छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभ

पेरणी व डवरणी यंत्र
पेरणी व डवरणी यंत्र

या वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी संशोधन अाणि विकास समितीमध्ये अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या यंत्रे व तंत्रज्ञानाची शिफारस शेतकऱ्यांना वापरण्यासाठी करण्यात आली. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर शिफारशीचा लेखाजोखा... सौर प्रकाश कीटक सापळा  एकात्मिक कीटक व्यवस्थापनामध्ये शेतातील किडींचे सर्वेक्षण आणि नियंत्रणाच्या उद्देशाने प्रकाश सापळा उपयुक्त ठरतो. मात्र, शेतामध्ये विजेची उपलब्धता नसते. अशा ठिकाणी उपयुक्त ठरेल असा सौर प्रकाश कीटक सापळा विकसित केला आहे. द्विपात्र सौरजल निक्षारिकरण संयंत्र

  • निर्वात सौर संग्रहकाच्या वापर करत उच्च औष्णिक क्षमता मिळवली असून, त्याद्वारे अधिक शुद्ध पाणी मिळवता येते. यामध्ये ३ सेंटिमीटर पाण्याची पातळी कायम ठेवली जाते. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी हे पीडीकेव्ही विकसित द्विपात्र सौरजल निक्षारिकरण संयंत्र उपयुक्त ठरू शकते.
  • सौर फोटोव्होल्टाइक तथा हस्तचलित फवारणी यंत्र विकसित केले असून, त्याचा उपयोग फवारणीकरिता करता येईल.
  • यूपीव्हीसी पाइपच्या वापरातून हिरव्या चाऱ्यांच्या निर्मितीसाठी हायड्रोपोनीक संरचना विकसित केली आहे. याचे आकारमान  ३ बाय २ बाय ३ मीटर आहे. यात तृणांकुराद्वारे हिरवा चारा तयार केला जातो.
  • छोटे ट्रॅक्टरचलित पंदेकृवि पेरणी व डवरणी यंत्र कमी अश्‍वशक्तीच्या (१८.५ ते २५ अश्वशक्ती) ट्रॅक्टरद्वारे पेरणी व डवरणीची कामे करता येतात. खोली आवश्‍यकतेनुसार कमी जास्त करता येते. तसेच दीड फूट उंचीच्या पिकांमध्ये (उदा. मूग, उडीद, सोयाबीन) आंतरमशागतीसाठी उपयुक्त ठरते. या यंत्राची क्षेत्र क्षमता ०.४८५ हेक्टर प्रतितास असून, तण काढणी क्षमता ९०.०२ टक्के एवढी आहे.

    छोटे ट्रॅक्टरचलित पंदेकृवि स्लॅशर यंत्र विविध पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन करण्यासाठी १८.५ ते २५ अश्वशक्तीच्या छोट्या ट्रॅक्टरद्वारे चालणारे स्लॅशर यंत्र विकसित केले आहे. या यंत्राची क्षेत्र क्षमता ०.०४०५ हेक्टर प्रतितास एवढी आहे. या यंत्राची स्लॅशिंग क्षमता ९८.२४ टक्के एवढी आहे.

    पीडीकेव्ही कांदा प्रतवारी यंत्र कांद्याची प्रतवारी करण्यासाठी यंत्र विकसित केले आहे. कांदा प्रतवारी यंत्राची क्षमता प्रतिदिवस (८ तास) २० टन एवढी आहे. त्यातून ४० मि.मी. पेक्षा लहान, ४० ते ६० मि.मी. आणि ६० मि.मी. व्यासाचे कांदे वेगळे केले जाते. या यंत्रांसाठी ५ अश्वशक्ती विद्युत ऊर्जा आवश्यक असते. चार अकुशल मजूर यंत्र चालवण्यासाठी पुरेसे होते. हे यंत्र एका जागेवरून दुसरीकडे नेणे सुलभ आहे.

    पीडीकेव्ही जांभुळगर निष्कासन यंत्र जांभळाचा गर काढण्यासाठी जांभुळगर निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्राची गर निष्कसन क्षमता प्रतितास ८० किलो एवढी आहे. हे यंत्र अर्ध्या अश्वशक्तीच्या मोटारवर चालते. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com