agriculture story in marathi, talani, ausa, latur | Agrowon

'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले सातत्य..
रमेश चिल्ले 
शनिवार, 15 डिसेंबर 2018

दुष्काळात उत्तम कलिंगड पीक 
पाणी उपलब्धता झाल्याने मालू यांनी माहिम जातीच्या आल्याची लागवड केली. आज पाहात राहावे असे पीक आहे. कलिंगडाचेही सुमारे २० टन एकरी उत्पादन अपेक्षित आहे

सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत. अनेकजण आपापल्यापरिने पाण्याची उपलब्धता करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्‍यातील भूकंपग्रस्त किल्लारी जवळच्या तळणी गावचे साठी ओलांडलेले हरिकिशन रंगलाल मालू यांनी देखील यंदा पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनाच्या जोरावर ३३ एकर ऊस, प्रत्येकी साडेपाच एकर आले व कलिंगड पीक घेतले आहे. दुष्काळात असताना आणि त्याचबरोबर चांगला पाऊस झालेला असताना अशा दोन्ही वेळेत पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. 

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे आता कायमस्वरूपी दुष्काळी संज्ञेत मोडू लागले आहेत. सन २०१३ ते १५ ही दुष्काळी वर्षे तर या भागाने पाण्याअभावी कशी काढली हे आठवले की अंगावर काटा येतो. कित्येकांना मनावर धोंडा ठेवून जनावरे विकवी लागली. काहींना चारा छावणीचा आधार घ्यावा लागला. शेताशिवारात गुरापाखरांना शोधूनही पाण्याचा टिप्पूस मिळत नव्हता. सगळीकडे लाहीलाही करणारे उजाड शिवार नजरेस पडत होते. विहिरींनी केव्हाच तळ गाठलेला. गावात टॅंकरची वाट पाहणारी बाया-माणसं, रंगीबेरंगी घागरीच्या रांगा लावून जणू पाणीयुद्धाला तयार अशी स्थिती आता तयार होऊ लागली आहे. अनेकांनी पोटापाण्यासाठी केव्हाच शहरं जवळ केलेली. ज्यांना शेती नावाचा पोटचा गोळा सोडून जाणे शक्‍य नव्हते त्यांनी रेशन धान्याच्या भरवशावर दिवस ढकलले. प्रयत्न करून टॅंकरच्या हंडाभर पाण्यावर तहान भागवली. 

जिद्दीने पाण्यासाठी प्रयत्न करणारे मालू 
हिंमतीने संकटांशी दोन हात करणारे शेतकरीदेखील काही कमी नसतात. ते सतत पाण्यासाठी काही ना काही प्रयत्न करीत असतात. तळणी (ता. औसा, जि. लातूर) येथील हरिकिशन मालू हे त्यापैकीच एक आहेत. स्वतःची ४७ एकर व उर्वरित भावाची अशी मिळून ७२ एकर शेती ते सांभाळतात. वयाची साठी ओलांडलेले हरिकिशन आजही विविध मार्गांनी आपली मोठी शेती दुष्काळातही फुलवताना दिसताहेत. यंदाही पावसाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. पाऊस म्हणावा असा झालाच नाही. पण मालू यांच्या अडीच कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात सद्यःस्थितीत दीड कोटी लिटरपर्यंत पाणी आहे. त्या जोरावर ३३ एकर ऊस, प्रत्येकी साडेपाच एकर आले व कलिंगड ही पिके शेतात फुलताहेत. पैकी कलिंगड लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल. 

पाण्यासाठी नाला सरळीकरण 

  • शेततळ्या व्यतिरिक्त सुमारे ११ लाख रुपये खर्चून त्यांनी पूर्वी गॅबीयन बंधारा बांधला. जमिनीतील पाणी ‘अंडरग्राउंड’ चराच्या माध्यमातून शेततळ्यात साठवले. शेताभोवती चर खोदून ते पाणी त्यात वळवले. पूर्वी एका नाल्याचे सरळीकरण त्यांनी केले होतेच. त्यानंतरही दुसऱ्या शेतात दीड ते दोन किलोमीटर लांब, वीस मीटर रूंद व पाच मीटर खोलीकरण अलीकडेच केले आहे. 
  • गॅबीयन बंधाऱ्याद्वारे पाणी अडवल्यने त्याचा फायदा यंदाही दुष्काळात होत आहे. अलीकडील वर्षातील भीषण दुष्काळातही त्यांची सुमारे ५० एकर शेती पाण्याखाली 
  • होती. गेल्यावर्षीही त्यांनी पडलेला पाऊस नाल्यात अडवला. शेततळ्यात साठवलो. पुरवून पुरवून ठिबक, तुषार सिंचनाद्वारे पिके जगवली. चालू वर्षात केवळ पस्तीत ते चाळीस तासच पाऊस पडला. पण सगळे पाणी विविध माध्यमातून अडविण्याचे काम यंदाही होत गेले. अलीकडेच मधेच थोडा पाऊस पडून गेला. तोही अडवून साठवला. 

विविध पिकांचे प्रयोग 
पाणी उपलब्धता झाल्याने मालू यांनी माहिम जातीच्या आल्याची लागवड केली. आज पाहात राहावे असे पीक आहे. यंदा तूर चार एकरांवर फुलते आहे. हैदराबाद येथील कोरडवाहू संशोधन केंद्रातून त्यांनी कामिका एमआय-२०३ हे तुरीचे वाण आणले. हे वाण लाल फुलांचे आहे. याचे दाणे लाल रंगाचे, टपोरे असून प्रत्येक शेंगात चार ते पाच दाणे येतात. आकर्षक रंग असल्याने ही तूर बांधावरही लावता येते. खोडवा घेण्यासाठी हा उत्तम वाण आहे. या तुरीला पक्व होण्यास आठ महिने लागतात. पण सुमारे २० ते ३० टक्के उत्पादन जास्त मिळू शकते. यंदा पाण्यामुळेच हा प्रयोग करणे शक्य झाले. 
कलिंगडाचे सुमारे २० टन एकरी उत्पादन अपेक्षित आहे. 

जनावरांसाठी चाऱ्याची सोय 
मालू यांच्याकडे सुमारे ३२ जनावरे आहेत. पण हिरवा चारा ते आज जनावरांना देऊ शकत आहेत. 
साधारण दोन एकरांवर मका, गजराज अशी पिके घेतली आहेत. हरभऱ्याची विजय ही जात सहा एकरांवर, काबुली हरभरा व बन्सी गहू प्रत्येकी दोन एकरांवर आहे. खरिपात १५ एकर सोयाबीन पिकातून सुमारे १५५ क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. मका आठ एकरांवर होता. त्याचे १०२ क्विंटल उत्पादन मिळाले. 
दोन्ही पिकांना तुषार सिंचनाने पाणी दिले. यंदा ३३ एकरांपैकी १६ एकर ऊस साखर कारखान्याला जाईल. तर उर्वरित उसापासून गूळ उत्पादन करण्यात येणार आहे. मालू यांचा गूळनिर्मितीचा व्यवसाय आहे. 
यंदा सुमारे ९०० क्विंटलपर्यंत गूळनिर्मिती शक्य होऊ शकते असे ते सांगतात. दुष्काळात ते पाण्याविषयी दक्ष असतातच. मात्र ज्यावर्षी पाऊस भरपूर पडतो त्या वेळीही ते पाण्याचा थेंब न थेंब वाचवण्याचा प्रयत्न करतात. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना त्यांनी केवळ मनात न ठेवता ती त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली आहे. 

संपर्क- हरिकिशन मालू-९४२२०७१२३१ 

(लेखक ज्‍येष्ठ साहित्यिक असून शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.) 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची...वर्षभर सुमारे सात परदेशी भाज्यांची शेती ...
गीर गायींच्या संगोपनासह पॅकेटबंद दुधाची...अमरावती जिल्ह्यातील मोर्शी हा संत्रा पिकासाठी...
अथक प्रयत्न, संघर्षातून  प्रयोगशील...पाण्याच्या योग्य व्यवस्थापनातून २० एकरांत...
मुंबईतील नोकरी सांभाळून गावी विस्तारली...मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
बहुवीध पीक पद्धतीद्वारे जोखीम कमी...लातूर जिल्ह्यातील हेर येथील प्रयोगशील शेतकरी...
पाण्याचे महत्त्व ओळखूनच सुधारले पीक...सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उभे ठाकलेले संकट व...
दुष्काळातही बहरलेली बेलखेडेेंची...अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
केशर आंबा बाग, मिश्रपिके,  अन...लातूर जिल्ह्यातील शिवणी बु. येथील पृथ्वीराज...
शेततळ्याच्या जोरावर फुलली २५ एकरांत...संत्रा शेतीत अग्रेसर म्हणून वाशिम जिल्ह्यातील...
देशी गोपालन व्यवसायातून घेतली नव्याने...इमूपालन व्यवसायात काही लाख रुपयांचा आर्थिक फटका...
दुर्गम भागात यशस्वी आवळा प्रक्रिया...नगर जिल्ह्यात मुथाळणे येथे शेती असलेल्या पाडेकर...
प्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...