Agriculture story in marathi, Rose market in Nanded | Agrowon

नांदेड फुलबाजारामुळे परिसरात फुलली फुलशेती
माणिक रासवे
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

नांदेड (प्रतिनिधी)ः मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध अशा नांदेड येथील फुलांच्या बाजारपेठेमध्ये देशी गुलाबासह डच गुलाबाची आवक होत आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त गुलाब फुलांच्या मागणीत वाढ होते, तसेच दरात जवळपास दुपटीने वाढ होत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.

नांदेड (प्रतिनिधी)ः मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध अशा नांदेड येथील फुलांच्या बाजारपेठेमध्ये देशी गुलाबासह डच गुलाबाची आवक होत आहे. व्हॅलेंटाइन डेनिमित्त गुलाब फुलांच्या मागणीत वाढ होते, तसेच दरात जवळपास दुपटीने वाढ होत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.

पूर्वी नांदेड शहरातील कलामंदिर परिसरामध्ये फुलांचा बाजार भरत असे. १९९० च्या दरम्यान फुलांची चांगली बाजारपेठ विकसित झाली. त्यामुळे २०१५ मध्ये स्थानिक प्रशासनाने शहरातील हिंगोली गेट भागातील उड्डाण पुलाच्या खाली फुलबाजारासाठी जागा दिली. येथे १० अडते आणि ३० ते ४० किरकोळ व्यापारी आहेत. मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातून खरेदीदार फुलांच्या खरेदीसाठी येतात. त्याचप्रमाणे येथून हैदराबाद, मुंबई, इंदूर, यवतमाळ, तुळजापूर या भागामध्ये विविध प्रकारची फुले पाठवली जात असल्याचे जेष्ठ अडत व्यापारी करिमखान पठाण यांनी सांगितले.

नांदेड परिसरातील मुदखेड, नांदेड, अर्धापूर या तीन तालुक्यांमध्ये फुलशेतीचा चांगला विस्तार झाला आहे. उमरी, भोकरसह अन्य काही तालुक्यांतील सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडे फुलशेती रुजली आहे. जिल्ह्यात फुलशेतीखालील क्षेत्र सुमारे ५०० एकरपर्यंत आहे. कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत ६० ते ६५ शेडनेटगृह आणि १८ ते २० पाॅलिहाउस उभारले आहेत. त्यात गुलाब, गलांडा, काकडा, मोगरा, लिली, झेंडू, निशिगंध, बिजली, जरबेरा आदी फुलांची लागवड केली आहे. २००५ नंतर गुलाबाचे क्षेत्र वाढले आहे.
नांदेड येथील फुलबाजारामध्ये नांदेडसह शेजारच्या परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९०० ते १००० शेतकरी फुले विक्रीसाठी आणतात. लिलाव पद्धतीने बोली बोलून शेतकऱ्यांसमक्ष फुलांची खरेदी केली जाते. गुलाब फुलांची किंमत त्याच दिवशी दिली, तर काकडा, मोगरा आदी फूल उत्पादकांना आठवड्याला पट्टी काढली जाते.

गुलाबाची आवक आणि दर ः

  • शिर्डी गुलाबाची दररोज १५ ते २० क्विंटलपर्यंत आवक होते. त्यास २० ते ४० रुपये किलोपर्यंत दर मिळतात. लग्नसराईमध्ये वाढलेल्या मागणीनुसार दर वाढतात. सोमवारी (ता. ११) शिर्डी गुलाबाचे दर १०० ते १२० रुपये किलो होते. लग्नसराईमध्ये ३०० रुपये किलोपर्यत दर वाढले होते.
  • रंगीत गुलाबाच्या १० फुलांच्या बंचचे दर ४० ते ५० रुपयेपर्यंत असतात.
  • शेडनेट, पाॅलिहाउस उभारणी खर्चिक असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक शेतकरी डच गुलाबाची लागवड ओपनवर घेतात. बाजारात डच गुलाबाची दररोज १५० ते २०० बंच (प्रतिबंच २० फुले) आवक होते. त्यास ८० ते १०० रुपये दर मिळतो.
  • व्हलेंटाइन डेच्या दिवशी मागणी वाढल्याने डच गुलाबाच्या दरात दुपटीने वाढ होते. गतवर्षी (२०१८) व्हॅलेंटाइन डेला डच गुलाबाच्या बंचला १८० ते २०० रुपये दर मिळाला होता. या काळात शिर्डी गुलाबाच्या बुकेंनाही मागणी असते.
  • नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत गुलाब फुलांची आवक अधिक असली तर त्यानंतर मात्र सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांची फुले बाजारात येतात. उन्हाळ्यात लग्नसराईमुळे मागणी वाढलेली असते. तुलनेत आवक कमी असल्याने दर चांगलेच वधारतात.
  • जरबेराच्या दहा फुलांच्या बंचला ५० ते ८० रुपये दर मिळतात. ते व्हॅलेंटाइन डे काळात सव्वा ते दीड पटीने वाढत असल्याचे व्यापारी मोहंमद तकिय्योद्दिन यांनी सांगितले.

आमच्याकडे १० एकर शेतीपैकी तीन एकरवर फुलशेती आहे. गुलाब, शेवंती, झेंडू, गलांडा, ओपनमध्ये डच गुलाबाचे उत्पादन घेतो. सर्व मिळून दररोज १ क्विंटल फुले निघतात. शिर्डीत गुलाबास ५० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतात.
- गणेश कव्हळे, फूल उत्पादक, इळेगाव (ता. उमरी)

गावापासून फुलाची बाजारपेठ जवळ असल्याने पारंपरिक शेतीला फुलशेतीची जोड दिली आहे. शिर्डी गुलाबासह, बिजली, गलांडा अशी ५ ते १० किलो फुले विक्रीसाठी आणतो. जाहीर लिलाव पद्धतीने बोली फुलांची खरेदी होऊन, त्वरित रक्कम हाती मिळते.
- अमोल सावंत, फूल उत्पादक, मालेगाव (ता. अर्धापूर) 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...