पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे जिवाणूंमध्ये आली प्रतिकारकता

पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे जिवाणूंमध्ये आली प्रतिकारकता
पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे जिवाणूंमध्ये आली प्रतिकारकता

उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून पशुपालनामध्ये अत्यंत कमी प्रमाणात पेनिसिलीन या प्रतिजैविकाचा वापर होऊ लागला. या वापरामुळे जिवाणूंमध्ये प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास चालना मिळाल्याचा अहवाल नुकताच ‘लॅन्सेट इन्फेक्टियस डिसिजेस’ या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झाला आहे. त्यातून सध्या मानवी उपचारांमध्ये वापरात असलेल्या अॅम्पिसिलिन प्रतिजैविकाविषयी जिवाणूंमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होत गेल्याचा दावा केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात पशुपालनात नियमित स्वरूपामध्ये प्रतिजैविकांचा वापर थांबविण्याची सूचना केली असतानाच हे संशोधन प्रकाशित झाले आहे.जिवाणूंमध्ये प्रतिकारकता विकसित होण्यासाठी प्रतिजैविकांचा अनिर्बंध वापर या कारणांसोबत अन्यही कारणे असल्याचे पॅरीस (फ्रान्स) येथील इन्स्टिट्यूट पाश्चर येथील संशोधनात पुढे आले आहे. संस्थेत सॅलमोनेल्ला जिवाणूंच्या नमुन्यांच्या मुलद्रव्यीय विश्लेषणातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत. यातूनच अॅम्पिसिलिन प्रतिजैविकाविरुद्ध प्रतिकारक जनुक (blaTEM-१) मानवामध्ये संक्रमित झाले असल्याचे संकेत मिळाले आहेत. याविषयी माहिती देताना डॉ. फ्रान्सिस झेव्हियर वेईल यांनी सांगितले, की संशोधनामध्ये शेती परीसरामध्ये माती, सांडपाणी आणि सेंद्रिय खतांमध्येही प्रतिजैविकांचे अंश मिळाले आहेत. त्याचे मोठे परिणाम जिवाणूची प्रतिकारक शक्ती वाढण्यामध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतिजैविकांसाठी प्रतिकारकता :

  • युरोपमध्ये प्रति वर्ष सुमारे २५ हजार लोकांना जिवाणूंच्या प्रतिजैविक प्रतिकारकतेचा फटका बसतो. सॅलमोनेल्लासारख्या माणसांमध्ये प्रादुर्भाव करणाऱ्या जिवाणूंमध्ये या आधीच प्रतिकारकता विकसित झाली आहे.
  • अॅम्पिसिलिन हे प्रतिजैविक इंग्लंडमध्ये १९६१ मध्ये बाजारात आणण्यात आले. त्यानंतर त्वरित म्हणजेच १९६२ ते ६४ या कालखंडात माणसांमध्ये सॅलमोनेल्ला एन्ट्रिका किंवा एस. टायफिम्युरियम या जिवाणूंमुळे उद्भवलेल्या रोगांच्या प्रादुर्भावामध्ये प्रतिजैविकांचा वापर झाला. मात्र अनेक वेळा जिवाणूंनी या प्रतिजैविकाला दाद न दिल्याने रोगांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे संशोधकांचे मत आहे.
  • १९११ आणि १९६९ या काळातील माणसे, जनावरे आणि पशुखाद्य यात आढळणाऱ्या युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका येथील एस. टायफिम्युरियम जिवाणूंच्या २८८ नमुन्यांच्या चाचण्या घेतल्या. प्रतिजैविकाविषयी संवेदनशीलता तपासली. त्याच प्रमाणे अॅम्पिसिलिनविषयी प्रतिकारकतेविषयीच्या जनुकीय यंत्रणेचा अभ्यास करण्यात आला.
  • मानवी नमुन्यामधील ११ आयसोलेटमध्ये (३.८ टक्के) ॲम्पिसिलिन प्रतिकारकता संशोधकांना आढळली. महत्त्वाचे म्हणजे blaTEM-१ या जनुकांच्या वेगाने प्रति तयार होऊन विविध जिवाणूंमध्ये सहजतेने प्रसारीत होऊ शकत असल्याचे दिसून आले. फ्रान्स आणि ट्युनिशिया येथील १९५९ आणि ६० मध्ये घेतलेल्या तीन नमुन्यातही हे दिसले.
  • स्वतंत्ररीत्या विकसन :

  • फ्रान्स आणि इंग्लंडसारख्या अत्यंत जवळ असलेल्या देशातही प्रतिकारकता विकसित केलेल्या जिवाणूंच्या प्रजातीमध्ये भिन्नता आढळली. त्या विषयी डॉ. वेईल यांच्या मतानूसार विविध जिवाणूंमध्ये प्रतिकारकता जनुकांचे विकसन हे स्वतंत्ररीत्या झाली.तसेच त्याचा प्रसारही विविध देशात वेगवेगळ्या वेगाने झाला.
  • पशुखाद्यातील नियमित प्रतिजैविकांच्या वापरामुळे प्रतिकारकता विकसित होत असल्याचा पहिला अहवाल इंग्लंडमध्ये १९६५ मध्ये मांडण्यात आला. त्यानंतर या पद्धतीवर १९६९ मध्ये निर्बंध आले.
  • अशाच प्रकारची प्रतिकारकता अमेरिकेत १९७० मध्ये एस. टायफिम्युरियम प्रजातींमध्येही आढळली. त्यामागे पोल्ट्री खाद्यामध्ये कमी प्रमाणात वापरण्यात आलेल्या पेनिसिलिन जी या प्रतिजैविकांचा परिणाम असल्याचा निष्कर्ष काढला आहे.   
  • संशोधनातील मर्यादा :

  • मानवी नमुने प्राधान्याने फ्रान्स व फ्रान्सच्या आफ्रिकन आणि आशियन देशातील वसाहतींमधील होते.
  • जरी पेनिसिलिन जी आणि ॲम्पिसिलिन प्रतिकारकता ही एकमेकांत स्थलांतरित किंवा प्रसारित होण्याजोगी असल्याबाबतचा स्पष्ट पुरावा आढळला नसला, तरी प्रतिजैविकांच्या अवैद्यकीय वापराच्या दुष्परिणामाचे संकेत या नव्या संशोधनातून मिळाले आहेत.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com