प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ कृत्रिम रबर

प्रथिनांद्वारे अधिक टिकाऊ व पुनर्वापरयोग्य असे कृत्रिम रबर बनविण्याचे तंत्र चीन येथील संशोधकांनी विकसित केले आहे.
प्रथिनांद्वारे अधिक टिकाऊ व पुनर्वापरयोग्य असे कृत्रिम रबर बनविण्याचे तंत्र चीन येथील संशोधकांनी विकसित केले आहे.

निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन येथील संशोधकांनी नैसर्गिक रबराप्रमाणेच असलेल्या रबराचे कृत्रिम स्वरूप मिळविण्यात यश आले आहे. हे मूलद्रव्य टणक आणि अधिक काळ टिकणारे आहेत. ताणाच्या स्थितीमध्येही अंतर्गत रचना या तुलनेने अधिक स्थिर असल्याचे संशोधकांचे मत असून, नैसर्गिक रबराच्या तुलनेमध्ये पुनर्वापरासाठी अधिक सोपे असल्याचे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक रबरामध्ये लवचिक अशा पॉलिमरचा समावेश असतो. त्यांच्या प्रक्रियेतून टायर, रबरी सतरंजी (मॅट्रेस) तयार करता येतात. काही कृत्रिम रबरामध्ये नैसर्गिक रबराप्रमाणे पॉलिमर साखळ्या असल्या तरी नैसर्गिक रबर हे अधिक सक्षम असल्याचे स्पष्ट आहे. यांत्रिक ताण देऊन त्यामध्ये कडकपणा आणला जातो, या प्रक्रियेला 'स्ट्रेन क्रिस्टलायझेशन' म्हणतात. यातून बाह्य बाजूच्या प्रथिने आणि फॉस्फोलिपिड्सची साखली अधिक घट्टपणा आणते. चीन येथील सिचूयान विद्यापीठातील संशोधक युन क्षियांग क्षू आणि ग्युआंग्सू हुआंग यांनी कृत्रिम रबरामध्ये हे गुणधर्म आणण्यासाठी नवे तंत्र शोधले आहे. त्यासाठी कोळ्याच्या जाळ्यापासून प्रेरणा मिळाली आहे. कोळ्याच्या धाग्यामध्ये स्थिरता आणि क्षमता प्रचंड असून, औष्णिक स्थिरताही असते. तशी क्षमता मिळविण्यासाठी त्याप्रमाणे लहान पॉलिमर साखळी (अलानाईन अमिनो आम्लाच्या चार मूलद्रव्यांपासून) बनवली आहे.

फायदे

  • नैसर्गिक रबराप्रमाणे सक्षम व टिकाऊ आहे.
  • पारंपरिक रबरावर करावी लागणारी व्हल्कनायझेशनची प्रक्रिया करण्याची आवश्यकता राहत नाही.
  • सध्या केवळ पुनर्वापर करणे शक्य नसल्याने रबराच्या टाकाऊ घटकांचा कचरा वेगाने वाढत आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com