agriculture story in marathi, small instruments for farm work | Agrowon

छोट्या यंत्रांनी होतील कामे सुलभ
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

या वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी संशोधन अाणि विकास समितीमध्ये अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या यंत्रे व तंत्रज्ञानाची शिफारस शेतकऱ्यांना वापरण्यासाठी करण्यात आली. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर शिफारशीचा लेखाजोखा...

या वर्षी दापोली येथे पार पडलेल्या संयुक्त कृषी संशोधन अाणि विकास समितीमध्ये अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या यंत्रे व तंत्रज्ञानाची शिफारस शेतकऱ्यांना वापरण्यासाठी करण्यात आली. कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर शिफारशीचा लेखाजोखा...

सौर प्रकाश कीटक सापळा 
एकात्मिक कीटक व्यवस्थापनामध्ये शेतातील किडींचे सर्वेक्षण आणि नियंत्रणाच्या उद्देशाने प्रकाश सापळा उपयुक्त ठरतो. मात्र, शेतामध्ये विजेची उपलब्धता नसते. अशा ठिकाणी उपयुक्त ठरेल असा सौर प्रकाश कीटक सापळा विकसित केला आहे.

द्विपात्र सौरजल निक्षारिकरण संयंत्र

  • निर्वात सौर संग्रहकाच्या वापर करत उच्च औष्णिक क्षमता मिळवली असून, त्याद्वारे अधिक शुद्ध पाणी मिळवता येते. यामध्ये ३ सेंटिमीटर पाण्याची पातळी कायम ठेवली जाते. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी हे पीडीकेव्ही विकसित द्विपात्र सौरजल निक्षारिकरण संयंत्र उपयुक्त ठरू शकते.
  • सौर फोटोव्होल्टाइक तथा हस्तचलित फवारणी यंत्र विकसित केले असून, त्याचा उपयोग फवारणीकरिता करता येईल.
  • यूपीव्हीसी पाइपच्या वापरातून हिरव्या चाऱ्यांच्या निर्मितीसाठी हायड्रोपोनीक संरचना विकसित केली आहे. याचे आकारमान  ३ बाय २ बाय ३ मीटर आहे. यात तृणांकुराद्वारे हिरवा चारा तयार केला जातो.

छोटे ट्रॅक्टरचलित पंदेकृवि पेरणी व डवरणी यंत्र
कमी अश्‍वशक्तीच्या (१८.५ ते २५ अश्वशक्ती) ट्रॅक्टरद्वारे पेरणी व डवरणीची कामे करता येतात. खोली आवश्‍यकतेनुसार कमी जास्त करता येते. तसेच दीड फूट उंचीच्या पिकांमध्ये (उदा. मूग, उडीद, सोयाबीन) आंतरमशागतीसाठी उपयुक्त ठरते. या यंत्राची क्षेत्र क्षमता ०.४८५ हेक्टर प्रतितास असून, तण काढणी क्षमता ९०.०२ टक्के एवढी आहे.

छोटे ट्रॅक्टरचलित पंदेकृवि स्लॅशर यंत्र
विविध पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन करण्यासाठी १८.५ ते २५ अश्वशक्तीच्या छोट्या ट्रॅक्टरद्वारे चालणारे स्लॅशर यंत्र विकसित केले आहे. या यंत्राची क्षेत्र क्षमता ०.०४०५ हेक्टर प्रतितास एवढी आहे. या यंत्राची स्लॅशिंग क्षमता ९८.२४ टक्के एवढी आहे.

पीडीकेव्ही कांदा प्रतवारी यंत्र
कांद्याची प्रतवारी करण्यासाठी यंत्र विकसित केले आहे. कांदा प्रतवारी यंत्राची क्षमता प्रतिदिवस (८ तास) २० टन एवढी आहे. त्यातून ४० मि.मी. पेक्षा लहान, ४० ते ६० मि.मी. आणि ६० मि.मी. व्यासाचे कांदे वेगळे केले जाते. या यंत्रांसाठी ५ अश्वशक्ती विद्युत ऊर्जा आवश्यक असते. चार अकुशल मजूर यंत्र चालवण्यासाठी पुरेसे होते. हे यंत्र एका जागेवरून दुसरीकडे नेणे सुलभ आहे.

पीडीकेव्ही जांभुळगर निष्कासन यंत्र
जांभळाचा गर काढण्यासाठी जांभुळगर निष्कासन यंत्र विकसित केले आहे. या यंत्राची गर निष्कसन क्षमता प्रतितास ८० किलो एवढी आहे. हे यंत्र अर्ध्या अश्वशक्तीच्या मोटारवर चालते. 

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...
दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...
लसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...
मधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...
सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...
मलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...
यंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...
हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणादुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा...
जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती...सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये...
धुरळणी यंत्र फायदेशीरधुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक...
असे करा ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...