Agriculture story in Marathi, remedies on snakebite | Agrowon

प्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची तीव्रता
डॉ. क्षितिजा कुलकर्णी
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक असलेले साप, विंचू यांच्याशी संपर्क नक्कीच येतो. यातूनच सर्पदंशासारख्या घटना घडतात. अशावेळी घाबरून न जाता प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करावेत.

निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक असलेले साप, विंचू यांच्याशी संपर्क नक्कीच येतो. यातूनच सर्पदंशासारख्या घटना घडतात. अशावेळी घाबरून न जाता प्रथमोपचार करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करावेत.

शेतकरी, शेतमजूर व लहान मुले यांच्या बाबतीत साप, विंचू चावणे अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. भारतात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्व जगात जास्त आहे, असे मानले जाते. परंतु वास्तविक पाहता हे मृत्यू आपण टाळू शकतो. त्याकरिता रुग्णास आवश्यक ते प्रथमोपचार व ताबडतोब रुग्णालयात हलवणे आवश्यक असते. आपण याची माहिती घेऊच, पण त्याआधी विषारी सापांची माहितीसुद्धा घेऊ. भारतामध्ये २३६ प्रकारचे साप आहेत. त्यातल्या १३ जाती विषारी आहेत. आपल्याकडे साधारणपणे चार प्रकारचे विषारी साप आढळतात. बहुतांश साप बिनविषारी असतात.

१. नाग : (cobra)
काळ्या रंगाचा मोठा, प्रसंगी ६-८ फूट लांबी व फणा असलेला साप. किंग कोब्रा हा एक याचा भाऊबंद. अत्यंत विषारी. काही मिनिटांतच यामुळे शरीराचे व श्वासाचे स्नायू कमजोर होऊन मृत्यू होतो.

२ मण्यार : (common krait)
काळ्या रंगाचा व अंगावर आडवे काळे पट्टे असलेला आकाराने लहान साप. २ फुटाच्या आसपास. बऱ्याचदा रात्री झोपेमध्ये असताना याचा दंश होतो व दंशाच्या खुणासुद्धा लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे निदान होण्यास अवघड. यामुळे साधारण ८ ते १२ तासांनी शरीराचे व श्वासाचे स्नायू कमजोर होऊन मृत्यू होतो.

३. घोणस : (Russels viper)
पिवळसर करड्या रंगाचा व अंगावर स्पष्ट, उठावदार, गोलाकार नक्षी. २ फुटाच्या आसपास. यामुळे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊन शरीरात रक्ताच्या गुठळ्या व काहीवेळा रक्तस्राव होतो. यामुळे मूत्रपिंड निकामी होते व मृत्यू होतो.

४ फुरसे : (saw scaled viper)
पिवळसर करड्या रंगाचा व अंगावर अस्पष्ट, फिकट ,गोलाकार नक्षी व डोक्यापासून शेपटीकडे जाणाऱ्या दोन लाटेसारख्या रेषा. मातीसारखा रंग असतो व मातीमध्ये लवकर दिसून येत नाही. विषाचे परिणाम घोणसे सारखेच साधारण.

प्रथमोपचार

  • रुग्णाला कल्पना द्यावी की, सर्पदंशावर उपचार आहेत, घाबरून जाऊ नये. कारण घाबरल्याने हृद्याचे ठोके वाढतात आणि विष लवकर पसरते.
  • रुग्णास खाली झोपवावे आणि दंश झालेली जागा हृदयाच्या खाली असावी. रुग्णाचे बूट, घड्याळ, अंगठी, ज्वेलरी आणि घट्ट कपडे काढून घ्यावे. दंश झालेली जागा स्थिर करावी. गरज पडल्यास मोडलेले हाड जागी नीट स्थिर बसावे यासाठी त्याभोवती बांधण्यासाठी वापरतात ती लाकडी फळी वापरून त्या भागाला हालचाल होणार नाही असे बांधावे. हा सर्वात महत्त्वाचा प्रथमोपचार आहे.
  • हृदयाला बाहेरून दाब देऊन ठोके चालू ठेवणे, तोंडाने कृत्रिम श्वास देणे याची गरज पडू शकते.
  • रुग्णास जवळच्या अद्ययावत रुग्णालयात न्यावे, जिथे सापाचे विष उतरवणारे औषध उपलब्ध असेल.
  • दंश झालेल्या जागेच्या वरती पूर्वी घट्ट दोरी किंवा कापड बांधावे. आता नवीन संशोधनानुसार असे करण्याची गरज नाही. दंशाच्या जागी ब्लेडने कापू नये, साबणाने धुवू नये, तिथे विजेचा झटका देऊ नये, बर्फ लावू नये, कुठलाही लेप लावू नये.
  • रुग्णाला पाणी, दारू आणि कुठलीही औषधे देऊ नयेत. सर्प पकडणे, मारणे असा आटापिटा करू नये. तसेच कुठल्याही भोंदू व्यक्तीकडे नेऊ नये.
  • दंश झालेल्या जागी घट्ट दाब देऊन पट्टी बांधणे फायदेशीर असते असे नवीन परदेशी संशोधनातून पुढे आले आहे.
  • प्रत्यक्षात बरेचसे सर्पदंश बिनविषारी सापांकडून होतात. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसते. सर्पदंश झालेल्या प्रत्येक रुग्णास साधारणपणे २४ तास निरीक्षणाखाली रुग्णालयात ठेवणे आवश्यक आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...