अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती

शेतकऱ्यांना मिळाली प्रयोगाची प्रेरणा नवघरे यांचे उन्हाळी मुगाचे अर्थकारण पाहून परिसरातील अन्य शेतकऱ्यांना त्याची प्रेरणा मिळालीआहे. या वर्षी पांगरी नवघरे गावशिवारात सुमारे ७० ते ८० एकरांवर या पिकाचा पेर झाला आहे.बहुतांश शेतकऱ्यांकडे पिकाची अवस्था चांगली आहे. एकरी सरासरी चार ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादनाची या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
-दिलीप नवघरे यांचा उन्हाळी मुगाचा प्लॉट व लागलेल्या शेंगा.
-दिलीप नवघरे यांचा उन्हाळी मुगाचा प्लॉट व लागलेल्या शेंगा.

वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे पाच वर्षांपासून उन्हाळी मुगाची यशस्वी शेती करताहेत. सुमारे ७० दिवस कालावधीचे हे पीक कमी खर्चात, कमी देखभालीत पाच-सहा एकरांत त्यांना चांगले उत्पन्न मिळवून देत आहे. परिसरातील शेतकरीही त्यांच्या या फायदेशीर प्रयोगाचे अनुकरण करू लागले आहेत. नवघरे यांनी प्रत्यक्ष प्रयोगातून उन्हाळी मुगाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.     वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात पांगरी नवघरे गाव आहे. येथील दिलीप नवघरे यांची बारा एकर शेती आहे. परिसरात धरण प्रकल्प झाल्याने तेथून पाइपलाइन करीत त्यांनी शेती ओलिताखाली आणली. त्यातून वर्षातले तीनही हंगाम घेणे त्यांना शक्य झाले.  तीन हंगामातील स्मार्ट पीक पद्धती 

  • नवघरे यांनी आपली पीक पद्धती अत्यंत स्मार्ट पद्धतीने बसविली आहे. 
  • खरिपात ते बारा एकरांत सोयाबीन घेतात. 
  • रब्बीमध्ये सहा ते सात एकर हरभरा आणि पाच एकर गहू असतो. 
  • हरभऱ्याचे पीक काढल्यानंतर या शेतात उन्हाळी मूग घेण्यात येतो. 
  • त्यानंतर खरिपात पुन्हा सोयाबीन असते. 
  • मूग झाले हक्काचे पीक 

  • गेल्या पाच वर्षांपासून नवघरे यांनी उन्हाळी मुगाच्या शेतीत सातत्य ठेवले आहे. 
  • त्याचे सुमारे चार ते पाच एकर क्षेत्र असते. यंदा हे क्षेत्र सहा एकर आहे. मुगाचे व्यवस्थापन अत्यंत नियोजनबद्ध करण्यात येते. 
  • मार्चच्या पहिल्या आठवड्यात ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर करून बियाणे व खत एकाच वेळी पेरले जाते. 
  • एकरी सुमारे आठ किलो बियाणे लागते. खासगी कंपनीचे वाण वापरतात. पाच किलोच्या बॅगेचा खर्च सुमारे ५०० रुपये असतो. 
  • पेरणीसोबतच १८:१८:१० या रासायनिक खताचा वापर होतो. 
  • स्प्रिंकलरच्या साहाय्याने सिंचन करतात. मुगाला साधारण आठ पाणी लागतात, असे नवघरे सांगतात. 
  • पेरणीनंतर साधारण प्रत्येकी सात दिवसांनी पाणी दिले जाते. 
  • पेरणीनंतर सुमारे २५ दिवसांनी एकरी २५ किलो युरिया दिला जातो. 
  • किडी-रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सुरवातीच्या बारा ते पंधरा दिवसांनी, त्यानंतर २५ दिवसांनी व साधारणपणे पेरणीपासून दीड महिन्याने व गरजेनुसार पुढे अशा तीन ते चार फवारण्या होतात. 
  • पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने होतो. त्यासाठी स्प्रिंकलरचा वापर होतो. 
  • पिकाला तयार व्हायला सुमारे ७० दिवसांचा कालावधी लागतो. दरम्यानच्या काळात एक कोळपणी आणि एक निंदणही होते. 
  • उत्पादन व अर्थकारण  यंदाही मुगाचे पीक शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. आजवर सर्वाधिक चांगल्या पद्धतीने हे पीक बहरल्याचे नवघरे सांगतात. 

  • दरवर्षीचे उत्पादन- एकरी पाच ते साडेपाच क्विंटल 
  • उत्पादन खर्च- एकरी सुमारे सहा ते साडेसहा हजार रुपये 
  • दरवर्षीचा दर- प्रति क्विंटल- ४५०० ते ५००० रुपये 
  • यंदाचा अपेक्षित दर- ६००० रु. 
  • साडेपाच क्विंटल उत्पादन व साडेपाच हजार ते सहा हजार रुपये दर गृहीत धरला तर 
  • ७५ दिवसांच्या काळात २४ हजार ते २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. 
  • उन्हाळी मुगाला खरिपातील मुगापेक्षा अधिक दर मिळतो. हा मूग मोगरडाळ म्हणून वापरला जात असल्याचे नवघरे यांनी सांगितले. वाशिमपेक्षा मुगाला अकोला महत्त्वाची बाजारपेठ आहे. या जिल्ह्यात डाळमिलची संख्या भरपूर असल्याने तेथे चांगला उठाव होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
  • कुटारातून सुटतो उत्पादन खर्च  नवघरे म्हणाले की मुगातून चांगले म्हणजे एकरी एक ट्रॉली कुटार मिळते. चार ते पाच हजार रुपये त्याचा दर धरला तरी ७५ टक्के ते १०० टक्के उत्पादन खर्च कुटार विक्रीतूनच कमी होतो.  जपली सुपीकता, उत्पादकता  सोयाबीनचे एकरी दरवर्षी सात ते दहा क्विंटल, हरभऱ्याचेही तेवढेच तर गव्हाचे २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. मूग घेतलेल्या शेतात २०१६ मध्ये धरणातील एकरी तीनशे ट्रॉली गाळ वापरला टाकला. सहा एकरात सुमारे २००० ट्रॉली गाळाची माती आणून वापरली आहे. यासाठी सुमारे सहा लाख रुपयांपर्यंत खर्च आला. सोबतच द्विदल पिकांचा वापर होत असल्याने जमिनीच्या सुपीकतेत सुधारणा होत आहे.  उन्हाळी पिकांना वन्यजीवांचा त्रास  पांगरी नवघरे भागात उन्हाळ्यात घेतल्या जाणाऱ्या भुईमूग तसेच मुगाच्या पिकाला वन्य प्राण्यांचा मोठा त्रास असल्याचे नवघरे यांनी सांगितले. साहजिकच शेतकऱ्यांना पिकांची निगराणी ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळेसही शेतात जावे लागते. त्यासाठी सहा कुत्रीदेखील नवघरे यांनी पाळली आहेत. 

    संपर्क- दिलीप नवघरे- ९८२३२२३१०८   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com