Agriculture story in marathi, Source of citrus' sour taste is identified | Agrowon

लिंबूवर्गीय फळांच्या आंबटपणामागील स्रोत ओळखला
वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

लिंबूवर्गीय फळांचे वैशिष्ट्य असलेल्या आंबटपणासाठी कारणीभूत जनुकाचा शोध कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील दोन संशोधकांनी घेतला आहे. त्याचे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

लिंबूवर्गीय फळांचे वैशिष्ट्य असलेल्या आंबटपणासाठी कारणीभूत जनुकाचा शोध कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील दोन संशोधकांनी घेतला आहे. त्याचे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

गेल्या हजारो वर्षांच्या पैदास प्रक्रियेतून आधुनिक लिंबूवर्गीय फळे विकसित होत गेली आहेत. त्यामध्ये आंबटपणा आणि गोडी यांचे विशिष्ट मिश्रण आहे. या फळांच्या गराचे विश्लेषण केले असता साखरेचे प्रमाण समान असतानाही त्यातील हायड्रोजन हा घटक यासाठी मुख्यत्वेकरून आंबटपणासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते. आंबट असलेल्या फळांच्या गरामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन भारीत कण आढळतात. त्यामुळे त्याचा सामू कमी होऊन आंबटपणा वाढतो. ही तीव्र आंबट जिभेच्या आम्लांसाठी संवेदनशील असलेल्या भागांना त्वरित झटक्याच्या स्वरुपात जाणवते. याच्या विरुद्ध गोड जातींमध्ये हायड्रोजन भारीत कण कमी असून, त्याची आम्लता कमी असते. नेदरलॅंड येथील अॅमस्टरडॅम विद्यापीठातील रोनाल्ड कोयेस आणि सहकाऱ्यांनी काही लिंबूवर्गीय फळांमध्ये आंबटपणाचे प्रमाण किंवा आम्लतेचे प्रमाण अधिक का असते, याचा अभ्यास केला आहे. आजवर यामागील नेमकी प्रक्रिया अज्ञात होती.

या संशोधनाकडे वळण्याचे कारणही मजेशीर आहे. रोनाल्ड कोयेस यांच्या पूर्वीच्या पिट्यूनिया फुलांच्या अभ्यासामध्ये अधिक आम्लता असलेल्या जांभळ्या पिट्यूनिया फुलांमध्ये गडद रंग येत असल्याचे दिसून आले होते. असाच वेगळा प्रकार त्यांना लिंबाच्या फरीस या जातीसंदर्भात दिसला. या जातीच्या झाडांमध्ये एकाच फांदीवर आंबट आणि गोड अशा दोन्ही प्रकारची फळे आणि जांभळी छटा असलेली फुले लागत असल्याचे स्पष्ट झाले. पुढे कोयेस यांच्या गटाने कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील मायकेल रूज आणि क्लॅरी फेडेरिकी यांच्यासह संशोधनाला प्रारंभ केला. विद्यापीठातील लिंबूवर्गीय फळांच्या अनेक जातींचा अभ्यास केला. रुज आणि फेडेरिकी यांनी आंबट ते साखरेसारख्या गोड या चवीनुसार फरीस आणि २० अन्य जातींची निवड केली.
पिट्यूनियातील आम्लतेचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांच्या कार्याबद्दल कोयेस यांनी अभ्यास केला. त्यानंतर कोयेस यांनी लिंबूवर्गीय जनुकातील CitPH१ आणि CitPH५ ही दोन जनुके अधिक कार्यरत असल्यास आंबटपणा निर्माण करतात आणि आठवड्यातून एकदा कार्यान्वित झाल्यास गोडपणा निर्माण करत असल्याचे ओळखले. ही जनुके हायड्रोजन आयनला रसाच्या पेशींमधील पोकळीमध्ये वाहून नेणाऱ्या वाहक प्रथिनांना कार्यान्वित करतात, त्यामुळे एकूण आम्लतेमध्ये वाढ होते. पुढील टप्प्यामध्ये संशोधकांनी रसपेशीमध्ये CitPH१ आणि CitPH५ यांच्या पातळीचे नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांचे नियंत्रण केल्यास गोडी वाढत असल्याचे दिसून आले.

कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील जनुकशास्त्राचे प्रो. मायकेल रुज यांनी सांगितले, की फळांच्या पेशीमध्ये आम्लता निर्माण होण्याची यंत्रणा लक्षात आली असून, त्या संबंधित जनुकांवर लक्ष केंद्रित करत आहोत. ही जनुके CitPH१ आणि CitPH५ यांचे कार्यान्वित होणे कमी करू शकतात. परिणामी फळांची गोडी वाढवता येईल. अर्थात, या जनुकांचे तीव्र म्युटेशन केल्यास आम्लरहित लिंबूवर्गीय फळे तयार होतील, त्यातून त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण चव नष्ट होऊ शकते. 

टॅग्स

इतर बातम्या
भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
पुणे विभागात हरभरा, गव्हाची काढणी...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने रब्बी हंगामातील गहू...
पूर्व भागात कृष्णा, वारणा नद्या पडल्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पूर्व भागात कृष्णा व...
ताकारीच्या तिजोरीत १३ कोटी शिल्लकवांगी, जि. सांगली ः मागील १५ वर्षांपासून दरवर्षी...
गिरणा नदीतून पाण्याची ग्रामस्थांना...जळगाव ः पिण्याच्या पाण्यासंबंधी सोडलेले गिरणा...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
दुबळवेल ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कारवाशीम : नागरिकांना अावश्यक असलेल्या पायाभूत...
नांदेड, परभणी, हिंगोलीत अन्नत्याग आंदोलननांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील...
दुष्काळी भागाला मिळतोय चिंचेचा आधारशिरूर कासार, जि. बीड ः दुष्काळाच्या गंभीर झळा...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या कायम ः...राहुरी विद्यापीठ, जि. नगर : विविध पिकांच्या...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...