Agriculture story in marathi, solar tunnel dryer for fruit and vegetable drying | Agrowon

सोलर टनेल ड्रायरचा वापर ठरतो फायदेशीर
डॉ. वैभवकुमार शिंदे
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

सोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. सोलर टनेल ड्रायरमध्ये फळे, भाजीपाला, मसाले वाळवता येतात.

सोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. सोलर टनेल ड्रायरमध्ये फळे, भाजीपाला, मसाले वाळवता येतात.

आपल्या देशात फक्त २ ते ३ टक्के कृषी उत्पादन हे प्रक्रिया करून वापरले जाते. वाळवणी तंत्रामुळे शेतमालाचे नुकसान २ ते ३ टक्यांनी कमी होऊ शकते. टिकवणक्षमता वाढविण्यासाठी राहण्यासाठी दर्जेदार वस्तू शेतमाल एकसारख्या प्रमाणात वाळवणे आवश्यक आहे. वाळवणीसाठी खनिज इंधनाचा वापर न करता अपारंपरिक उर्जा वापरल्यामुळे वातावरण दुषित होणार नाही. शेतमाल योग्य पद्धतीने वाळवल्यामुळे कृषी उत्पादनाची किंमतही वाढते. आपल्याकडे असलेला मुबलक सूर्यप्रकाशाचा वापर वाळवणी प्रक्रियेसाठी करणे आवश्यक आहे.
 
सोलर टनेल ड्रायर ः

  • वाळवलेल्या पदार्थाला जगभरात चांगली मागणी आहे. वाळवलेले पदार्थ हे ताज्या पदार्थासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. फळे आणि पालेभाज्या वाळवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.
  • खुल्या सूर्यप्रकाशात फळांचे काप किंवा भाजीपाला वाळवल्यामुळे बऱ्याचदा नुकसान होते, कारण यामध्ये धूळ, पाऊस तसेच प्राणी, कीटक आणि पक्षांपासून नुकसान संभावते. उत्पादनाची गुणवत्ता खालावते. हे टाळण्यासाठी सोलर टनेल ड्रायरचा वापर फायदेशीर ठरतो.
  • सोलर टनेल ड्रायरमध्ये फळे, भाजीपाला, मसाले वाळवता येतात. हा ड्रायर वापरण्यास आणि देखरेखीसाठी सोपा आहे. वेळेची बचत होते, दर्जा कायम राखला जातो.
  • १८ मी. × ३.७५ मी. आकाराच्या सोलर टनेल ड्रायर साठी साधारण १ लाख २० हजार एवढा खर्च येऊ शकतो.
  • टनेल ड्रायरची औष्णिक कार्यक्षमता १८ टक्यांपर्यत असते.

तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये :

  • वाळवण्यासाठी सौर उष्णतेचा वापर .
  • सोपे निर्मिती तंत्र.
  • सोलर टनेल ड्रायर मध्ये ०.५ ते १.५ टन उत्पादन वाळवण्यासाठी १८ मी.×३.७५ मी × २ मी एवढी जागा आवश्यक.
  • टनेलचा आकार अर्धगोलाकार असून यामध्ये हूपचाही वापर केला आहे.
  • सूर्यकिरणे शोषणारा घटक हा २०० मिमी जाडीचा असून यु.व्ही. स्टॅबिलाईजड पॉलीथिलीनपासून बनवलेला असतो.
  • ड्रायरचा तळभाग सिमेंट कॉंक्रीटपासून बनवलेला असतो. त्यावर काळ्या रंगाचे आच्छादन असते.
  • व्हेंटिलेशनसाठी समान अंतरावर चिमणी बसवलेली असते.
  • सोलर टनेल ड्रायर मधील तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा २० ते २५ अंश सेल्सिअस अधिक असते.
  • ड्रायरच्या वापरामुळे ५० टक्के वेळेची बचत होते.
  • पारंपारिक पद्धतीपेक्षा या पद्धतीत ४० टक्के कमी श्रम लागतात.

तापमान नियंत्रण उपाय

  • ड्रायरमध्ये नियंत्रण प्रणाली ही दिवसा सूर्यप्रकाशाने वाळवण्यासाठी आणि रात्रीला जैवभार आधारित गरम हवा निर्माण करणाऱ्या उपकरणाच्या वापरासाठी नियंत्रित करणे गरजेचे आहे.
  • प्रत्येक कृषी पदार्थासाठी वेगळे तापमान आणि आर्द्रतेची आवश्यकता असते.
  • वाळवण्याचे नियमन विविध उपकरणाच्या सहाय्याने केले जाते.
  • नियंत्रित स्थितीचे नियमन आवश्यक आहे

 संपर्क: डॉ. वैभवकुमार शिंदे,९९६०९७५२७१
(कृषी अभियांत्रिकी विभाग,महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद.)

इतर कृषिपूरक
परसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराज...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...
व्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या...
मत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे?सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
व्यावसायिक, शास्त्रीय दृष्टिकोनातून करा...म्हशीच्या प्रजनन व्यवस्थापनामध्ये म्हैस...
प्रशिक्षण, मार्गदर्शनातून कमी करा दुग्ध...दुग्ध व्यवसाबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर माहिती...
पशूसल्लागोठ्यातील गाई-म्हशींचे गाभण राहण्याचे प्रमाण हे...
प्रथिने, खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी...अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक...
म्हशीचे प्रमुख आजार, प्रतिबंधात्मक...प्रत्येक म्हैसपालकाने म्हशीचे दूध उत्पादन नियमित...
योग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...
पंढरपुरी म्हैस..पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग...
शेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...
ब्रुसेल्लोसिस, व्हिब्रिओसिस रोगावर ठेवा...जनावरांतील प्रजननासंबंधी अाजार टाळण्यासाठी...
तुती लागवडीबाबत माहिती...तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
म्हशींना खाद्यासोबत द्या खनिज मिश्रणेम्हशीच्या चयापचय क्रियेसाठी, शारीरिक वाढीसाठी,...
लसीकरण, जागरूकतेतून टाळा रेबीज रोगाचा...जागितक आरोग्य संघटनेनुसार आपल्या देशातील 70 टक्के...
दुग्ध व्यवसायातून गटाने मिळविली बाजारपेठबोपी (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) गावातील...
हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित...हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
समतोल आहारातून वाढेल दुग्धोत्पादन म्हैस पालन फायदेशीर होण्याकरिता...