योग्य प्रकारे ट्रॅक्‍टर चालवा, दुर्घटना टाळा...

ट्रॅक्‍टर वाहतूक योग्य पद्धतीने करावी.
ट्रॅक्‍टर वाहतूक योग्य पद्धतीने करावी.

शेतमाल वाहतुकीचा मुख्य स्त्रोत ट्रॅक्‍टर आहे. ग्रामीण भागात आजही रस्ते असमान असल्यामुळे ट्रॅक्‍टर ट्रेलर उलटून अपघात झालेले दिसतात. चुकीच्या पद्धतीने ट्रॅक्‍टर ट्रेलरचा वापर आणि ट्रॅक्‍टर चालविण्याचे कौशल्य नसलेल्या चालकामुळे अपघात होतात.   वेळ आणि मजुरांच्या बचतीसाठी यंत्रे, तसेच ट्रॅक्‍टर आणि ट्रॅक्‍टरचलीत अवजारांचा वापर वाढला आहे. परंतु, वेगवेगळी ट्रॅक्‍टर क्षमता, यंत्रसामग्रीची रचना आणि वापरण्याच्या क्षुल्लक चुकीमुळे काही वेळा अपघात घडतो.

  • शेतीमधील एकूण दुर्घटनेपैकी ९०.५ टक्के दुर्घटना या चुकीच्या पद्धतीने यंत्रांचा वापर केल्यामुळे होतात.
  • कृषिक्षेत्रामध्ये सर्वाधिक दुर्घटना या ट्रॅक्‍टर आणि ट्रॅक्‍टरचलीत यंत्रामुळे (३१ टक्के) होतात. त्यानंतर पशू आधारित उपकरणामुळे (२२ टक्के), मळणी यंत्रामुळे (१४ टक्के), विद्युत मोटर/पंपसेट (१२ टक्के), चारा कुट्टी यंत्रामुळे (९ टक्के), पॉवर टिलर्स (६ टक्के) आणि चुकीच्या स्पेअर्सपार्टमुळे (४ टक्के) होतात.
  • शेतमाल वाहतुकीचा मुख्य स्त्रोत ट्रॅक्‍टर आहे. ग्रामीण भागात आजही रस्ते असमान असल्यामुळे ट्रॅक्‍टर ट्रेलर उलटून अपघात झालेले दिसतात. चुकीच्या पद्धतीने ट्रॅक्‍टर ट्रेलरचा वापर आणि ट्रॅक्‍टर चालविण्याचे कौशल्य नसलेल्या चालकामुळे अपघात होतात.
  • अपघाताची कारणे ः

  • कोणतीही संरक्षक रचना उपलब्ध नसल्याने जेव्हा ट्रॅक्‍टर पलटतो तेव्हा चालक ट्रॅक्‍टरखाली येऊन जखमी होण्याची शक्यता जास्त असते.
  • ट्रॅक्‍टर ट्रेलरच्या मागील बाजूस प्रकाश आणि वळण दर्शविणारा निर्देशक (टर्निंग इंडिकेटर) नसतात.
  • ट्रॅक्‍टरच्या फिरणाऱ्या भागात काही वेळा सैल कपडे अडकून अपघात होतात
  • काही वेळा ट्रॅक्‍टरला अवजारे जोडताना कामगार जखमी होतात. याचे मुख्य कारण म्हणजे अयोग्य जोडणीची पद्धत, तसेच अप्रशिक्षित मजूर.
  • ट्रॅक्‍टरचा क्‍लच ब्रेक, ब्रेक याची पुरेशी देखभाल नसल्यामुळे दुर्घटना घडते.
  • योग्य पद्धतीने ट्रॅक्‍टर चालविता न येणे हे महत्त्वाचे कारण आहे.
  • काही जण इंधनाच्या पातळी तपासणीसाठी टाकीचे झाकण उघडून त्यामध्ये काठी घालून पातळी तपासतात. रात्रीच्या वेळी कामगार इंधन टाकीजवळ आगपेटी पेटवून डिझेलची पातळी तपासतात. हे अतिशय धोकादायक आहे.
  • सामान्यतः ट्रेलरच्या मागे दिवे, रिफ्लेक्टर लावलेले नसतात. ट्रेलरचा मागील भागदेखील कालांतराने खराब होतो. यामुळे रिफ्लेक्टर न दिसल्याने रात्रीच्या वेळी मागून वेगाने येणाऱ्या वाहनाचा ट्रेलरच्या मागील भागास धडक बसते.
  • ट्रॅक्‍टर थांबविण्यासाठी आवश्‍यक ब्रेकिंग फोर्स ६०० न्यूटन किंवा त्याहून अधिक शक्ती लावावी लागते. हे ५० किलो वजन असलेल्या चालकासाठी काही वेळा अशक्य ठरते.
  • ट्रॅक्‍टर चालविताना घ्यावयाची काळजी ः

  • ट्रॅक्‍टरमध्ये इंधन भरताना सावधगिरी बाळगावी. इंजिन गरम असलेल्या ट्रॅक्‍टरमध्ये इंधन भरू नये.
  • ट्रॅक्‍टरमध्ये शिफारशीत रासायनिक अग्निशामक यंत्र आणि प्रथमोपचार पेटी ठेवावी.
  • ट्रॅक्‍टर तसेच जोडलेल्या अवजारांची तांत्रिक तपासणी करावी.
  • ट्रॅक्‍टर चालू आणि थांबविताना तांत्रिक गोष्टींचा अवलंब करावा.
  • मानवी त्रुटी कमी करण्यासाठी ट्रॅक्‍टर चालविताना सावधानता बाळगावी.
  • ट्रॅक्‍टर चालविताना रस्त्यावरील रहदारी नियमांचे पालन करावे.
  • ट्रॅक्‍टरला ब्रेक लावण्यापूर्वी गती कमी करावी.
  • नेहमी ड्रॉबार आणि तीन बिंदू जोडणी योग्यरीत्या करावी.
  • चालक बसण्यायोग्य जागा आणि पॉवर स्टिअरिंग योग्य असणे आवश्‍यक आहे.
  • ट्रॅक्‍टर आणि ट्रेलर्ससाठी परावर्तक असावेत.
  • उतारावरील सुरक्षिततेसाठी ट्रॅक्‍टरमध्ये पार्किंग ब्रेक असावा. ट्रेलरवरती टर्निंग इंडिकेटर असावा.
  • संपर्क ः मनीषा जगदाळे ९८५०१३५४६९ (केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ, मध्य प्रदेश) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com