Agriculture story in Marathi, sellection of goat for breeding | Agrowon

पैदाशीसाठी निवडा सशक्त, जातिवंत शेळ्या
डॉ. तेजस शेंडे
बुधवार, 20 डिसेंबर 2017
गोठ्यातील खरेदी केलेल्या शेळ्यांची प्रत चांगली नसेल, तर त्याचा शेळीपालनाच्या नफा- तोट्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जातिवंत, उत्तम आरोग्य, उत्तम वंशावळ व उत्तम शारीरिक ठेवण असणाऱ्या शेळ्यांची निवड महत्त्वाची ठरते.
 
शेळीपालन व्यवसाय जर यशस्वीरीत्या करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातिवंत शेळ्यांची निवड. खरेदी करताना
पुढील बाबी तपासूनच शेळ्यांची निवड करावी.
गोठ्यातील खरेदी केलेल्या शेळ्यांची प्रत चांगली नसेल, तर त्याचा शेळीपालनाच्या नफा- तोट्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जातिवंत, उत्तम आरोग्य, उत्तम वंशावळ व उत्तम शारीरिक ठेवण असणाऱ्या शेळ्यांची निवड महत्त्वाची ठरते.
 
शेळीपालन व्यवसाय जर यशस्वीरीत्या करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जातिवंत शेळ्यांची निवड. खरेदी करताना
पुढील बाबी तपासूनच शेळ्यांची निवड करावी.

पैदाशीच्या शेळीची निवड

 • सुधारित शेळीच्या जातींची निवड करावी. उदा. संगमनेरी, उस्मानाबादी किंवा बोअर संकरित जात
 • दोन करडे देणारी शेळी पैदाशीसाठी निवडावी.
 • करडाचे जन्मतः वजन जास्त असावे. आई- वडिलांची वजनवाढ चांगली असेल अशा करडांची निवड करावी.
 • पावसाळ्यात शेळी खरेदी करू नये, हिवाळ्यात शेळ्यांची खरेदी करणे उत्तम असते.
 • शक्‍यतो दुसऱ्या वेताची व गाभण शेळी स्थानिक व माहितीतील लोकांकडूनच निवडावी.
 • शेळी विकत आणल्यानंतर थोड्या विश्रांतीनंतर प्रत्येक शेळी ओळखण्यासाठी व वेगवेगळ्या नोंदी ठेवण्यासाठी शेळ्यांना ओळख नोंदणी क्रमांक (Ear Tagging) देणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्या शेळीचे वय तिचे दात पाहून कळू शकते.
 • लांब अंतरावरून शेळी आणणार असल्यास गाभण शेळी घेऊ नये.
 • डोळ्यातून, नाकातून पाणी येणारी, मागचा भाग खराब असणारी, नाकपुडी कोरडी असलेली शेळी निवडू नये. ही रोगट शेळीची लक्षणे आहेत.
 • शेळीमध्ये कोणताही शरीरदोष नसावा.
 • निवडली जाणारी शेळी भरपूर दूध देणारी, शांत व तिला उपजत मातृप्रेम असावे.
 • शेळी व बोकड शांत, निरोगी, पैदासक्षम, सशक्त, कातडी नरम, मऊ व चकाकणारी असलेले असावे.
 • पाठीचा कणा सरळ, लांब असणे महत्त्वाचे आहे. सुंदर शरीरयष्टी, मागच्या पायाच्या गुडघ्याचा कोन १६० अंश, कणखर खूर व सांधा, गुडघे सरळ असावेत.
 • मागून जास्तीत जास्त रुंद, पोट फुगलेले, पाठीचा कणा सरळ व जास्त रुंद, मागच्या पायाच्या मांड्या मांसल व काटक असाव्यात.
 • शरीराचा मध्य काढल्यास मागचा व पुढचा असे दोन समान भाग पाडावेत.
 • मान लांब व खांद्यावर व्यवस्थित जोडलेली असावी.
 • उंच खांदे व बाहेरून न दिसणाऱ्या; पण हाताला लागणाऱ्या बरगड्या असाव्यात.
 • नरामध्ये छाती रुंद व मादीमध्ये जास्त त्रिकोणी असावी.
 • मागच्या पायांची रचना सरळ असावी व पायाचे खूर पायाच्या सरळ रेषेत असावेत.
 • कास जास्त लोंबकळणारी नसावी व भरीव असावी.
 • कास जास्तीत जास्त वरती जोडलेली असावी व कासेच्या मधली लाइन जास्त खोल नसावी.
 • कासेचे सड आतल्या किंवा बाहेरील बाजूला वळलेले नसावेत.
 • कासेला दोनपेक्षा जास्त सड नसावेत व दोन्ही सडांतून दूध येत नसावे.
 • कासेला जोडणारी शीर मोठी असावी व कास दोन्ही पायांमध्ये जास्त मागे किंवा पुढे नसावी.
 • कानाचे छिद्र मोकळे आहे का, गळ्याला सूज किंवा गाठ आहे का, डोळ्यातून पाणी येते का किंवा डोळ्याला सूज आहे का, हे पाहून घ्यावे.
 • पाठीमागचा भाग भरलेला, नाकातून स्राव, तोंडाला व पायांच्या खुरांमध्ये जखमा असतील तर शेळी निरोगी नाही असे समजावे. शेळीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी.
 • शेळी पैदाशीसाठी चांगली असावी व २ वर्षांतून ३ वेते देणारी असावी.
 • जास्त किंमत द्यावी लागली तरी शेळीपालकांकडूनच जातिवंत शेळ्या व बोकड यांची खरेदी करावी.
 • एक करडू देणारी व आजारी, विनाउपयोगी शेळी कळपातून लवकर बाहेर काढावी.

संपर्क ः डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५
(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

 

इतर कृषिपूरक
समतोल आहारातून वाढेल दुग्धोत्पादन म्हैस पालन फायदेशीर होण्याकरिता...
शेतावरच करा गांडूळ खताची निर्मितीगांडूळ खत जमीन सुधारण्याच्या व पिकाच्या वाढीच्या...
तंत्र सायप्रिनस माशांच्या बीजोत्पादनाचेप्रजनन योग्य नर आणि मादीची निवड ...
खनिज पुरवठ्यामुळे वाढते प्रजननक्षमतासूक्ष्म खनिजांच्या कमतरतेमुळे जनावरांमध्ये विविध...
अोळख कोकण कन्याळ शेळीची... सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
म्हशींच्या चांगल्या अारोग्यासाठी...हवामान, उपलब्ध असणारे मनुष्यबळ, चारा व पाण्याची...
अाहारातून जनावरांना करा खनिजांचा पुरवठा सूक्ष्म खनिजे शरीराला अतिशय कमी...
वाढवा दुधातील फॅटचे प्रमाणशासनाच्या नियमावलीनुसार गाईच्या आणि म्हशीच्या...
पशुसल्लासाधारणतः गायीचा गर्भधारणेचा कालावधी हा २८२...
अळिंबी प्रथिनांतून पदार्थाच्या पोषकतेत...आहारातील पोषकता वाढवण्यासाठी वनस्पतिजन्य (विशेषतः...
अत्याधुनिक पशुपालनात इस्राईलचा ठसाइस्राईलमधील पशुपालनाची त्रिसूत्री म्हणजे गाईंचा...
अोळखा थंडीमुळे येणारा जनावरांतील ताणसध्या तापमानात घट होत अाहे व थंडीचे प्रमाण वाढत...
अंडी, मांस उत्पादनासाठी श्रीनिधी...कुक्कुट संशोधन संचालनालय, हैदराबाद या संस्थेने...
निवड जातिवंत दुधाळ म्हशींची...बऱ्याच शेतकऱ्यांचा म्हैसपालन हा मुख्य व्यवसाय...
जनावरांतील गर्भधारणेसाठी योग्य...वांझ जनावरांची जोपासना हे आर्थिकदृष्ट्या...
उत्पन्न दुप्पट करण्याची क्षमता फक्त ‘...आजपर्यंतच्या जीआय मानांकन या मालिकेत आपण भारत...
ओळखा लाळ्या खुरकुताचा प्रादुर्भावसद्यस्थितीत जनवारांना लाळ्या व खुरकुत हा आजार...
बीटचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ   भरपूर पोषण तत्त्व असलेल्या...
शेळीपालन व्यवसायात कष्ट, जिद्दीबरोबर...शेळीपालन व्यवसाय अवास्तव मिळकतीच्या अपेक्षा ठेवून...
जनावरांचे पोषण, दुग्धवाढीसाठी हिरवा चाराचांगली वैरण ही उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली...