ऊसपीक सल्ला

पट्टा पद्धतीने ऊस लागवड करावी.
पट्टा पद्धतीने ऊस लागवड करावी.
  • सुरू उसाचा कालावधी १२ महिन्यांचा असल्यामुळे ऊस तोडणी १५ फेब्रुवारीच्या आत होते, त्यामुळे चांगला खोडवा ठेवता येतो.
  • सुरू हंगामातील लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. १५ फेब्रुवारीनंतर लागवड झाल्यास जादा तापमानामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो, पर्यायाने उत्पादनही घटते.
  • साधारणत: हेक्टरी २० टन शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करावा. प्रतिहेक्टरी १० टन शेणखत पूर्व मशागतीच्या वेळी आणि १० टन शेणखत ऊस लागवडीच्याअगोदर आणि रासायनिक खतांचा पहिला हप्ता सरीमध्ये मातीत मिसळावा.
  • कंपोस्ट खत पुरेसे नसल्यास प्रेसमड केक, कोंबडी खत, बायोकंपोस्ट, उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेंडी अशा अनेक पर्यायांनी जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ मिसळता येतात.
  • सुरू उसाला प्रतिहेक्टरी २५० किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश अशी खतमात्रेची शिफारस आहे. माती परीक्षण करून घेतल्यास जमिनीचा सामू, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश बरोबरच सूक्ष्मअन्नद्रव्यांची स्थितीसुद्धा आपल्याला कळते. त्याप्रमाणे रासायनिक खत मात्रा ठरविता येते.
  • को ८६०३२ या मध्यम उशिरा पक्व होणाऱ्या जातीस अन्नद्रव्यांची गरज जास्त असल्याने या जातीस नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्के जास्त मात्रा म्हणजेच ३०० किलो नत्र, १४० किलो स्फुरद व १४० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावी.
  • लागवडीच्या वेळी खतांचा पहिला हप्ता म्हणजेच १० टक्के नत्र आणि ५० टक्के स्फुरद व पालाश दिल्यास मुळे आणि अंकुरांच्या जोमदार वाढीसाठी देणे फायदेशीर ठरते.
  • लागवडीच्या वेळी प्रतिहेक्टरी ६० किलो गंधक जमिनीत मिसळावे. त्यामुळे ऊस उत्पादनात १० ते २४ टक्के आणि १५ ते ३० टक्के साखर उत्पादनात वाढ दिसून येते.
  • लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांत उसास फुटवे येण्यास सुरवात होते. फुटव्यांची वाढ अधिक जोमदार व्हावी म्हणून नत्र खताची ४० टक्के मात्रा द्यावी.
  • पीक १२ ते १४ आठवड्यांचे झाल्यानंतर उसास कांड्या सुटण्यास मदत होते. त्या वेळी नत्रयुक्त खताचा तिसरा हप्ता म्हणजे शिफारशीच्या १० टक्के नत्राची मात्रा द्यावी.
  • पीक ३.५ ते ४ महिन्यांत उसाची पक्की बांधणी करून घ्यावी. मोठी बांधणी करताना प्रथम शिफारशीप्रमाणे नत्रयुक्त खताची ४० टक्के आणि स्फुरद व पालाशची उर्वरित प्रत्येकी ५० टक्के मात्रा देऊन तीन दातेरी अवजार चालवावे म्हणजे खत मातीआड होते, जमीन मोकळी होते. रिझरच्या साह्याने बांधणी करावी म्हणजे उसाला चांगली भर लागते.
  • संपर्क ः डॉ. प्रीती देशमुख, ९९२१५४६८३१ (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com