Agriculture story in marathi, solar air heater | Agrowon

उष्ण हवेसाठी वापरा ‘सोलर एयर हिटर`
डॉ.वैभवकुमार शिंदे
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

सोलर एयर हिटर यंत्रमेमुळे सर्वसाधारण तापमानाच्या १० ते ३० अंश सेल्सिअस अधिक उष्णता मिळते. याच्या वापरामुळे इतर इंधनाचा वापर २० टक्यांपर्यंत कमी करणे शक्य आहे. यंत्रणेच्या माध्यमातून ८० टक्क्यांपर्यंत सौर ऊर्जा रूपांतरण शक्य आहे. या यंत्रणेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जातो.
 

सोलर एयर हिटर यंत्रमेमुळे सर्वसाधारण तापमानाच्या १० ते ३० अंश सेल्सिअस अधिक उष्णता मिळते. याच्या वापरामुळे इतर इंधनाचा वापर २० टक्यांपर्यंत कमी करणे शक्य आहे. यंत्रणेच्या माध्यमातून ८० टक्क्यांपर्यंत सौर ऊर्जा रूपांतरण शक्य आहे. या यंत्रणेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जातो.
 
‘सोलर एयर हिटर’ हे सौर ऊर्जा मिळवण्यासाठी आणि ही ऊर्जा जागा गरम करण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरण्यासाठीची एक परिणामकारक यंत्रणा आहे. सोपी बांधणी, कमी किंमत यामुळे जगभरामध्ये या तंत्रज्ञानाचा उष्णता निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. या यंत्रणेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला जातो. प्रामुख्याने शेती क्षेत्रामध्ये याचा वापर वेगवेगळ्या प्रक्रियांसाठी फायदेशीर ठरतो. ज्या इमारतींमध्ये अधिक उष्ण हवेची आवश्यकता असते तेथे या यंत्रणेचा वापर उपयुक्त दिसून आला आहे. विशेषतः कुक्कुटपालन व्यवसाय किंवा शेतमाल वाळविण्याच्या प्रक्रियेमध्ये या यंत्रणेचा योग्य वापर करता येतो.

अशी आहे यंत्रणा :

  • ‘सोलर एयर हिटर’ यंत्रणेमध्ये प्लॅट प्लेट कलेक्टर, शोषक प्लेटचा वापर केलेला आहे.
  • वरच्या बाजूस एक पारदर्शक आच्छादन असते. हवा वाहण्यासाठी जागा ठेवलेली असते.
  • उपकरणाच्या खालच्या आणि इतर बाजूस उष्णता रोधक बसवलेले असते.
  • प्लॅट प्लेट कलेक्टरशी समांतर असणाऱ्या पोकळीतून हवा पाठविली जाते. जी हवा तापवायची आहे तीचा प्रवाह पारदर्शक आच्छादन आणि शोषक प्लेट यातील जागेतून नेला जातो.
  • यंत्रणेतील शोषक प्लेट धातूपासून तयार केलेली असते. तिची जाडी १ मिमी एवढी असते.
  • पारदर्शक आच्छादन हे काच किंवा प्लॅस्टिक पासून तयार केले जाते. याची जाडी ४ मिमी ते ५ मिमी पर्यंत असते.
  • उपकरणाच्या तळाला आणि इतर बाजूस ५ मिमी ते ८ मिमी जाडीचा थर असलेले काचेची लोकर बसवलेली असते. या यंत्रणेमध्ये काचेची लोकर उष्णता रोधक म्हणून काम करते.
  • संपूर्ण यंत्रणा धातूच्या पत्र्यापासून तयार केली जाते. ही यंत्रणा एका विशिष्ट कोनात ठेवावी लागते.
  • यंत्रणेचा सूर्य किरणे पाडण्यासाठी ठेवलेला जो भाग आहे याचे क्षेत्रफळ दोन वर्गमीटर एवढे असते. मिळणाऱ्या उष्णतेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शोषक प्लेट ‘V’ आकारात बनवलेली असते. दुसरा पर्याय म्हणून ही प्लेट हवेच्या दुहेरी प्रवाह करण्याच्या दृष्टीने बनवली जाते.
  • दुहेरी प्रवाह पद्धतीच्या यंत्रणेमध्ये काचेची दोन आच्छादने वापरलेली असतात. या दोन्ही अच्छादनांच्या मध्ये हवेची पोकळी असते, जी उष्णता रोधकाचे काम करते.

यंत्रणेचा फायदा ः

  • सर्वसाधारण तापमानाच्या १० ते ३० अंश सेल्सिअस अधिक उष्णता मिळते.
  • मोफत उष्णता, इतर इंधनाचा वापर २० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य.
  • ८० टक्क्यांपर्यंत सौर उर्जा रूपांतरण.
  • प्रती चौरस मीटर क्षेत्राफळातून ५०० ते ६०० व्हॉट ऊर्जा मिळते.
  • व्हेंटिलेशनचा खर्च कमी होतो, प्रदूषण होत नाही.
  • मोफत उष्णतेचा स्त्रोत, ऊर्जेची बचत, वापरण्यास सोपे.
  • प्रदूषणाला कारणीभूत वायूची निर्मिती नाही.
  • देखभालीची फारशी गरज नाही.

यंत्रणेचा वापर :

  • उत्पादन इमारती, औद्योगिक इमारती.
  • कार्यालयीन तसेच रहाण्याच्या इमारती.
  • शेतीमधील विविध प्रक्रियांमध्ये वापर.
  • नगरपालिका, दवाखाना, शाळांमध्ये उपयुक्त.
  • लष्करी सुविधांमध्ये वापर.

संपर्क : डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१
(सहाय्यक प्राध्यापक, कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
छोट्या छोट्या तंत्रांनी शेती झाली सुलभ शेतीसमोरील प्रश्‍न वाढत असतानाच नवे तंत्रज्ञान...
बटाट्यातील शर्करेचे प्रमाण तपासण्याची...सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन संस्थेने...
अवघ्या ३०० रुपयांत बनविले हरभरा शेंडे...एक एकर हरभरा खुडणीसाठी पाच ते सहा मजुरांची...
अननसाच्या टाकाऊ सालीपासून पर्यावरणपूरक...अननस खाल्ल्यानंतर त्याची साल सहसा फेकून दिली जाते...
उष्ण हवेसाठी वापरा ‘सोलर एयर हिटर`सोलर एयर हिटर यंत्रमेमुळे सर्वसाधारण तापमानाच्या...
मशागतीपासून मळणीपर्यंतचे श्रम...मजूरटंचाई हीच शेतीतील आजची सर्वांत मोठी गंभीर...
दुधाची टिकवण क्षमता वाढीसाठी अत्याधुनिक...स्पोअर्स आणि जिवाणूंमुळे दूध लवकर खराब होते. उष्ण...
सुधारित बायोगॅस सयंत्र ठरते फायदेशीरसामान्य रचना असलेल्या सयंत्राच्या तुलनेत ताज्या...
पखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘...मालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व...
सातत्यपूर्ण प्रयोगातून शेती जाईल...शेतीमध्ये समस्या खूप आहेत. त्यावर मात करण्यासाठी...
सोलर टनेल ड्रायरचा वापर ठरतो फायदेशीरसोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे...
पोल्ट्री वीर्यपोल्ट्री विरळकांमुळे...पोल्ट्री पक्ष्यांचे वीर्य हे तीव्र असून, त्यांचे...
महिलांचे कष्ट कमी करणारे मका सोलणी यंत्रमक्याची सोलणी करणे तसे कष्टप्रद काम असते. हे काम...
महिलाबचत गटाकडून कापूस ते वस्त्रनिर्मितीकापूस हे विदर्भातील मुख्य पीक; पण त्यावर...
घरगुती प्रक्रियेतून बेलफळापासून बनवा...बेल झाड औषधी असून, घरगुती पातळीवर विविध...
धान्य वहनासाठी न्यूमॅटिक तंत्रावरील...तंजावर (तमिळनाडू) येथील भारतीय अन्नप्रक्रिया...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
सुधारित यंत्रामुळे वाढेल उत्पादनांची...वर्षभर वेगवेगळ्या भाज्यांचे उत्पादन आपल्या...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
तंत्र भस्मीकरणाचे...भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात...