agriculture story in marathi, success story of kada ashti APMC, beed | Agrowon

कांद्यामध्ये नावलौकीक मिळवलेली कडा बाजार समिती
सूर्यकांत नेटके
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नगरला जोडून असलेल्या बीड जिल्ह्यातील भागात कांद्याचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते. मात्र, जवळ बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी यायच्या. कडा (ता. आष्टी) कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या मदतीने ही बाजारपेठ उपलब्ध केली. कांदा खरेदी सुरू झाल्यापासून येथे सुमारे दीडशे मजुरांना रोजगार मिळाला आहे. बीड जिल्ह्यात फक्त येथेच कांदा विक्रीची व्यवस्था आहे. येथे खरेदी केलेला कांदा विविध राज्यांसह परदेशातही निर्यात करण्यात येत आहे.

नगरला जोडून असलेल्या बीड जिल्ह्यातील भागात कांद्याचे उत्पादन बऱ्यापैकी घेतले जाते. मात्र, जवळ बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी यायच्या. कडा (ता. आष्टी) कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांच्या मदतीने ही बाजारपेठ उपलब्ध केली. कांदा खरेदी सुरू झाल्यापासून येथे सुमारे दीडशे मजुरांना रोजगार मिळाला आहे. बीड जिल्ह्यात फक्त येथेच कांदा विक्रीची व्यवस्था आहे. येथे खरेदी केलेला कांदा विविध राज्यांसह परदेशातही निर्यात करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका नगर जिल्ह्याला जोडून आहे. तेथूनच पुढे नगर जिल्ह्यातील जामखेडला जावे लागते. सिंचनाचा अभाव असल्याने वर्षानुवर्ष दुष्काळाशी सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील आष्टीही अपवाद नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी कोरडवाहू शेती करतानाच ऊसतोडणीचेही काम करतात.

कांदा मार्केटचा पर्याय
अलीकडील काळात पाण्याचे नियोजन करून कांदा घेण्याची आष्टी भागातील शेतकऱ्यांची धडपड दिसून येते. मात्र, बीड जिल्ह्यात कांद्यासाठी बाजारपेठ नसल्याने नगर, पुणे, सोलापूर, औरंगाबादला जावे लागे. त्यामुळे वाहतुकीसह अन्य भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागे. कडा (ता. आष्टी) कृषी उत्पन्न बाजार समितीने मात्र गेल्या दहा वर्षांपासून कांदा बाजारपेठ उभी केल्याने शेतकऱ्यांची सोय झालीच. शिवाय बाजार समितीही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली.

कांद्याची कडा बाजारपेठ- वैशिष्ट्ये

 • कडा बाजार समितीत भाऊसाहेब खलाटे आणि बाबाभाई शेख यांनी १९९८ मध्ये अनेक अडचणींवर मात करत सर्वप्रथम कांदा खरेदी सुरू केली. सुरवातीला फक्त रविवारी लिलाव व्हायचे. पहिल्या दिवशी अवघ्या दोनशे गोण्यांची आवक झाली.
 • सध्या बुधवारी आणि रविवारी लिलाव. दर लिलावाला सुमारे पंचवीस हजार गोण्यांची आवक.
 • बीड जिल्ह्यासह पाथर्डी, जामखेड, कर्जत, करमाळा, बार्शी भागातून आवक
 • खरेदी कांद्याला देशभरातून मागणी. येथील हाफीज नुरमहमंद हे व्यापारी दुबई, लंडन, श्रीलंका, इंडोनेशिया, मलेशिया येथे चार वर्षांपासून कांदा निर्यात करतात.

बाजार समिती सुविधा

 • कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना- १९७२. आष्टी आणि धामणगाव येथे उपबाजारपेठ
 • सुरवातीला भुसार मालाची खरेदी व्हायची. सध्या त्याच्या खरेदीसाठी ३५ तर कांदा खरेदीसाठी ११ खरेदीदार व्यापारी.
 • अठरा वर्षांपासून इलेक्‍ट्रीक वजनकाटे, ५० टन वजनाचे दोन वजनकाटे
 • पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, रस्ते
 • एकत्रित लिलावासाठी मोठा हॉल
 • धान्य साठवणुकीसाठी दोनशे मे. टन क्षमतेचे गोदाम
 • खुले लिलाव, रोख पट्टी. धनादेश, व्यवहारात ‘आरटीजीएस’चा वापर
 • समितीचे स्वमालकीचे मोठे ४८ तर छोट्या व्यावसायिकांसाठी ३९ गाळे

रोजगारनिर्मिती
येथून कांदा वेगवेगळ्या राज्यांत व परदेशात पाठवण्यात येतो. त्यामुळे प्रतवारीसाठी मजुरांची गरज असते. पंचवीस वर्षांपूर्वी येथे भुसार मालाची फारशी आवक नव्हती. आर्थिक स्राेतही पुरेसा नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अडचण निर्माण व्हायची. आता दीडशेच्या आसपास मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकही स्थिरावले असल्याचे बाजार समितीचे संचालक अशोक पवार सांगतात.

तूर, हरभरा खरेदी
आष्टी, पाटोदा, जामखेड, कर्जत तालुक्‍यात तूर, हरभऱ्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.
कडा बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मागणीवरून खरेदी केंद्रे सुरू करून तुरीची १५ हजार क्विटंल तर तुरीची २० हजार क्विंटल एवढी खरेदी हमी दराने केली. साहजिकच शेतकऱ्यांना अन्यत्र जाण्याचा त्रास वाचला.

लवकरच लिंबू खरेदी
आष्टी तालुक्‍यात सुमारे दीड हजार हेक्‍टर लिंबाचे क्षेत्र आहे. बीड जिल्ह्यातील हे सर्वाधिक असावे. मात्र विक्रीची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना सोलापूर, नगर, पुणे गाठावे लागते. त्यामुळे येथे लवकरच लिंबू खरेदी सुरू होणार आहे.

खिलार बैल बाजारही प्रसिद्ध

 • कड्याचा खिलार बैलबाजारही राज्यभर प्रसिद्ध.
 • बीड, पाथर्डी, जामखेड, शेवगाव भागात ऊसतोड मजुरांची संख्या अधिक. त्यामुळे बैलांची मोठी मागणी
 • राज्यातील विविध भागांतून खिलार बैलांसह, म्हशी, संकरित गायी विक्रीसाठी
 • आठ दिवसांपूर्वी एका बैलजोडीची विक्री एक लाख पाच हजार रुपये किमतीत झाली.

प्रतिक्रिया 
शेतमाल विक्रीतील फसवणूक, आर्थिक भुर्दंड हे प्रकार येथे पाहायला मिळत नाहीत. त्यामुळेच वीस वर्षांत एकाही शेतकऱ्यांची तक्रार आलेली नाही. कांदा मार्केटमुळे दुष्काळी भागाला जीवदानच मिळाले आहे.

-सुरेश धस
माजी मंत्री, आम
दार

आमच्या बाजार समितीने कांद्यामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुष्काळी भाग असलेल्या कडा येथून कांदा थेट परदेशात जातो ही अभिमानाची बाब आहे.

-रमजान तांबोळी-९८५०३२४९८५
सभापती, बाजार समिती, कडा

कांद्याची खरेदी सुरू झाल्याने बाजार समितीचा सर्वदूर नावलौकीक झाला आहे. आष्टीसह शेजारील तालुक्‍यातील कांदा उत्पादकांची संख्या येथे वाढत आहे.
-हनुमंत गळगटे-९११२८७१६१६
सचिव, बाजार समिती

सुरवातीला आम्ही दोघा व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी सुरू केली. मालाची आवकही फारशी नव्हती.
आता बीड जिल्ह्यासह सोलापूर, नगरहून शेतकरी येतात. आवकही मोठ्या प्रमाणात होते. अठरा वर्षांचे हे फलित अाहे.
-भाऊसाहेब खलाटे-९४२१२८१५४९
कांदा खरेदीदार, कडा

दर्जेदार माल असल्याने दुबई, मलेशिया, श्रीलंका येथे चार वर्षांपासून कांदा निर्यात करतो.
परदेशात येथील हजारो टन कांदा निर्यात होतो. विक्री व्यवस्था तयार झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
-बबलू तांबोळी-९४२३१७१५६९
कांदा व्यापारी, कडा

बाजार समितीतील आवक व दर प्रातिनिधीक

वर्ष             आवक         दर (रू.)
२००८-०९ ४३६७७        १०० ते १०००
२०१२- १३- ५४६८८       १०० ते १८००
२०१४-१५- ४०५५०       १०० ते १२००
२०१६-१७- ६९८५२९       ३०० ते ११००
२०१७-१८- ३८५६३२ (जुलैअखेर)- २०० ते १०००

-आवक- गोण्यांमध्ये
-दर- (वार्षिक सरासरी) क्विंटलमध्ये

वार्षिक उलाढाल (रू.)

 • कांदा- सुमारे ४० कोटी
 • एूकण उलाढाल- १०० कोटी

   आठ वर्षांतील जनावरे खरेदी-विक्री

 • बैल- २३,०७०
 • गाय- १२,४५६
 • म्हैस- १४४२
 • शेळी-मेंढी- ७०, ०००

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....