agriculture story in marathi, rose processing, vadaji, solapur | Agrowon

खंडोबा शेतकरी कंपनीच्या गुलाबजलाचा ‘शाही’ दरवळ! 
सुदर्शन सुतार
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

 

बाजारपेठ 
पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरांत सध्या या शेतकरी कंपनीने बाजारपेठ मिळवली आहे. विशेषतः मुंबई व पुण्यात त्यासाठी चांगले ग्राहक आहेत. १० ते १५ लाखांहून अधिक विक्री आता वेग घेऊ लागली आहे. सोलापूर येथे कंपनीचा मॉल आहे. तेथेही विक्री होते. 

सणासुदीचे दिवस सोडले तर गुलाबाला वर्षभर चांगले दर मिळण्याची शाश्वती नसते. अनेक वेळा माल दरांअभावी बाजारातच सोडून द्यावा लागतो. हीच बाब हेरून गुलाबाचे गाव वडजी (जि. सोलापूर) येथील ‘खंडोबा ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ने ‘ शाही गुलाबजल’ उत्पादनाची निर्मिती केली. त्या माध्यमातून गुलाबाला शाश्वत दर मिळवला. शिवाय गुलाबजलाचा दरवळ सोलापूरसह पुणे, मुंबई आणि औरंगाबाद बाजारपेठेतही पसरवला आहे. 

सोलापूर-हैदराबाद रस्त्यावर सोलापूरपासून १० ते १२ किलोमीटरवर वडजी हे छोटसं गाव आहे. पडवळ, दुधी, दोडका यांच्यासह गुलाब फुलांच्या शेतीत गाव प्रसिद्ध आहे. पाण्याचा कायमस्वरूपी फारसा मोठा स्रोत नसला, तरी पावसाच्या पाण्यावरच येथील शेतकरी मोठ्या हिमतीने वेगवेगळे प्रयोग करतात. 

ध्येयवेड्या तरुणाचा पुढाकार 
‘एमएस्सी बायोटेक्नॉलॉजी’ झालेला परमेश्‍वर कुंभार हा ध्येयवेडा तरुण याच गावचा. त्यांनी पुण्यात नामांकित कंपनीत नोकरी केली. पण घरच्या शेतीमुळे त्यात मन रमेना. गावी परतल्यानंतर व्यावसायायिक शेती व प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे डोक्यात घोळत होते. स्वतःच्या गावासह परिसरातील गावांमध्ये गुलाब मोठ्या प्रमाणात उत्पादित होतो. वडजी व परिसरातील शेतकऱ्यांचा दरवर्षी जुलै-ऑगस्ट हा फूलहंगाम ठरलेला. फुले लावायची, दीड-दोन महिन्यांनी मार्केटमध्ये नेऊन विकायची. पण अनेक वेळा दर नसल्याने फुले तिथेच किंवा शेतात सोडून देण्याची वेळ यायची. हीच समस्या परमेश्वर यांनी हेरली. एकत्र येऊन काही तरी करण्याचे स्फुल्लिंग पेटले. त्यातून स्थापन झाली शेतकरी उत्पादक कंपनी. त्यास गावातील उमेश म्हेत्रे, बंडू चेंडके, बालाजी कदम, भारत चिवरे यांची साथ मिळाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, ‘एमएसीपी’चे मोहन लवटे, ‘नाबार्ड’चे सरव्यवस्थापक प्रदीपकुमार झिले, ‘यशस्विनी ॲग्रो’च्या सौ. अनिता माळगे यांनी मोठी मदत केली. या सर्वांच्या माध्यमातून नव्या बदलाला सुरवात झाली. परमेश्वर कंपनीचे अध्यक्ष आहेत. 

गुलाबजल निर्मितीचे टप्पे 
कच्चा माल उपलब्धता 

 • पडत्या दरांमध्ये प्रक्रिया करून गुलाबजल सारखे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन तयार करण्यासाठी परमेश्वर यांनी पुढाकार घेतला. अर्थात, भांडवल, मार्गदर्शन यांसारख्या बाबी महत्त्वाच्या होत्या. वडजीसह वरळेगाव, कासेगाव, बोरामणी, बक्षीहिप्परगे, दोड्डी, तांदूळवाडी, पिंजारवाडी आदी आठ गावांतील १७ शेतकरी गटाच्या माध्यमातून ३८२ शेतकरी कंपनीचे सदस्य झाले. त्या माध्यमातून वाटचाल सुकर झाली. 
 • वडजीतील सुमारे १०० एकर व परिसरातील गावांसहित एकूण ५०० एकरांवर गुलाब आहे. सध्या ४० ते ५० शेतकरी गुलाब पुरवतात. 
 • शेतकऱ्यांना जागेवरच प्रतिकिलो २० रुपये हमीभाव व खात्रीशीर बाजारपेठ मिळाली. 
 • सणासुदीच्या काळात चढ्या दरांच्या काळात अन्यत्र गुलाब विकण्याचे स्वातंत्रही होते. 

निर्मिती प्रकल्प 

 • कंपनीचे १२०० चौरस फुटाचे पॅकहाऊस आहे. त्याच जागेत गुलाबजल निर्मिती सुरू झाली. 
 • त्यासाठी पाच लाख रुपये किमतीचे यंत्र आणले. जागतिक बॅंक तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळाला. 
 • प्रति बॅच तीन तासांची असते. किमान एक क्विंटलपर्यंत गुलाबावर प्रक्रिया होऊ शकते. 
 • त्या माध्यमातून २० लिटर गुलाबजल मिळू शकते. किमान तीन बॅचेस दिवसात पूर्ण होऊ शकतात. 

पॅकिंग व ब्रॅंडिंग 

 • गुलाबजल निर्मितीत कोणतेही रसायन वापरले जात नाही. 
 • पन्नास मिलि., १००, २५० मिलि., एक, पाच आणि वीस लिटर याप्रमाणे बॉटल व कॅनमध्ये पॅकिंग. 
 • पॅकिंग आकर्षक दिसावे म्हणून खास ‘बॉटल्स’ तयार केल्या आहेत. 
 • शाही गुलाबजल असा ब्रॅंड. ‘फूड सेफ्टी’ विषयातील प्रमाणपत्र व आवश्यक परवाने घेतले आहेत. 
 • प्रतिलिटर ५०० रुपये, वीस लिटर १६५० रुपये असे दर आहेत. 
 • पॅकिंग, लेबलिंगची सारी व्यवस्था मनुष्यबळाद्वारेच केली जाते. 

बाजारपेठ 
गुलाबजल हे सौंदर्यप्रसाधन, उटणे, ब्यूटी पार्लर, जेंट्स पार्लरसह विविध कार्यक्रमात सुगंधी स्प्रे म्हणून वापरण्यात येते. त्यात औषधी गुणधर्मही आहेत. गुलाबपाण्याने स्नान देखील केले जाते. 
त्यामुळे त्याला चांगले मार्केट आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरांत सध्या या शेतकरी कंपनीने बाजारपेठ मिळवली आहे. विशेषतः मुंबई व पुण्यात त्यासाठी चांगले ग्राहक आहेत. १० ते १५ लाखांहून अधिक विक्री आता वेग घेऊ लागली आहे. सोलापूर येथे कंपनीचा मॉल आहे. तेथेही विक्री होते. 

वडजी गुलाबशेती- ठळक बाबी 

 • देशी गुलाब व खुल्या शेतीत प्रामुख्याने जुलै-ऑगस्टमध्ये लागवड 
 • ठिबकद्वारे सिंचन. 
 • प्रतिदिन १० किलोपासून १०० किलोपर्यंत गुलाब मिळू शकतो. 
 • गणेशोत्सव- दसऱ्याला फुले तयार होतात. अगदी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत बाजारपेठ तेजीत 
 • संपर्क- परमेश्‍वर कुंभार- ८७८८३७३५०३ 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...