माशांतील प्रदूषणकारी घटक ओळखण्यासाठी कीट विकसित

माशातील प्रदुषणकारक घटक शोधणारे कीट
माशातील प्रदुषणकारक घटक शोधणारे कीट

ताज्या माशांमध्ये होणारी भेसळ त्वरीत ओळखण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्थेने भेसळ व प्रदूषण निदान कीट तयार केले आहे. या कीटमुळे दोन ते तीन मिनिटांमध्ये भेसळ ओळखणे शक्य होणार आहे.

मासे हा प्रथिने आणि असंपृक्त मेदाम्लासह अन्य मूलद्रव्यांनी परिपूर्ण असा आहार आहे. प्रामुख्याने स्वस्तामध्ये उपलब्ध असल्याने अनेक देशांमध्ये भात आणि मासे हे प्रमुख अन्न आहे. परिणामी मासे हा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मासे पकडल्यानंतर बाजारात येईपर्यंत त्यामध्ये अनेक विषारी घटकांचा अंतर्भाव होतो. त्यात प्रामुख्याने फॉर्मेल्डीहाईड, अमोनिया इ. यांचा समावेश आहे.

  • फॉर्मेल्डिहाईड हा विषारी अल्डिहाईट असून, आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेच्या अहवालानुसार कर्करोगकारक असल्याचे मानले जाते.
  • अमोनिया हा कर्करोगकारक नसला तरी त्याचा सातत्याने आहारामध्ये समावेश होत राहिल्यास आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे विशेषतः तोंडातील नाजूक त्वचा, घसा, अन्ननलिका आणि आतडे यांना इजा होतात.
  • आहारात अधिक प्रमाणात माशांचा समावेश असलेल्या विभागामध्ये या दोन्ही समस्या प्राधान्याने दिसून येतात. त्यामुळे माशांतील प्रदूषणकारक घटक त्वरेने ओळखणे आवश्यक बनले आहे. सध्या वापरामध्ये असलेल्या पद्धती तुलनेने वेळखाऊ आणि किचकट आहेत. केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्थेने कमी खर्चाची आणि वापरण्यास अत्यंत सोपी पद्धत विकसित केली आहे. माशांतील फॉर्मेल्डिहाईड आणि अमोनिया वेगाने ओळखण्यासाठी पेपर स्ट्रिप (कागदी पट्ट्या) तयार केल्या आहेत. फॉर्मेलिन आणि अमोनिया या दोन घटकांचे प्रदूषण ओळखण्यासाठी दोन वेगळे कीट आहेत.
  • प्रत्येक कीटमध्ये २५ पट्ट्या आणि रिअजण्ट द्रावण आणि कलर चार्ट दिलेला आहे. यातील एक पट्टी मासे किंवा माशांच्या मांसावर ठेवून त्यावर एक ते दोन थेंब रिअजण्ट द्रावणांचे टाकावेत. केवळ दोन ते तीन मिनिटांमध्ये या पट्ट्याच्या रंगामध्ये बदल होऊन भेसळ किंवा प्रदूषण आहे की नाही, हे समजते. पट्टीला आलेला रंग सोबत दिलेल्या कलर चार्टशी ताडून पाहिल्यानंतर प्रदूषणाचे नेमके प्रमाण समजते.
  • फॉर्मेलिन प्रदूषणासाठी ः

  • जर पट्टीवरील रंग हा फिक्कट गुलाबी आल्यास माशांचा नमुना फॉर्मेलिनरहित असल्याचे मानावे.
  • पट्टी माशांवर ठेवताच हिरव्या रंगाची झाल्यास व त्यावर रिअजण्ट टाकल्यानंतर त्याचा रंग गदड निळा झाल्यास त्यातील फॉर्मेलिनचे प्रमाणे २० ते १०० मिलिग्रॅम प्रति किलो असल्याचे समजावे. असे मासे खाण्यास सुरक्षित व योग्य नसतात.
  • अमोनिया प्रदूषणासाठी ः

  • अमोनियाचे प्रदूषण असल्यास रंग गडद निळा झाल्यास अमोनियाचे प्रमाणे ३०० मिलिग्रॅम प्रतिकिलोपेक्षा अधिक असल्याचे समजावे.
  • अमोनियाचे प्रमाण १०० ते ३०० मिलिग्रॅम प्रतिकिलो या दरम्यान किंवा त्यापेक्षा कमी असल्यास मासे खाण्यासाठी सुरक्षित मानले जातात. यासाठी पट्ट्याचा रंग हा फिक्कट निळा ते फिक्कट हिरवा असतो.
  • थोडक्यात या नव्या तंत्रज्ञानामुळे माशांतील प्रदूषण किंवा भेसळ त्वरेने ओळखणे शक्य होणार आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com