • निवडलेले सोयाबीन हलक्‍या हाताने भाजून वरची साल काढावी.
  • साल काढलेल्या सोयाबीनचे मिक्‍सरमधून बारीक पीठ करावे.
  • ५०० ग्रॅम पिठामध्ये २०० ग्रॅम तुप मिसळून भाजून घ्यावे.
  • पिठामध्ये ७०० ग्रॅम साखर मिसळून मिश्रण थंड करून लाडू बांधावेत.
  • पिठाच्या २० टक्के पोह्याचे पीठ मिसळल्यास लाडूचा खुसखुशीतपणा वाढतो.
  • ३) सोया कुकीज

  • २०० ग्रॅम सोयापीठ, ७०० ग्रॅम मैदा चाळून घ्यावा.
  • या पिठामध्ये बेकिंग पावडर मिसळावी.
  • दुसऱ्या भांड्यात ५०० ग्रॅम पिठी साखर अाणि ५०० ग्रॅम वनस्पती तूप एकत्र मिसळावे.
  • पिठी साखर अाणि वनस्पती तुपाच्या मिश्रणामध्ये चाळलेला सोयापीठ अाणि मैदा चांगला मिसळावा.
  • गोळा तयार करून पिठाच्या गोल अाकाराच्या कुकीज तयार कराव्यात.
  • ट्रेमध्ये मैदा पसरवून कुकीज ठेवाव्यात. १८० अंश सेल्सिअस तापमानाला अोव्हन मध्ये २० मिनिटे बेक कराव्यात.
  • सोयाबीनचे नावीन्यपूर्ण पदार्थ

  • मिसो - हा पदार्थ आंबवलेल्या सोयाबीन पेस्टपासून बनवला जातो. या पदार्थामध्ये खनिजांचे प्रमाण जास्त अाहे.
  • टेम्पे - हा इंडोनेशियन पदार्थ असून सोयाबीनचे साल काढून त्यापासून केक तयार केला जातो. यातून शरीराला प्रथिने, जीवनसत्त्व बी अाणि खनिजांचा पुरवठा होतो.
  • टोफू - सोयाबीन दुधाचे दही बनवून त्यापासून पनीर बनवले जाते, यालाच टोफू असे म्हणतात. यातून शरीराला प्रथिने, लोह आणि कॅल्शिअमचा पुरवठा होतो.
  • याशिवाय दरोराजच्या पदार्थांची पाैष्टिकता वाढविण्यासाठी पोळ्या करताना एक किलो गव्हाच्या पिठासाठी १०० ग्रॅम सोयापीठ मिक्‍स करावे. बिस्किटे, केक, ब्रेड बनवताना मैद्याबरोबर काही प्रमाणात सोया पीठ वापरले तर या बेकरी पदार्थांची पौष्टिकता वाढते.
  • संपर्क ः एस. अार. पोपळे, ९४०४९६३४४९ (साै. के. एस. के. काकू अन्न तत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com