Agriculture story in Marathi, tractor operated threshor | Agrowon

नीलेशभाईंनी तयार केला ट्रॅक्टरचलित थ्रेशर
अनामिका डे, अलजुबैर सय्यद
बुधवार, 24 जानेवारी 2018

पारंपरिक पद्धतीमध्ये भुईमुगाची काढणी आणि शेंगा तोडणीसाठीचा वेळ आणि मनुष्यबळ जास्त प्रमाणात लागते. सध्याच्या काळात मजूर टंचाईमुळे भुईमुगाच्या शेंगांची काढणी आणि तोडणी खर्चिक होत चालली आहे. भुईमूग उत्पादकांची ही अडचण लक्षात घेऊन गुजरातमधील बोरिया (ता. जमकंडोराना, जि. राजकोट) येथील नीलेशभाई डोबरिया यांनी ट्रॅक्टरवर चालणारा स्वयंचलित थ्रेशर तयार केला.

पारंपरिक पद्धतीमध्ये भुईमुगाची काढणी आणि शेंगा तोडणीसाठीचा वेळ आणि मनुष्यबळ जास्त प्रमाणात लागते. सध्याच्या काळात मजूर टंचाईमुळे भुईमुगाच्या शेंगांची काढणी आणि तोडणी खर्चिक होत चालली आहे. भुईमूग उत्पादकांची ही अडचण लक्षात घेऊन गुजरातमधील बोरिया (ता. जमकंडोराना, जि. राजकोट) येथील नीलेशभाई डोबरिया यांनी ट्रॅक्टरवर चालणारा स्वयंचलित थ्रेशर तयार केला.

या यंत्रामुळे शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाचण्यास मदत होणार आहे. बोरिया गावातील नीलेशभाई डोबरिया यांचा शेतीच्या बरोबरीने प्लॅस्टिक दोऱ्या बनविण्याचा लघू व्यवसाय होता. परंतु दोरी निर्मिती व्यवसायातील मंदीमुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय बंद करून स्वतःच्या शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरवात केली. परिसरातील शेतकऱ्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी दोन वर्षे भुईमूग लागवड केली. परंतु या पीक व्यवस्थापनाच्या बरोबरीने काढणी आणि वेलीपासून शेंगा वेगळ्या करण्यासाठी इतर पिकांपेक्षा जास्त प्रमाणात मजूर लागतात हे त्यांच्या लक्षात आले. भुईमुगाची काढणी करून शेतात शेंगांसह ढीग लावले जातात. पाल्यासह वाळलेल्या शेंगा एका ठिकाणी गोळा करून पारंपरिक थ्रेशरच्या साहाय्याने किंवा मजुरांकरवी शेंगा वेगळ्या केल्या जातात. या शेंगाच्या बरोबरीने माती, पालापाचोळा राहू नये यासाठी शेंगांची मजुरांच्या साहाय्याने पुन्हा एकदा उफणणी करावी लागते. गाव परिसरात अलीकडे मजुरांची टंचाई असल्याने जास्त मजुरी देऊन शेंगांची काढणी, वाळवणी त्यांना करावी लागली. तसेच वेळही जास्त लागला. उत्पादनाच्या मानाने फारच कमी आर्थिक नफा त्यांना भुईमूग लागवडीतून मिळाला. या समस्येवर यंत्राच्या माध्यमातून काही उपाय शोधता येईल का? याबाबत त्यांचे विचारचक्र सुरू झाले. दोन वर्षे विविध प्रयोग करीत स्वकल्पनेतून नीलेशभाईंनी ट्रॅक्टरवर चालणारा स्वयंचलित थ्रेशर तयार केला.

या यंत्राच्या वापरामुळे ७० टक्के श्रम कमी झाले, आर्थिक बचतही होते असा त्यांचा अनुभव आहे. स्वयंचलीत थ्रेशरनिर्मितीसाठी नीलेशभाई डोबरिया यांना नऊ लाखांचा खर्च आला आहे. ग्यान संस्थेने या यंत्र निर्मितीसाठी त्यांना आर्थिक आणि तांत्रिक साहाय्य केले आहे. या यंत्रामध्ये शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार सुधारणा करून खर्च कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
 
तयार केले ट्रॅक्टरवर चालणारे स्वयंचलित थ्रेशर ः

  • स्वयंचलित थ्रेशरचा वापर करण्यापूर्वी मजुरांच्या साहाय्याने भुईमूग झाडाची काढणी करून यंत्र चालण्याचे अंतर लक्षात घेऊन शेतामध्येच एका सरळ रेषेत मांडून ठेवावे लागते. त्यानंतर ट्रॅक्टरवर चालणारे स्वयंचलित थ्रेशर यंत्राच्या कन्व्हेअरला जोडलेल्या रोटरच्या साहाय्याने शेंगांसह झाड थ्रेशरमध्ये जात राहाते.
  • थ्रेशरमध्ये झाडापासून शेंगा वेगळ्या होऊन एका टाकीत जमा होतात. यंत्राच्या मागच्या बाजूला लावलेल्या टाकीत पाला जमा होतो.
  • एक एकर शेतातील भुईमुगाच्या झाडापासून शेंगा वेगळ्या केल्यानंतर शेताच्या बाजूला एका ढिकाणी पाल्याने भरलेली टाकी मोकळी केली जाते.
  • शेंगा भरलेली टाकी मोकळी करताना ब्लोअरमधून जोराने हवा सोडली जाते. त्यामुळे शेंगासोबत राहिलेला काडीकचरा वेगळा होतो.
  • भुईमूग झाडे शेतीतून उचलण्यापासून ते शेंगा तोडणीपर्यंतची सर्व कामे एका यंत्राने होतात. हे यंत्र चालविण्यासाठी एकाच व्यक्तीची गरज असते. या यंत्रामुळे श्रम आणि मजुरीमध्ये ७० टक्के बचत होते.
  • स्वयंचलित यंत्राने भुईमुगाच्या बरोबरीने हरभरा, मूग, तुरीची कापणी आणि मळणी करणे शक्य आहे. गोळा झालेला भुईमुगाच्या पाल्याची गुणवत्ता चांगली असल्याने हा पाला जनावरांना खाद्य म्हणून वापरता येतो.
  • हे थ्रेशर १५ एचपी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरला जोडता येते.
  • थ्रेशरला असलेल्या इंजिनला प्रतितास दोन लिटर डिझेल लागते.
  • एका तासामध्ये सरासरी एक एकर क्षेत्रावरील शेंगासह झाड उचलून थ्रेशरमध्ये शेंगा आणि पाला वेगळा केला जातो.
  • थ्रेशरला असलेल्या टाकीमध्ये ६०० किलो शेंगा आणि दुसऱ्या टाकीमध्ये ८०० किलो भुईमूग पाला मावतो.

संपर्क ः ०७९- २६७६९६८६
(ग्यान संस्था, अहमदाबाद, गुजरात)

इतर टेक्नोवन
खरबूज प्रक्रियेत आहेत संधी...खरबूज हे अत्यंत स्वादिष्ट फळ. खाण्याच्या बरोबरीने...
जलशुद्धीकरणासाठी सूर्यप्रकाशावर आधारीत...सूर्यप्रकाशाच्या साह्याने पाण्याचे शुद्धीकरण...
उपकरण देईल आजारी जनावराची पूर्व सूचनाएसएनडीटी विद्यापीठाच्या मुंबईमधील प्रेमलीला...
शालेय विद्यार्थी झाले कृषी संशोधकजळगावात जैन हिल्स येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘...
साठवणुकीसाठी प्री फॅब्रिकेटेड गोदाम,...शेतमालाची योग्य गुणवत्ता जपण्यासाठी योग्य साठवणूक...
दिवस-रात्रीच्या तापमान फरकातूनही मिळवता...कमाल आणि किमान तापमानातील बदलाद्वारे विद्युत...
पवनचक्क्यांची झीज कमी करणारे नवे...वातावरणातील विविध घटकांचा परिणाम होऊन...
शहरात व्हर्टिकल फार्मिंग रुजवण्यासाठी...कॅनडामधील लोकल ग्रोस सलाड या स्वयंसेवी संस्थेने...
हवेच्या शुद्धीकरणासाठीही इनडोअर वनस्पती...वाढत्या शहरीकरणासोबतच प्रदूषणाची समस्याही वेगाने...
आंब्यावरील प्रक्रिया अन् साठवणआंबा हा कच्च्या आणि पिकलेल्या दोन्ही स्वरुपामध्ये...
संजयभाई टिलवा यांनी तयार केले...भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून काढणीसाठी मजूर मोठ्या...
शेवाळाची शेती हेच ठरेल भविष्यभविष्यामध्ये आहार, जैव इंधन, जागतिक पातळीवरील...
सेन्सर छोटे, कार्य मोठे!इटली येथील युनिव्हर्सिटी ऑफ बारो अल्दो मोरोमधील...
आंबा रस आटविण्यासाठी गॅसिफायरकोकणात अजूनही आंबा आटवण्यासाठी चुलीमध्ये लाकडाचा...
कलिंगडापासून विविध पदार्थनिर्मितीउन्हाळ्यामध्ये कलिंगड हे फळ उत्तम मानले जाते....
योग्य पद्धतीने होईल खेकड्यांचे फॅटनिंगखेकड्यांचे फॅटनिंग करण्यासाठी तलावातील संवर्धन,...
सेन्सरद्वारे तापमान, आर्द्रता, कार्बन...काटेकोर शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
कल्पनेतून केली अडचणींवर मातजगभरात शेतकरी आपली दैनंदिन कार्य करीत असताना अनेक...
परागीकरण करणारा रोबोजगभरात फळांची मागणी वाढत असल्याने विविध देशांत...
हळकुंडावरील प्रक्रियेसाठी यंत्रेकोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत...