बीटचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ

बीट प्रक्रिया
बीट प्रक्रिया
  भरपूर पोषण तत्त्व असलेल्या या कंदमुळाचा आहारात केवळ सॅलड म्हणून वापर मर्यादित असल्याचे दिसून येते. बीटपासून जर विविध प्रक्रिया केलेले पदार्थ बनवले तर बीटचा आहारात समावेश वाढवता येऊ शकतो. बीटपासून आर.टी. एस., जेली, मफिन्स असे पदार्थ तयार करता येतात. याशिवाय बीटपासून जॅम, मार्मालेड आणि लोणचे असे पदार्थसुद्धा बनवता येतात. त्यामुळे बीटचा आहारात वापर वाढवण्यासाठी बिटवर प्रक्रिया करणे सहज शक्‍य आहे. बीटचे विविध पदार्थ १) आर. टी. एस. आर. टी. एस. म्हणजे तहान शमविणारे, पचनाला सोपे, भूक वाढविणारे रेडी टू सर्व्ह पेय. असे पेय विविध फळांपासून बनवतात. असेच आर. टी. एस. बीटपासूनसुद्धा बनवता येऊ शकते.
  • प्रथम बिट स्वच्छ धुऊन, साल काढून पुन्हा स्वच्छ धुऊन कापून घ्यावे.
  • बीटच्या कापलेल्या तुकड्यांचा मिक्‍सरमधून गर तयार करावा.
  • एक लिटर आर. टी. एस. तयार करण्यासाठी ८०५ मिली पाण्यात ९५ ग्रॅम साखर ढवळून त्यात ०.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून उकळावे आणि त्यात १०० ग्रॅम बीटचा गर मिसळून उकळून गाळून घ्यावा.
  • तयार झालेले हे आर.टी.एस. ८५ अंश सेल्सिअस तापमानाला १५ मिनिटं तापवून गार करून बाटल्यांमध्ये भरून ठेवावे.
  • २) जेली
  • बिटचे साल काढून किसून घ्यावे.
  • किसलेल्या बीटच्या वजनाच्या दीडपट पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. या उकळत्या पाण्यात किसलेले बीट टाकून १५-२० मिनिटे उकळून गाळून घ्यावे.
  • १०० मिली बीट सत्त्वामध्ये ६१ ग्रॅम साखर, ०.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळून उकळावे. २ ग्रॅम पेक्‍टिन मिसळून सतत ढवळत ठेवून, त्या मिश्रणाचा टी.एस.एस. हा ६५ अंश ब्रिक्‍स आला, की मिश्रण उकळणे थांबवावे.
  • या मिश्रणाला जेलीच्या साच्यात ओतून साचे एका ठिकाणी ३० मिनिटे किमान स्थिर ठेवावे.
  • तयार जेली पॅक करावी.
  • ३) मफिन्स मफिन्स सर्वसामान्यपणे फक्त मैद्यापासून बनवले जातात. मैदा हा आरोग्याला फारसा फायदेशीर नसल्याने जर त्यात बिटचा वापर केला तर मफिन्सचे पोषणमूल्य वाढवता येऊ शकते.
  • सर्वप्रथम १०० ग्रॅम मैदा आणि २ ग्रॅम बेकिंग पावडर एकत्र करून ३ ते ४ वेळा चाळून घ्यावे.
  • दुसऱ्या भांड्यात २५ ग्रॅम वनस्पती तूप आणि ८० ग्रॅम साखर एकत्र करावी. यामध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि ३० ग्रॅम बिटचा गर एकत्र करून हे मिश्रण मफिन्सच्या पात्रात भरावे.
  • हे मफिन्स पात्र बेकिंग ओव्हनमध्ये २०० अंश सेल्सिअस तापमानाला २० मिनिटे बेक करावे. तयार मफिन्स गार करून सील बंद करावे.
  • संपर्क : संदीप पालवे, ८२७५४५२२०३ (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)  
       

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com