agriculture story in marathi, side effects of plastic on livestock health | Agrowon

प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे घातक परिणाम
डॉ. कल्याणी सरप, डॉ. एस. यू. नेमाडे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते, दुग्धोत्पादनामध्ये घट येते, जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते. असे दुष्परिणाम टाळण्यासाठी जनावरांना सकस, संतुलित आहार द्यावा. जनावरांच्या सोभोवतलचा परिसर, गोठा प्लॅस्टिक मुक्त ठेवावा. मोकाट किंवा चरण्यासाठी सोडलेली जनावरे बाहेर टाकलेले अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीसोबतच गिळतात, त्यामुळे जनावरे वेगवेगळ्या दुष्परिणामाला बळी पडतात. प्लॅस्टिकमुळे जनावराच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. दुग्धोत्पादन कमी होते. व्यवस्थापनामध्ये अडचणी येतात.

प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते, दुग्धोत्पादनामध्ये घट येते, जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते. असे दुष्परिणाम टाळण्यासाठी जनावरांना सकस, संतुलित आहार द्यावा. जनावरांच्या सोभोवतलचा परिसर, गोठा प्लॅस्टिक मुक्त ठेवावा. मोकाट किंवा चरण्यासाठी सोडलेली जनावरे बाहेर टाकलेले अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीसोबतच गिळतात, त्यामुळे जनावरे वेगवेगळ्या दुष्परिणामाला बळी पडतात. प्लॅस्टिकमुळे जनावराच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. दुग्धोत्पादन कमी होते. व्यवस्थापनामध्ये अडचणी येतात.

जनावरे प्लॅस्टिक का खातात ?

 • जनावरांमध्ये प्लॅस्टिक खाण्याचे काही महत्त्वाची कारणे आहेत. हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असणे. सकस व पौष्टिक चारा न मिळाल्याने जनवरामधील कुपोषण व खनिजांची कमतरता आढळते.
 • प्रतिकूल हवामान, जनावरे बांधण्याकरिता अपुरी व्यवस्था, जनावरे मोकट सोडणे अशा अनेक कारणामुळे जनावरे प्लॅस्टिक खातात.
 • सामान्यतः गायी व म्हशींमध्ये प्लॅस्टिक खाण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु शेळीमेंढी इतर छोटे रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये याचे प्रमाण कमी आहे तसेच रवंथ न करणाऱ्या जनावरामध्ये याचे प्रमाण आढळतच नाही.

परिणाम

 • प्लॅस्टिकच्या विशिष्ट गुणधर्मामुळे ते अन्ननलीकेद्वारे सहज गिळले जाते. प्लॅस्टिक हे न पचणारे न विघटन होणारे असल्यामुळे ते जनावरांनी खाल्ल्यावर सरळ कोठी पोटात जाते व तिथेच साठून राहते.
 • प्लॅस्टिक अल्प प्रमाणात कोठी पोटात असल्यास त्याचे विशेष परिणाम दिसून येत नाहीत, परंतु असे अधिक प्रमाणात प्लॅस्टिक जमा झाल्यामुळे काही दिवसांनी याचे जनावराच्या आरोग्यावर घातक परिणाम दिसून येतात, जसे जणावारंचे पोट गच्च होवून अपचन होणे. जाळी पोटातून खरे पोटात जाण्याचा अन्नाचा मार्ग बंद होणे. जठराची हालचाल मंदावते.
 • खालेल्या प्लॅस्टिकच्या पिश्व्यामुळे पोटामध्ये वेगवेगळे कप्पे तयार होऊन त्यामध्ये अन्न साठले जाते व त्या साठलेल्या अन्नावर पचनक्रिया होत नाही.
 • ओटीपोटाच्या हालचालीमुळे वरीलप्रमाणे साठलेल्या अन्नाचा मोठा गोळा तयार होतो व तो जाळी पोटातून खऱ्या पोटात जाण्याच्या मार्गावर अडथळा निर्माण करून बाधित जनावराला मृत्यू हेऊ शकतो.
 • मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक पोटात जमा झाल्यामुळे पोटाची आकुंचन क्रिया मंदावते व त्यामुळे पचनक्रियासुद्धा मंदावते व पोटात वायू जमा होऊन अपचन होते.
 • जठराची गती मंदावल्यामुळे रवंथ क्रिया पूर्णपणे बंद होते. कोठीपोटाची बरीशची जागा प्लॅस्टिकने व्यापल्यामुळे कोठी पोटाला आंबविण्याच्या क्रियेकरिता जागा अपुरी पडते व आंबवण्याच्या क्रियेवर विपरीत परिणाम होतो.
 • कोठीपोटाच्या सामूमध्ये बदल होतो. परिणामी पचन क्रियेला मदत करणारे जिवाणू पोटाच्या आतील दाब वाढल्यामुळे पोट दुखायला लागते. याचा जनावरांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्याची भूक मंदावते.

जनावराने प्लॅस्टिक खाल्ल्याची लक्षणे

 • जनावर चारा खात नाही व पाणी पिणे कमी होते.
 • दुग्धोत्पादनामध्ये घट येते.
 • जठराची हालचाल तीन मिनिटाला एकापेक्षा कमी होणे.
 • शेणाचे प्रमाण कमी होणे.
 • वारंवार पोटफुगी होणे.
 • रक्ताची तपासणी केली असता रक्तावर कुठलाच परिणाम दिसून येत नाही.
 • शारीरिक तापमान, हृदयाची गती व श्‍वासाच्या गतीवर काहीच फरक पडत नाही.

उपचार
शस्त्रक्रिया करून खाल्लेले प्लॅस्टिक जनावराच्या कोठीपोटातून बाहेर काढणे हा यावर एकमेव उपचार आहे.

प्रतिबंधात्मक उपाय
जनावरांच्या सोभोवतलचा परिसर, गोठा प्लॅस्टिकमुक्त ठेवावा. प्लॅस्टिकचा वापर नियंत्रित करावा व नंतर त्याची व्हिलेवाट योग्यरीत्या होईल याची काळजी घ्यावी.
 
संपर्क ः डॉ. कल्याणी सरप, ९०९६८७०५५०
(विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ) 

इतर कृषिपूरक
पशूसल्ला    थंड वातावरणामुळे जनावरांच्या...
उसाच्या वाढ्याची पौष्टिकता वाढवाजनावरांच्या आहारात सतत वाढ्याचा समावेश केल्यामुळे...
पशू आजारांवर प्राथमिक उपचारासाठी औषधी...जनावरांच्या आजारामुळे मिळणाऱ्या कमी उत्पादनामुळे...
मुक्त संचार गोठ्यामध्ये गव्हाण,...मुक्त संचार गोठ्यात कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता...
शस्त्रक्रियेमुळे बरी होते जनावरांतील...आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही शेतीची बरीचशी कामे...
गोठ्याचे कुंपण, बांधकामावर नको जास्त...गोठा बांधकामाचे नियोजन करताना लोखंडी वस्तू...
जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी कमी...कमी खर्चाचा मुक्त संचार गोठा करताना आपल्याकडे...
रेशीम कीटक संगोपनगृहात राखा योग्य...थंडीमध्ये वाढ झाल्यामुळे रेशीम कीटकांच्या...
प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावरावर होणारे...प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे जनावर चारा खात नाही व पाणी...
दूध उत्पादन वाढीसाठी उपयुक्त बायपास...प्रथिनांचा आहारात योग्य प्रमाणात वापर केला तर...
दुधाळ गाईची काळजी, व्यवस्थापनगाभण आणि प्रसूती काळात गायीच्या शरिरातील ऊर्जा...
मुक्त संचार कुक्कुटपालनासाठी उपयुक्त :...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...
कोंबड्यांसाठी संतुलित खाद्यनिर्मिती...पक्ष्यांना खाद्य देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे...
पशू सल्लाशेळ्या व मेंढ्यांना वजनवाढीस हिवाळा हा काळ योग्य...
जनावरांसाठी पाैष्टिक मुरघासज्या ठिकाणी हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे...
वासरांच्या आहारातील चिकाचे महत्त्वहिवाळ्यामध्ये गायी- म्हशी विण्याचे प्रमाण जास्त...
जनावारांतील विषबाधा कारणे, लक्षणे, उपायविषबाधेमुळे जनावरांच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
कासदाह आजाराची लक्षणे, प्रतिबंध, उपचारदेशी गाईंच्या तुलनेने संकरित गाईंमध्ये पहिल्या...
कोंबड्यांच्या आहार, लिटर व्यवस्थापनात...कमी तापमानात कोंबड्यांची योग्य प्रकारे काळजी न...