उष्ण हवेसाठी वापरा ‘सोलर एयर हिटर`

उष्ण हवेसाठी वापरा ‘सोलर एयर हिटर`
उष्ण हवेसाठी वापरा ‘सोलर एयर हिटर`

सोलर एयर हिटर यंत्रमेमुळे सर्वसाधारण तापमानाच्या १० ते ३० अंश सेल्सिअस अधिक उष्णता मिळते. याच्या वापरामुळे इतर इंधनाचा वापर २० टक्यांपर्यंत कमी करणे शक्य आहे. यंत्रणेच्या माध्यमातून ८० टक्क्यांपर्यंत सौर ऊर्जा रूपांतरण शक्य आहे. या यंत्रणेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जातो.   ‘सोलर एयर हिटर’ हे सौर ऊर्जा मिळवण्यासाठी आणि ही ऊर्जा जागा गरम करण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरण्यासाठीची एक परिणामकारक यंत्रणा आहे. सोपी बांधणी, कमी किंमत यामुळे जगभरामध्ये या तंत्रज्ञानाचा उष्णता निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. या यंत्रणेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. प्रामुख्याने शेती क्षेत्रामध्ये याचा वापर वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी फायदेशीर ठरतो. ज्या इमारतींमध्ये अधिक उष्ण हवेची आवश्यकता असते तेथे या यंत्रणेचा वापर उपयुक्त दिसून आला आहे. विशेषतः कुक्कुटपालन व्यवसाय किंवा शेतमाल वाळविण्याच्या प्रक्रियेमध्ये या यंत्रणेचा योग्य वापर करता येतो.

अशी आहे यंत्रणा :

  • ‘सोलर एयर हिटर’ यंत्रणेमध्ये प्लॅट प्लेट कलेक्टर, शोषक प्लेटचा वापर केलेला आहे.
  • वरच्या बाजूस एक पारदर्शक आच्छादन असते. हवा वाहण्यासाठी जागा ठेवलेली असते.
  • उपकरणाच्या खालच्या आणि इतर बाजूस उष्णता रोधक बसवलेले असते.
  • प्लॅट प्लेट कलेक्टरशी समांतर असणाऱ्या पोकळीतून हवा पाठविली जाते. जी हवा तापवायची आहे तीचा प्रवाह पारदर्शक आच्छादन आणि शोषक प्लेट यातील जागेतून नेला जातो.
  • यंत्रणेतील शोषक प्लेट धातूपासून तयार केलेली असते. तिची जाडी १ मिमी एवढी असते.
  • पारदर्शक आच्छादन हे काच किंवा प्लॅस्टिक पासून तयार केले जाते. याची जाडी ४ मिमी ते ५ मिमी पर्यंत असते.
  • उपकरणाच्या तळाला आणि इतर बाजूस ५ मिमी ते ८ मिमी जाडीचा थर असलेले काचेची लोकर बसवलेली असते. या यंत्रणेमध्ये काचेची लोकर उष्णता रोधक म्हणून काम करते.
  • संपूर्ण यंत्रणा धातूच्या पत्र्यापासून तयार केली जाते. ही यंत्रणा एका विशिष्ट कोनात ठेवावी लागते.
  • यंत्रणेचा सूर्य किरणे पाडण्यासाठी ठेवलेला जो भाग आहे याचे क्षेत्रफळ दोन वर्गमीटर एवढे असते. मिळणाऱ्या उष्णतेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शोषक प्लेट ‘V’ आकारात बनवलेली असते. दुसरा पर्याय म्हणून ही प्लेट हवेच्या दुहेरी प्रवाह करण्याच्या दृष्टीने बनवली जाते.
  • दुहेरी प्रवाह पद्धतीच्या यंत्रणेमध्ये काचेची दोन आच्छादने वापरलेली असतात. या दोन्ही अच्छादनांच्या मध्ये हवेची पोकळी असते, जी उष्णता रोधकाचे काम करते.
  • यंत्रणेचा फायदा ः

  • सर्वसाधारण तापमानाच्या १० ते ३० अंश सेल्सिअस अधिक उष्णता मिळते.
  • मोफत उष्णता, इतर इंधनाचा वापर २० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य.
  • ८० टक्क्यांपर्यंत सौर उर्जा रूपांतरण.
  • प्रती चौरस मीटर क्षेत्राफळातून ५०० ते ६०० व्हॉट ऊर्जा मिळते.
  • व्हेंटिलेशनचा खर्च कमी होतो, प्रदूषण होत नाही.
  • मोफत उष्णतेचा स्त्रोत, ऊर्जेची बचत, वापरण्यास सोपे.
  • प्रदूषणाला कारणीभूत वायूची निर्मिती नाही.
  • देखभालीची फारशी गरज नाही.
  • यंत्रणेचा वापर :

  • उत्पादन इमारती, औद्योगिक इमारती.
  • कार्यालयीन तसेच रहाण्याच्या इमारती.
  • शेतीमधील विविध प्रक्रियांमध्ये वापर.
  • नगरपालिका, दवाखाना, शाळांमध्ये उपयुक्त.
  • लष्करी सुविधांमध्ये वापर.
  • संपर्क : डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (सहाय्यक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com