Agriculture story in marathi, requirement of breeding centers in goat rearing | Agrowon

उच्च प्रतीच्या वंशावळीसाठी शेळीपालनात पैदासकेंद्राची गरज
डॉ. तेजस शेंडे
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

उच्च प्रतीच्या वंशावळीसाठी पैदासकेंद्राची गरज जातिवंत शेळ्या तयार करून पैदाशीसाठी त्यांची विक्री केल्यास अशा नर-माद्यांना मटनाच्या शेळ्यांच्या बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळू शकते. त्यासाठी पैदास केंद्र किंवा पैदास संघटना स्थापन करणे फायद्याचे ठरते.

सध्या शेळीपालन व्यवसायाला उभारी मिळत आहे. जवळपास ७० ते ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त शेळीपालकाकडे एखाद्या विशिष्ट जातीच्या १०० टक्के किंवा जास्तीत जास्त एखाद्या जातीचे गुणधर्म असणाऱ्या शेळ्या पैदाशीसाठी वापरल्या जात नाहीत. यामागची महत्त्वाची कारणे म्हणजे...

उच्च प्रतीच्या वंशावळीसाठी पैदासकेंद्राची गरज जातिवंत शेळ्या तयार करून पैदाशीसाठी त्यांची विक्री केल्यास अशा नर-माद्यांना मटनाच्या शेळ्यांच्या बाजारभावापेक्षा जास्त किंमत मिळू शकते. त्यासाठी पैदास केंद्र किंवा पैदास संघटना स्थापन करणे फायद्याचे ठरते.

सध्या शेळीपालन व्यवसायाला उभारी मिळत आहे. जवळपास ७० ते ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त शेळीपालकाकडे एखाद्या विशिष्ट जातीच्या १०० टक्के किंवा जास्तीत जास्त एखाद्या जातीचे गुणधर्म असणाऱ्या शेळ्या पैदाशीसाठी वापरल्या जात नाहीत. यामागची महत्त्वाची कारणे म्हणजे...

 • कोणती जात कोणत्या बाबीसाठी वापरली जाते व त्या जातीचे विशिष्ट गुणधर्म कोणते याबद्दल माहितीचा अभाव.
 • जातिवंत जनावरांची अनुपलब्धता.
 • शेळीच्या विशिष्ट जाती (१०० टक्के जातिवंत) पाळणाऱ्या शेळीपालकांची कमी संख्या.
 • पैदाशीसाठी वापरल्या जाणाऱ्या कळपामध्ये १०० टक्के जातिवंत शुद्ध नर किंवा माद्या न वापरणे.
 • विविध आधुनिक पैदास तंत्राचा अभाव.
 • शेळ्यांची जात अाणि मिळणाऱ्या करडांच्या जातीबद्दल साशंकता. यासर्व बाबींवर मात करण्यासाठी शेळ्यांच्या विशिष्ट जातींची पैदास केंद्र किंवा पैदास संघटना स्थापन करणे आवश्‍यक आहे. उदा. उस्मानाबादी शेळी पैदास संघटना.

पैदास केंद्र किंवा पैदास संघटना स्थापनेचा उद्देश

 • एखाद्या विशिष्ट जातीच्या जनावरांची उत्पत्ती (जातिवंत) करून जतन करणे.
 • एखाद्या विशिष्ट जातीचे चांगले गुणधर्म वाढविणे की ज्याचा दुसऱ्या जातींमध्ये अभाव आहे. त्यामुळे त्या जातीचे महत्त्व वाढू शकते. उदा. (उस्मानाबादी जात ही तिच्या उत्कृष्ट मांसाच्या प्रतीसाठी, रोगप्रतिकारक शक्तिसाठी व दोन पिल्ले देण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे)
 • अशा जातींची वंशावळ जपून ती वाढविणे व तिचा प्रसार करणे.
 • एखाद्या जातीच्या उत्तम वंशावळीच्या व जातिवंत नरांची पैदास करणे व इतर शेळीपालकांना पैदाशीसाठी देवून त्याच्यामधील उत्तम गुणधर्माचा प्रसार करणे.
 • विशिष्ट जातीमध्ये काही नियम व अटींच्या आधारे स्पर्धा भरविणे व जातिवंत व उच्च शुद्धता असणाऱ्या जनावरांना पारितोषिके देणे जेणेकरून जातिवंत जनावरे पाळणाऱ्या शेळीपालकांना उत्तेजन मिळेल.
 • उच्च प्रतीच्या जातिवंत जनावरांचे वीर्य गोळा करून गोठवून जतन करणे व योग्य जनावरांमध्ये त्या जातीचा प्रसार करण्यासाठी वापर करणे.
 • महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शुद्ध, जातिवंत जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करणे व ही माहिती त्या जातीमध्ये किंवा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. जेणेकरून विक्री, व्यवहार व पैदाशीसंदर्भात एकमेकांना मोलाची मदत होऊ शकते.
 • विशिष्ट जातीच्या शुद्ध जातिवंत शेळ्यांच्या माद्यांना कृत्रिम पद्धतीने एकाच वेळी माजावर आणून गोठवून ठेवलेले उत्तम प्रतीचे १०० टक्के शुद्ध जातिवंत नराचे वीर्य वापरून चांगली पैदास करणे.

संपर्क : डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५
(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

इतर कृषिपूरक
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...
शेळ्यांची निवडशे ळ्या विकत घेताना पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार...
पशुआहारावरील खर्च कमी करण्याचे उपायउन्हाळ्यात गाई, म्हशी व इतर जनावरांची भूक कमी...
जनावरातील मुतखड्यावर उपचारजनावरात मुतखडा झाल्यावर तो शस्त्रक्रियेने बरा...
निकृष्ट चाऱ्यापासून दर्जेदार पशुखाद्यउन्हाळ्यामध्ये जनावरांना पुरेसा हिरवा चारा देणे...
तुती लागवडतुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
दुग्धोत्पादनात पाण्याचे महत्त्वपाण्याच्या कमतरतेमुळे जनावरांच्या शरीरातील...
ओळखा जनावरांतील परजिवींचा प्रादुर्भाव...सध्याचा उन्हाळा आणि त्यानंतर येणारा पावसाळा...
कोंबड्यांचा ताण करा कमीतापमानवाढीचा सर्वाधिक त्रास हा कोंबड्यांना होतो....