Agriculture story in marathi, rabbi onion varieties | Agrowon

रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌ रोपवाटिका
डॉ. राजीव काळे, डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ. ए. थंगासामी
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी ऑक्‍टोबर महिन्यात करतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

दर्जेदार कांदा उत्पादन तसेच रब्बी हंगामात उपयुक्त ठरतील अशा खालील जातींची लागवड करावी.

भीमा शक्ती

महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी रोपवाटिकेची तयारी ऑक्‍टोबर महिन्यात करतात. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित जातींचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

दर्जेदार कांदा उत्पादन तसेच रब्बी हंगामात उपयुक्त ठरतील अशा खालील जातींची लागवड करावी.

भीमा शक्ती

 • महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, बिहार, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओरिसा आदी राज्यांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त जात आहे.
 • कांद्याचा रंग लाल असतो.
 • लागवडीनंतर कांदा १२५ ते १३० दिवसांत काढणीस येतो.
 • सरासरी उत्पादन २८ ते ३० टन प्रतिहेक्‍टर येते.
 • कांद्याची साठवणक्षमता पाच ते सहा महिने असते.
 • फुलकिडे व बुरशीजन्य रोगांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

भीमा किरण

 • महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, बिहार आणि पंजाब आदी राज्यांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे.
 • पुनर्लावणीनंतर १२५ ते १३५ दिवसांत ही जात काढणीस तयार होते.
 • सरासरी उत्पादन ८ ते ३२ टन प्रति हेक्‍टरपर्यंत मिळते.
 • काढणीनंतर पाच ते सहा महिन्यांपर्यंत साठवण क्षमता आहे.
 • बुरशीजन्य रोगांसाठी काहीप्रमाणात सहनशील आहे.

भीमा रेड

 • महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात रब्बी हंगामासाठी शिफारस.
 • पुनर्लावणीनंतर ११० ते १२० दिवसांत ही जात काढणीस तयार होते.
 • सरासरी उत्पादन ३० ते ३२ टन प्रति हेक्‍टरपर्यंत होते.
 • साठवण क्षमता काढणीनंतर तीन महिन्यांपर्यंत आहे.
 • फुलकिड्यांसाठी काहीप्रमाणात सहनशील आहे.

भीमा श्वेता

 • महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, बिहार आणि पंजाब राज्यांमध्ये लागवडीसाठी उपयुक्त आहे.
 • ही पांढऱ्या कांद्याची जात
 • लागवडीनंतर ११० ते १२० दिवसांत ही जात काढणीस तयार होते.
 • सरासरी उत्पादन २६ ते ३० टन प्रतिहेक्‍टरपर्यंत होते.
 • साठवण क्षमता काढणीनंतर तीन महिन्यांपर्यंत आहे.
 • ही जात प्रक्रिया करण्यासाठी उपयुक्त आहे.
 • फुलकिड्यांसाठी काही प्रमाणात सहनशील आहे.

कांदा रोपवाटिका व्यवस्थापन

 • ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात रब्बी कांदा रोपवाटिका करावी.
 • एक हेक्‍टर क्षेत्रात रोप उपलब्धतेसाठी पाच गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका पुरेशी होते. त्यासाठी ५-७ किलो बियाणे लागते.
 • मशागतीवेळी खोल नांगरट करून घ्यावी. वाफे तयार करण्यापूर्वी अगोदरच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढून टाकावेत.
 • अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
 • गादीवाफे १०-१५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब तयार करावेत.
 • तणांच्या नियंत्रणासाठी वाफ्यांवर पेंडीमिथॅलिन २ मि.ली. प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे.
 • बीजप्रक्रियाः पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यावर २ ग्रॅम कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी.
 • मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी हे जैविक बुरशीनाशक १२५० ग्रॅम प्रतिहेक्‍टर याप्रमाणे वापरावे.
 • पेरणीपूर्वी नत्र, स्फुरद, पालाश ४ः१ः१ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात खते देण्याची शिफारस केली आहे.
 • बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे आहे.
 • रोपवाटिका पेरणीनंतर १५ ते २० दिवसानंतर मेटॅलॅक्झील अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे फवारणी केल्यास मर रोग आटोक्यात ठेवता येतो.
 • पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करावी. त्यानंतर नत्र २ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात द्यावे.
 • फुलकिड्यांचे नियंत्रण  ः (फवारणी प्रतिलिटर पाणी) फिप्रोनील १ मि.ली. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.ली.
 • रोग नियंत्रण ः (फवारणी प्रतिलिटर पाणी)  
  काळा करपा ः मॅन्कोझेब १ ग्रॅम,  जांभळा व तपकिरी करपा ः ट्रायसायक्‍लॅझोल १ ग्रॅम  किंवा हेक्‍साकोनॅझोल १ ग्रॅम.

संपर्क  : डॉ. राजीव काळे, ०२१३५ - २२२०२६
(कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

इतर अॅग्रो विशेष
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...
असा घ्यावा मातीचा नमुना मातीचा नमुना तीन ते चार वर्षांनंतर एकदा घेतला...
हिरवळीच्या खतांवर भर द्या : सुभाष शर्मायवतमाळ येथील सुभाष शर्मा यांच्याकडे वीस एकर शेती...
कापूस आयात शुल्कवाढीचा विचारमुंबई ः केंद्र सरकारने देशांतर्गत शेतमालाचे दर...
कृषी संजीवनी प्रकल्पाचे एक पाऊल पुढेमुंबई : विदर्भ, मराठवाडा आणि खारपाण पट्ट्यातील ५,...
कृषी, घरगुती पाणी वापर दरात १७ टक्के...मुंबई: महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने...
फळबागेचे फुलले स्वप्न‘माळरानात मळा फुलला पाहिजे` हे वडिलांचे वाक्‍य...
नांदूरमध्यमेश्वरच्या पक्षी महोत्सवास...नाशिक : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे...
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...