Agriculture story in marathi, shelter management for livestock | Agrowon

जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा
धरमिंदर भल्ला, डाॅ. एस. पी. गायकवाड
गुरुवार, 3 जानेवारी 2019

कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे असणाऱ्या साधनसामग्रीचा विचार करावा. गोठ्यामध्ये योग्य निवारा, कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अणि चारा खाण्यासाठी गव्हाण असावी. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनात वाढ मिळते.
 

कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे असणाऱ्या साधनसामग्रीचा विचार करावा. गोठ्यामध्ये योग्य निवारा, कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता अणि चारा खाण्यासाठी गव्हाण असावी. त्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनात वाढ मिळते.
 
कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा तयार करताना कमी खर्चात अधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये त्या किती वेळ टिकतील याचा थोडा कमी विचार केलेला असतो, कारण कमी भांडवलात बऱ्याच गोष्टींचे नियोजन करावयाचे असते. त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये आपण खर्च करू शकत नाही अशा गोष्टीसाठी तडजोड करता येत नाही. गोठ्याचे नियोजन करत असताना गाईसाठी खर्चात काटकसर करता येणार नाही. कारण चांगल्या गुणवत्तेच्या गाईसाठी जास्त किंमत द्यावीच लागेल. काही पशूपालक गोठ्याच्या बांधकामासाठी जास्तीत जास्त खर्च करतात, त्यामुळे व्यवसायातील महत्त्वाच्या घटकांसाठी पैशाची अडचण निर्माण होते. या महत्त्वाच्या घटकांमध्ये तडजोड केल्यामुळे चांगले दूध उत्पादन मिळत नाही, त्यामुळे व्यवसाय आतबट्ट्याचा होतो.

दहा गाईंसाठी मुक्त संचार गोठा

  • निवाऱ्यासाठी झाडाची मदत घेणार असल्याने निवाऱ्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.
  • दहा जनावरांसाठी ५० फूट लांब व १० फूट रुंद असे शेड करण्यासाठी सर्वसाधारणपणे या भागाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करून त्यांची उंची ठरवावी लागेल.
  • स्वच्छ सूर्यप्रकाश गोठ्यात सर्वदूर पसरण्यासाठी गोठ्याची दिशा ही जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अशी ठेवावी.
  • आपल्या भागातील वाऱ्याचा व तापमानाचा विचार करून गोठ्याची उंची ठरवावी. जास्त तापमान असणाऱ्या भागात हवेचा निचरा चांगल्या प्रकारे होऊन हवा खेळती राहून तापमान कमीत कमी राहावे यासाठी अशा शेडची उंची सर्वसाधारण शेडच्या उंचीपेक्षा काही प्रमाणात जास्त ठेवावी.
  • याउलट डोंगराळ भाग व ज्या ठिकाणी वाऱ्याचे प्रमाण जास्त असते अशा ठिकाणी गोठ्याच्या शेडची उंची कमी ठेवली तरी चालते.
  • आपल्या भागाचे पर्जन्यमान, तापमान व वारा यांचा सखोल अभ्यास करून गोठ्याचा आराखडा तयार करावा.
  • सर्वसाधारण पर्जन्यमान व सर्वसाधारणपेक्षा जास्त तापमान असलेल्या भागात कमी खर्चात १० गाईंचा गोठा कसा करावयाचा याचा विचार करू.
  • सर्वसाधारणपणे पाठीमागील म्हणजे शेपटाकडील उंची ६ फूट व तोंडाकडील उंच भागाची उंची ८ फूट घ्यावी. यासाठी ८ फुटावर एक लाकडी डांब उभा करावा लागेल. याप्रमाणे मागील बाजूचे ६ डांब हे ७.५ ते ८ फुटाच्या लांबीचे लागतील तर पुढील डांब ९.५ ते १० फूट लांबीचे लागतील असे १२ डांब लागतील. त्यानंतर उभ्यासह डांब टाकून त्यावर आडवे टाकण्यासाठी तीन ओळीसाठी ५० फूट लांब अशी १५० फूट लांबीची लाकडे लागतील.
  • सहा उभे सहा डांब ही लाकडे मुख्य डांबापेक्षा जरा कमी क्षमतेची असली तरी चालतील. अशा आराखड्यावर गवताचे आच्छादन करू शकतो किंवा पत्राही वापरू शकतो. अशा प्रकारचे शेड हे नैसर्गिक म्हणजे इको-फ्रेंडली असतात. या शेडमध्ये सहा महिन्याने किंवा वर्षाने थोड्याफार देखभाली लोखंडी आराखड्यापेक्षा जात वेळ द्यावा लागतो. असे शेड जास्त तापमान असणाऱ्या भागात जर असले तर जनावरांना जास्त मानवते. यामध्ये सूर्याची उष्णता ही खाली गोठ्यात कमी प्रमाणात येते.
  • गवत हे उष्णता रोधक म्हणून काम करते. परंतु वारंवार जास्त देखभाल करावी लागत असल्याने एकदाच चांगले करू या भावनेने ते पत्र्याचा पक्का गोठा तयार करतात, परंतु नंतर जनावरांच्या आजाराची देखभाल जास्त करावी लागते. सर्वसाधारणपणे २ ते ४ वर्षांनी या गवताचे आच्छादन बदलून पुन्हा नवे टाकावे लागते. हे शेड जरी फायदेशीर असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना ही छप्पर बदलण्याची कटकट नको असते.

दहा जनावरांच्या लाकडी शेडचा अंदाजे खर्च

तपशील नग दर रक्कम (रु.)
८ फुटी डांब २०० १२००
१० फुटी डांब २४० १४४०
१२ फुटी उभे डांब ३०० १८००
५० फूट आडवे डांब २०० ६००
लहान लाकूड गरजेप्रमाणे - - ५००
गवत गरजेप्रमाणे - - १०००
मजुरी - - २०००
एकूण - - ८५४०

संपर्क ः डॉ. एस. पी. गायकवाड, ०२१६६ - २२१३०२
(लेखक गोविंद मिल्क ॲण्ड मिल्क प्राॅडक्टस् प्रा. लि. फलटण, जि. सातारा येथे  कार्यरत आहेत.)

 

इतर कृषिपूरक
निवड दुधाळ गाई, म्हशींची...दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड करताना...
कोवळ्या ज्वारीच्या विषबाधेपासून जनावरे...कोवळ्या ज्वारीची पाने अधिक प्रमाणात खाल्ल्याने...
कोंबड्यांच्या आरोग्याकडे द्या लक्षपावसाळ्यात मुख्यतः शेड, खाद्य,पाणी आणि लिटरचे...
पशुआहारात वापरा शतावरीजनावरांच्या स्वास्थासाठी वनौषधींचा उपयोग फायदेशीर...
जनावरांना द्या पुरेसा आहार, पाणीजनावरांना आपण गरजेनुसार पाणी देण्याऐवजी आपल्या...
दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळादुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या...
सक्षम करा दुग्धव्यवसाय डेअरी हा व्यवसाय म्हणून पाहावा. त्याचे अर्थकारणही...
वाढत्या तापमानात गाई, म्हशींचे आरोग्य...सध्या काही भागांत प्रमाणापेक्षा उष्ण तापमान व...
खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर...खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता...
भारतातील आधुनिक मधमाश्‍या पालनाचा इतिहासजागतिक मधमाश्‍या दिन विशेष भारतीय उपखंड हे...
तुती लागवडीत आच्छादन करा, संरक्षित पाणी...तुती लागवड तसेच रोपवाटिकेत काळे पॉलिथीन आच्छादन...
शेततळ्यातील मत्स्यशेती शेततळ्यात पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या...
बैलामधील खांदेसूजीवर उपायउन्हाळ्यात नांगरणी, कुळवणी, तसेच पावसाळ्याच्या...
कोकण कन्याळ शेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांतील...
शेळ्यांसाठी चारासाधारणपणे शेळ्यांना प्रतिदिन अडीच किलो हिरवा चारा...
लेप्टोस्पिरोसिसपासून जनावरांची काळजी...निरोगी जनावरांचा बाधित जनावरांशी संबंध, गोठ्यातील...
योग्य वेळी लसीकरण करा, आजार टाळाजनावरांतील आजारांच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक...
नर रेडकांच्या संगोपनातून वाढवा नफा नर रेडकांचा व्यवस्थित सांभाळ करून, त्यांना योग्य...
पशू उपचारासाठी औषधी वनस्पती ठरताहेत...भारतात पुरातन काळापासून मानवी तसेच पशू उपचारासाठी...
जनावरांचे लसीकरण महत्त्वाचेपशुधन, पाळीव प्राणी व वन्यजीवांपासून अनेक रोग...