रेबीज नियंत्रणासाठी लसीकरण प्रभावी

रेबीज नियंत्रणासाठी लसीकरण प्रभावी
रेबीज नियंत्रणासाठी लसीकरण प्रभावी

रेबीज या रोगावरची लस शोधून काढणारे थोर शास्त्रज्ञ लुईस पाश्‍चर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २८ सप्टेंबर हा जागतिक रेबीज दिन म्हणून साजरा केला जातो. हा रोग मानवाप्रमाणेच इतर पाळीव प्राणी जसे, शेळी, मेंढी, गाय, म्हैस, घोडा यांच्यामध्ये आढळतो.

रेबीज प्राण्यांपासून माणसांच्या शरीरात प्रवेश करतो. जागतिक आरोग्य संस्थेच्या नोंदीनुसार जगामध्ये जपान, डेन्मार्क, यू. के. स्वीडन, ग्रीस हे देश व भारतातील अंदमान निकोबार बेटे व लक्षद्वीप रेबीजमुक्त झाले आहेत. भारतामध्ये या रोगामुळे दरवर्षी २०००० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होतो.

रेबीज काय आहे?

  • हा एक विषाणूरहित प्राणिजन्य रोग आहे. जो मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये पिसाळलेला श्‍वान व प्राणी (प्रामुख्याने रानटी प्राणी आणि वटवाघूळ) चावल्यावर पसरतो.
  • मानवामध्ये ९९ टक्के रेबीजच्या घटना श्‍वान चावल्यामुळे होतात.
  • रेबीज १०० टक्के घातक आहे. परंतु यापासून १०० टक्के बचाव संभव आहे.
  • रेबीज कसा पसरतो? पिसाळलेल्या जनावरांच्या लाळेपासून या रोगाचा विषाणू चावलेल्या जखमेद्वारा शरीरामध्ये प्रवेश करतो.

    रोगाची लक्षणे लक्षणे श्‍वान चावल्यानंतर १ ते ३ महिन्यांनंतर दिसून येतात. रेबीज हा मनुष्यामध्ये दोन प्रकारांमध्ये दिसून येतो.

    १) आक्रमक रेबीज (फ्युरिअस)

  • अतिआक्रमक किंवा असामान्य व्यवहार
  • तोंडावाटे लाळ व फेस गळण्यास सुरवात होते. आवाजामध्ये बदल होतो. घशाच्या मांसपेशीच्या लकव्यामुळे (पॅरालिसीस) पाणी पिण्यास असमर्थता ज्यास हायड्रोफोबिया असे संबोधतात.
  • बेशुद्ध अवस्था आणि मृत्यू.
  • २) शांत रेबीज (डम)

  • यामध्ये लक्षणे ओळखणे फार कठीण असते.
  • रोगी शांत व एकांतात जाऊन बसतो.
  • अंशतः लखवा होऊन रोगी दगावतो.
  • पिसाळलेला श्‍वान चावल्यास नेमके काय करावे?

  • लवकरात लवकर लसीकरण करावे.
  • जखम स्वच्छ पाण्याने व जंतूनाशक साबणाने धुवून घ्यावी.
  • जखमा गंभीर असतील तर त्या घटनांमध्ये रेबीज प्रतिबंधक सिरम देणे गरजेचे असते. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य लसीकरण करून घ्यावे.
  • लसीकरण प्रभावी होण्यासाठी

  • पूर्ण पाच लसी घ्याव्यात. (०, ३, ७, १४, २८ आणि ९० व्या दिवशी).
  • विशेष सावधानता 

  • रेबीजवर कुठलाही इलाज नाही. लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे.
  • जखमेवर लसूण लावून, चुना लावून, केरोसीन लावून, मिरची किंवा जडीबुटीपासून ठीक होत नाही.  
  • पाळीव आणि भटक्‍या श्‍वानांना लसीकरण करावे.
  • भटक्‍या श्‍वानांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रित करावी.
  • मुलांना श्‍वानांविषयीचे व्यवहार आणि रेबीजबद्दल प्रशिक्षण द्यावे.
  • जनावरांच्या कुठल्याही जखमांकडे दुर्लक्ष करू नये.
  • संपर्क ः  डॉ. आर. एन. वाघमारे, ९४०५४९१५२३ (पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ्य विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com