टोमॅटो मूल्यवर्धनातून वाढवा फायदा

टोमॅटो प्रक्रिया
टोमॅटो प्रक्रिया

बाजार जास्त प्रमाणात टोमॅटोची अावक झाल्यामुळे बाजारभावात घट होते आणि माल अत्यल्प किमतीत काडीमोल भावात विकावा लागतो. साठवणुकी संदर्भातील अज्ञान, प्रक्रियेविषयी अनभिज्ञता, पुरेशा साधनसामग्रीचा अाभाव, तांत्रिक ज्ञानाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे प्रक्रिया करण्याला महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे मोठे अार्थिक नुकसान सहन करावे लागेत. टोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून, लगेच खराब होते. म्हणून टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करता येते. टोमॅटोपासून रस, केचप, सॉस असे पदार्थ तर तयार करता येतातच; याशिवाय लोणचे, ज्यूस, सूप, पावडर या पदार्थांनाही बाजारात चांगली मागणी अाहे. त्यामुळे नुकसान टाळून अधिकचा फायदा मिळवता येतो. लोणचे टोमॅटोचे काप ः १ किलो मेथी दाणे ः ३० ग्रॅम मोहरी डाळ ः ६० ग्रॅम बडीशेप ः ५० ग्रॅम दालचिनी ः १० ग्रॅम काळीमिरी ः १० ग्रॅम लवंग ः १० ग्रॅम हिंग ः १० ग्रॅम काश्मिरी लाल मिरची ः ५० ग्रॅम तिखट लाल मिर्ची ः १५ ग्रॅम मीठ ः १२० ग्रॅम हळद ः ५ ग्रॅम तेल ः ४०० ग्रॅम प्रक्रिया

  • टोमॅटो वाफवून त्याचे जाडसर काप करावेत.
  • हे काप ३ ते ४ तासांसाठी मोकळ्या हवेत किंवा ड्रायरमध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानाला वाळवून घ्यावेत. असे केल्याने टोमॅटोमधील अतिरिक्त पाणी कमी होते.
  • एका कढईत मोहरी पावडर, मेथी दाणे, बडीशेप, लवंग, दालचिनी, काळीमिरी, वेगवेगळे भाजून घ्यावे आणि या सर्वांची जाड भरड बनवावी.
  • एका कढईत तेल तापवून घ्यावे, आणि तेल कोमट असताना त्यात हळद, लाल मिरची पावडर, हिंग एकत्र करून भाजून घ्यावे आणि त्यातच तयार केलेली भरड एकत्र करावी.
  • एका पातेल्यात टोमॅटोचे काप आणि मीठ एकत्र करावे, यातच तेल आणि मसाले मिसळून तयार झालेले लोणचे बरणीत भरून पॅक करावे.
  • टमाटो पावडर

  • टोमॅटो स्वच्छ धुऊन उकळत्या पाण्यात २-३ मिनिटे उकळवून घ्यावे आणि त्वरित गार पाणी ओतावे.
  • या टोमॅटोचे काप करून ट्रे ड्रायरमध्ये ठेवून ६० अंश सेल्सिअस तापमानाला १४ तासांपर्यंत वाळवावे.
  • वाळवलेल्या टोमॅटोची पावडर करून गाळून घ्यावी आणि हवाबंद पॅकिंग करून साठवावी.
  • चटपटीत पदार्थ बनविण्यासाठी टोमॅटो पावडरचा उपयोग होतो.
  • टोमॅटो केचप टोमॅटोचा पल्प : १ किलो व्हिनेगर ः ४० मिली लवंग, दालचिनी, काळीमिरी, जायफळ, जायपत्री ः ६० ग्रॅम कांदा आणि लसूण पावडर ः १० ग्रॅम सायट्रिक ऍसिड ः ५ ग्रॅम साखर ः १५० ग्रॅम पेक्टिन ः ५ ग्रॅम प्रक्रिया

  • उकळत्या पाण्यात टोमॅटो २-३ मिनिटे उकळून त्यावर लगेच गार पाणी ओतावे.
  • या टोमॅटोचा पल्प तयार करावा.
  • १ किलो टोमॅटोचा पल्प कढईत घेऊन सतत ढवळत ठेवून उकळवा, सुमारे एक तृतीयांश भाग कमी झाल्यावर त्यात ५० ग्रॅम साखर मिसळून पुन्हा ढवळून उकळावे.
  •  ढवळत असताना त्यात एका कपड्यात मसाल्यांची पावडर बांधून ती पुरचुंडी उकळत्या टोमॅटोच्या पल्पमध्ये धरून ठेवावी आणि सोबतच कांदा आणि लसूण पावडर एकत्र करावी.
  • १८ अंश ब्रिक्स इतका टी.एस.एस. आल्यावर उरलेली, १०० ग्रॅम साखर, सायट्रिक ॲसिड मिसळून पुन्हा उकळावे आणि शेवटी व्हिनेगर एकत्रित करावे.
  • या केचपचा ब्रिक्स कमीत कमी २५ इतका आल्यावर गॅस बंद करून गरम असतानाच केचपचे पॅकिंग करावे.
  • संपर्क ः एस. एन. चौधरी, ८८०६७६६७८३ (के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com