Agriculture story in marathi, systems of goat rearing, Maharashtra | Agrowon

शेळीपालनासाठी निवडा योग्य पद्धत
डाॅ. तेजस शेंडे
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

शेळीपालन व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. प्रत्येक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या सोयीस्कर गोष्टी व अडचणी असतात. शेळीपालनासाठी आपल्याकडील उपलब्ध गोष्टी व त्यानुसार गोठ्याची रचना व पद्धतीचा अवलंब करावा.

शेळीपालन व्यवसाय तीन पद्धतींनी केला जातो.  
१. पूर्ण बंदिस्त पद्धती
यामध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ गोठ्यामध्ये ठेवले जाते. जागेवरच चारा, पाणी दिले जाते. शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर नेले जात नाही.
फायदे

शेळीपालन व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. प्रत्येक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या सोयीस्कर गोष्टी व अडचणी असतात. शेळीपालनासाठी आपल्याकडील उपलब्ध गोष्टी व त्यानुसार गोठ्याची रचना व पद्धतीचा अवलंब करावा.

शेळीपालन व्यवसाय तीन पद्धतींनी केला जातो.  
१. पूर्ण बंदिस्त पद्धती
यामध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ गोठ्यामध्ये ठेवले जाते. जागेवरच चारा, पाणी दिले जाते. शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर नेले जात नाही.
फायदे

 • शेळ्यांची संख्या जास्त असेल तर उपयुक्त.
 • शेळ्यांना गव्हानीमध्ये एकाच जागेवर पोषक आहार देता येतो.
 • स्वच्छ व भरपूर पाणी देता येते.
 • शेळ्यांमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या
 • रोगांवर नियमित लसीकरण जंतनिर्मूलन व योग्य स्वच्छता राखून नियंत्रण ठेवता येते.
 • शेळ्यांमधील अनावश्‍यक पैदास टाळता येते व योग्य पैदास तंत्राचा वापर करून जातिवंत शेळ्यांची वाढ करता येते.
 • चारा वाया जात नाही.
 • कामगारांवरचा खर्च कमी करता येतो.
 • शेळ्यांची अनावश्‍यक धावपळ न झाल्याने शक्ती वाया जात नाही व त्याचा फायदा बोकडाच्या वजनवाढीसाठी होतो.

तोटे

 • गोठा बांधणीवर खर्च जास्त येतो.
 • चाऱ्यावर खर्च जास्त येतो.
 • शेळ्यांच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे लागते.

२. अर्ध बंदिस्त पद्धती
यामध्ये शेळ्यांना पूर्ण वेळ गोठ्यामध्ये ठेवले जात नाही. दिवसातून ३-४ तासांसाठी गोठ्यातून बाहेर चरायला नेले जाते व राहिलेल्या वेळेत चारा जागेवरच दिला जातो.
फायदे

 • खाद्यावरील खर्च काही प्रमाणात कमी करता येतो.
 • शेळ्यांना ठराविक वेळेत व जागेत चारल्यामुळे शेळ्यांना चांगला व्यायाम मिळतो.
 • गोठ्यातील एकूणच खर्चावर नियंत्रण ठेवता येते.
 • शेळ्यांची संख्या कमी असल्यास चांगला उपयोग होतो.
 • व्यवस्थापन व्यवस्थित असल्यास रोगराई व अनावश्‍यक पैदास टाळता येऊ शकते.

तोटे

 • शेळ्यांच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावे लागते.
 • चरण्यासाठी कुरणाची व्यवस्था करावी लागते.
 • शेळ्यांच्या कुरणाभोवती कुंपण करण्यावर खर्च येऊ शकतो.
 • व्यवस्थापनावर लक्ष नसल्यास शेळ्यांना रोगांचा संसर्ग होऊ शकतो. वजनात चांगली वाढ मिळत नाही.

३. परंपरागत चराऊ पद्धती
शेळ्यांना गोठ्यामध्ये न ठेवता त्यांना दिवसातून ८ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ गोठ्यातून बाहेर चरायला नेले जाते. रात्री शेळ्यांना बांधून अथवा खुल्या वाड्यामध्ये रात्रभर ठेवले जाते. शेळ्यांच्या खाद्यावर अत्यल्प खर्च होतो; पण खूप चांगला फायदाही होतो असे नाही.

फायदे
शेळ्यांच्या खाद्यावरील खर्च कमी करता येतो.

तोटे

 • शेळ्यांची संख्या जास्त असेल तर उपयुक्त नाही.
 • शेळ्यांना चांगल्या प्रतीचा पोषक आहार पोटभर मिळत नाही.
 • शेळ्यांना स्वच्छ, भरपूर पाणी व खाद्य मिळत नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊन शेळ्या विविध रोगांना बळी पडतात.
 • शेळ्यांमधील अनावश्‍यक पैदासीमुळे अंतरप्रजनन होते व पुढील पैदास निकृष्ट दर्जाची होते.
 • कुराणाची संख्या कमी असल्यास पुरेसे व सात्विक अन्न मिळण्याची खात्री नसते.
 • कामगारांवरचा खर्च वाढतो.
 • शेळ्यांची अनावश्‍यक धावपळ झाल्याने शक्ती वाया जाते, त्यामुळे शेळ्यांची आवश्‍यक वजनवाढ मिळत नाही.

संपर्क ः डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५
(पशुअनुवंश व पशुपैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

 

इतर कृषिपूरक
परसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराज...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...
व्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या...
मत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे?सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...
व्यावसायिक, शास्त्रीय दृष्टिकोनातून करा...म्हशीच्या प्रजनन व्यवस्थापनामध्ये म्हैस...
प्रशिक्षण, मार्गदर्शनातून कमी करा दुग्ध...दुग्ध व्यवसाबद्दल सध्या मोठ्या प्रमाणावर माहिती...
पशूसल्लागोठ्यातील गाई-म्हशींचे गाभण राहण्याचे प्रमाण हे...
प्रथिने, खनिजांची गरज पूर्ण करण्यासाठी...अधिक उत्पादनाकरिता तसेच जनावरांचे स्वास्थ्य अधिक...
म्हशीचे प्रमुख आजार, प्रतिबंधात्मक...प्रत्येक म्हैसपालकाने म्हशीचे दूध उत्पादन नियमित...
योग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...
पंढरपुरी म्हैस..पंढरपुरी म्हैस ही हलक्‍या आणि निकृष्ट चाऱ्यावर तग...
शेतकरी वाणाची नोंदणी करताना...शेतकऱ्यांना स्वतः विकसित केलेल्या वाणांचे सर्व...
ब्रुसेल्लोसिस, व्हिब्रिओसिस रोगावर ठेवा...जनावरांतील प्रजननासंबंधी अाजार टाळण्यासाठी...
तुती लागवडीबाबत माहिती...तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा...
म्हशींना खाद्यासोबत द्या खनिज मिश्रणेम्हशीच्या चयापचय क्रियेसाठी, शारीरिक वाढीसाठी,...
लसीकरण, जागरूकतेतून टाळा रेबीज रोगाचा...जागितक आरोग्य संघटनेनुसार आपल्या देशातील 70 टक्के...
दुग्ध व्यवसायातून गटाने मिळविली बाजारपेठबोपी (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) गावातील...
हळदकंदांवर प्रक्रियेसाठी सुधारित...हळदकंदांची काढणी केल्यानंतर हळदीवर प्रक्रिया करून...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
समतोल आहारातून वाढेल दुग्धोत्पादन म्हैस पालन फायदेशीर होण्याकरिता...